कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

►गोरक्षणाबाबत खंडपीठासमोर सुनावणी , नवी दिल्ली, २१ जुलै –…

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

►उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २१ जुलै –…

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

►प्रणव मुखर्जी यांना उद्या संसदेत निरोप , तभा वृत्तसेवा…

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

►अमेरिकेचे दोन दिवसात दोन धक्के, वॉशिंग्टन, २१ जुलै –…

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

►चीनची भारताला पुन्हा युद्धाची धमकी, बीजिंग, २१ जुलै –…

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

►आता निकालाची प्रतीक्षा, इस्लामाबाद, २१ जुलै – पनामा पेपर्स…

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

►मुंबईतील दीड लाख शेतकर्‍यांना कर्ज माफी ►२८७ कोटी वाटले,…

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

►आयकर विभागाची कार्यवाही, पुणे, २१ जुलै – उद्योजक अविनाश…

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

मुंबई, १८ जुलै – यापुढे जर शेतकर्‍यांना ऊस लागवड…

इतिहास घडवणारी भेट

इतिहास घडवणारी भेट

अनय जोगळेकर | इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले…

दलित की भारतीय?

दलित की भारतीय?

रमेश पतंगे | खरे सांगायचे, तर आता राजकारणातून दलित…

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | जमाते पुरोगामीची देशातल्या…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:03 | अस्त: 19:01
अयनांश:
Home » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » भाजपच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार

भाजपच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार

=महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील घालणार गारेच्या गणपतीला साकडे=
chandrakant-dada-patilतभा प्रतिनिधी
सातारा, [दि. ५ नोव्हेंबर] – सातारा शहरात प्रथमच पक्ष चिन्हावर आणि स्वबळावर पालिकेच्या आखाड्यात उतरलेल्या भाजपने एक लक्ष नगराध्यक्ष हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुढील १५ दिवसाची प्रचाराची रणनिती आखली आहे. या प्रचाराचा शुभारंभ दि. ६ रोजी सकाळी ९ वाजता महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत होणार असून चिमणपुर्‍यातील गारेचा गणपती येथून श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात येणार आहे. हा प्रचार शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे मनोमिलनाच्या दोन्ही आघाड्यांविरुध्द अधिकृत रणशिंग असणार असून या प्रचार मोहिमेकडे सार्‍यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पक्षाची पाळेमुळे रुजवण्याच्या दृष्टीकोनातून मोर्चे बांधणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेषत: प. महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले असून सातारा जिल्ह्यात सातारा व कराड या दोन ठिकाणी जास्तीत जास्त भर दिला आहे. सातारा शहर भाजपने स्वबळावर ४० उमेदवारांचे पॅनेल सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी यांच्या समोर उतरवले असून नगराध्यक्ष म्हणून भाजप महिला आघाडीच्या सुवर्णा पाटील यांना नगराध्यक्षांचा चेहरा म्हणून समोर आणले आहे. पुढील १५ दिवसात अर्ज मागे घेतल्यानंतर भाजप सातारा शहराचे कोणते मुद्दे प्रचारात आणणार हा खरा औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे जाहिरनाम्यापासून ते आघाडीच्या प्रचारापर्यंत भाजप ही निवडणूक कशा पध्दतीने हाताळते याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रचाराचे अधिकृत रणशिंग रविवारी सकाळी ९ वाजता महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित फुंकले जाणार आहे. गारेचा गणपती ते कारंडबीनाका, गोडबोले घर ते उष:काल मंडळ, नेने वाडा, मंगळवार तळे, सरस्वती प्रिटींग प्रेस, कोल्हटकर आळी मार्गे डॉ. हेडगेवार चौक, सुयोग मंगल कार्यालय, गोल मारुती मंदीर, सुपनेकर बोळ, दत्त मंदीर, व्हीनस चौक, वाघाची नळी व गुरुवार पेठ मार्गे कमानी हौद अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रेनंतर चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सातारा बिझनेस सेंटर, नवीन राधिका रोड येथील भाजपाच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष कांताताई नलावडे, महिला आघाडीच्या निताताई केळकर, रवीजी अनासपुरे, दिपक पवार, डॉ. दिलीप येळगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर हे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर चंद्रकांत पाटील सर्व उमेदवारांची भेट घेवून त्यांना खास कानमंत्र देणार असून अधिक मार्गदर्शन करणार आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (1370 of 1581 articles)


=गृहमंत्रालयाची कारवाई= नवी दिल्ली, [४ नोव्हेंबर] - आपल्या नोंदणी प्रमाणपत्राचे जूनअखेरपर्यंत नूतनीकरण न करणार्‍या देशभरातील ११ हजारावर स्वयंसेवी संस्थांची मान्यता ...