प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

►साडेसात लाख ‘हॉटस्पॉट’ बसविणार ►केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय, नवी…

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

►•देवबंदचा आणखी एक फतवा, लखनौ, २१ ऑक्टोबर – मुस्लिम…

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

►मुख्य निवडणूक आयुक्तांचे गुजरातबाबत स्पष्टीकरण, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर…

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

►अमेरिकी प्रशासनाची भूमिका, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – पाकिस्तान…

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

इस्लामाबाद, २१ ऑक्टोबर – मागील दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली…

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

वॉशिंगटन, १८ ऑक्टोबर – आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानवर नजर…

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

►शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरू ►मुख्यमंत्री फडणवीस यांची…

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

मुंबई, १८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने…

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

►५ कोटी रुपये राखीव किंमत, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

महासत्ता भारत : एक विचार

महासत्ता भारत : एक विचार

॥ विशेष : सतीश भा. मराठे | आपण महासत्ता…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

॥ तरंग : दीपक कलढोणे | कुणी कुणाला आदेश…

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

॥ विशेष : सोमनाथ देशमाने | अयोध्येत राम जन्मभूमीवर…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » भारताच्या प्रत्युत्तरात पाकचे ७ सैनिक ठार

भारताच्या प्रत्युत्तरात पाकचे ७ सैनिक ठार

=सीमेवर पुन्हा नापाक गोळीबार=

Indian Army soldiers with the 99th Mountain Brigade’s 2nd Battalion, 5th Gurkha Rifles, execute an ambush for paratroopers with the U.S. Army’s 1st Brigade Combat Team, 82nd Airborne Division, May 7, 2013, at Fort Bragg, N.C.  The soldiers are participating in Yudh Abhyas, an annual bilateral training event between the armies of the United States and India sponsored by U.S. Army Pacific.  (U.S. Army photo by Sgt. Michael J. MacLeod)

Indian Army soldiers with the 99th Mountain Brigade’s 2nd Battalion, 5th Gurkha Rifles, execute an ambush for paratroopers with the U.S. Army’s 1st Brigade Combat Team, 82nd Airborne Division, May 7, 2013, at Fort Bragg, N.C. The soldiers are participating in Yudh Abhyas, an annual bilateral training event between the armies of the United States and India sponsored by U.S. Army Pacific. (U.S. Army photo by Sgt. Michael J. MacLeod)

जम्मू, [२१ ऑक्टोबर] – जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सलग चौथ्या दिवशीही आपल्या नापाक कारवाया सुरूच ठेवताना पाकिस्तानी सैनिकांनी आज शुक्रवारी सीमा सुरक्षा दलाच्या तळांवर बेछूट गोळीबार केला. भारतीय जवानांनी दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरात पाकचे सात सैनिक ठार झाले असून, अन्य काही जखमी झाल्याची माहिती आहे. आज दिवसभरात पाकने दोनवेळा संघर्षविरामाचे उल्लंघन केले आहे.
बीएसएफच्या जवानांनी गुरुवारी याच भागात पाकी गोळीबाराच्या आडून भारतात घुसखोरी करण्याचा डाव उधळून लावला होता. जवानांच्या जोरदार मार्‍यात जखमी झालेल्या सहा अतिरेक्यांना पाकव्याप्त काश्मिरात पळ काढावा लागला होता.
हिमनगर सेक्टरच्या बोबिया भागातील बीएसएफच्या काही तळांना पाकी सैनिकांनी लक्ष्य बनविले. गोळीबारासोबतच त्यांनी ८२ एमएम तोफांमधूनही मारा केला. यात एक जवान जखमी झाला. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर भारतीय जवानांनी तितक्याच प्रखरतेने प्रत्युत्तर दिले.
त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेच्या राजौरी जिल्ह्यातील लष्कराच्या तळांवरही जोरदार मारा केला, अशी माहिती संरक्षण प्रवक्त्याने दिली. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषा बंदुका आणि तोफांच्या आवाजांनी नुसतीच धगधगत होती. दोन्ही सीमांवरून भारतीय जवानांनी पाकच्या हद्दीत अक्षरशा गोळ्या आणि तोफगोळ्यांचा वर्षाव सुरू केला. यात पाकचे सात सैनिक ठार झाले असून, काही जखमी झाले. पाकी सैनिकांच्या अनेक तळांचे भारतीय हल्ल्यात प्रचंड नुकसान झाले असल्याचे प्रवक्त्याने सांगितलेे. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकी सैनिकांनी संघर्षविरामाचे केलेले हे ३२ वे उल्लंघन ठरले आहे.
घुसखोरीचा डाव पूंछमध्ये उधळला
जम्मूच्या पूंछ सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करण्याचा सशस्त्र अतिरेक्यांचा डाव लष्करी जवानांनी उधळून लावला. नियंत्रण रेषेवरील घनदाट जंगलात सतर्क जवानांनी काही  हालचाली टिपल्या. दोन ते तीन अतिरेकी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. जवानांनी आव्हान दिल्यानंतर अतिरेक्यांनी गोळीबार केला. जवानांच्या प्रत्युत्तरानंतर अतिरेक्यांनी पळ काढला, अशी माहिती संरक्षण प्रवक्त्याने दिली.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2637 of 2669 articles)


=रावसाहेब दानवे यांचे मत= पिंपरी, [२१ ऑक्टोबर] - जिल्हास्तरावर युतीसाठी नेत्यांनी चर्चा करावी, तसेच जर युती होत असेल तर करावी ...