केंद्रीय कर्मचार्‍यांचा वेतनभत्ता वाढणार

केंद्रीय कर्मचार्‍यांचा वेतनभत्ता वाढणार

►१ जुलैपासून अंमलबजावणी ►एकूण ३४ सुधारणा मंजूर, नवी दिल्ली,…

रद्द रेल्वे तिकिटांतूनही मोठी कमाई

रद्द रेल्वे तिकिटांतूनही मोठी कमाई

►मागील आर्थिक वर्षात १४.०७ अब्ज रुपये, नवी दिल्ली, २९…

उद्यापर्यंत पॅन-आधार लिंक करा

उद्यापर्यंत पॅन-आधार लिंक करा

नवी दिल्ली, २८ जून – कर परतावा विवरण (आयटीआर)…

नेदरलॅण्डच्या अध्यक्षांकडून मोदींना सायकल भेट

नेदरलॅण्डच्या अध्यक्षांकडून मोदींना सायकल भेट

►पंतप्रधानांचा चारपैकी दोन रात्र विमानप्रवास, नवी दिल्ली, २८ जून…

ऑक्सफर्ड डिक्शनरीत ‘चना डाळ’

ऑक्सफर्ड डिक्शनरीत ‘चना डाळ’

►६०० नवीन शब्दांना मिळाले स्थान, लंडन, २८ जून –…

दहशतवादाला थारा देऊ नका

दहशतवादाला थारा देऊ नका

►अमेरिका, भारताने पाकला ठणकावले ►ट्रम्प-मोदी यांच्यात सकारात्मक चर्चा, वॉशिग्टन,…

आभाळ फाटलंय्, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही•

आभाळ फाटलंय्, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही•

►मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही ►पुणतांबाच्या शेतकर्‍यांकडून सत्कार, मुंबई,…

मराठवाडा वगळता राज्यात बरसल्या वरुणधारा

मराठवाडा वगळता राज्यात बरसल्या वरुणधारा

नागपूर, २७ जून – बर्‍याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात विशेषत:…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:03
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारतात आंतरराष्ट्रीय सागरी पर्यटनाचे नवे दालन

भारतात आंतरराष्ट्रीय सागरी पर्यटनाचे नवे दालन

=साडेतीन हजार क्षमतेचे १८ मजली पंचतारांकित जहाज मुंबई बंदरातून रवाना =
genting_dreamनवी दिल्ली, [५ नोव्हेंबर] – पंचतारांकित आंतरराष्ट्रीय सागरी पर्यटनाचे नवे दालन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आज मुंबई पोर्ट टस्टच्या माध्यमातून देशात खुले झाले. गेल्या आठवड्यात जर्मनीवरून आलेल्या ‘जेन्टिंग ड्रीम’ या १८ मजली विशालकाय पंचतारांकित जहाजाने मुंबई बंदरात नांगर टाकला होता.
मुंबई बंदरातच नव्हे तर आपल्या देशातही पहिल्यांदाच एवढ्या अवाढव्य जहाजाचे आगमन झाले. आतापर्यंत चित्रपटात वा परदेशातच अशा प्रकारच्या पंचतारांकित सोयीसुविधांनी सुसज्ज असे जहाज पाहता येत होते. मात्र नितीन गडकरी यांनी असे जहाज प्रथमच भारतात आणून आंतरराष्ट्रीय सागरी पर्यटनाचा शुभारंभ मुंबई पोर्ट ट्रस्टमधून केला. तरंगते शहर असेच या जहाजाचे वर्णन करता येईल. पंचतारांकित जहाजातून तुम्ही प्रवास करू शकाल, तुमच्या घरचे लग्न, पार्टी यांचे आयोजन या जहाजावर करू शकाल, असे गडकरी वारंवार पत्रपरिषदेत सांगत होते. पण ते स्वप्न असावे, असा समज होता. पण पंचतारांकित विशालकाय जहाज मुंबई बंदरात आणून ते स्वप्न त्यांनी कल्पकतेने साकार केले.
या पंचतारांकित जहाजातून एकाच वेळी साडेतीन हजार पर्यटक जगाचा प्रवास करू शकतील. या जहाजावर १७०० खोल्या आणि १४२ सूट आहेत. जगाच्या वेगवेगळ्या भागातील व्यंजनांचा आनंद पर्यटकांना देण्यासाठी वेगवेगळी ३५ रेस्टॉरेंट आहेत. डान्सक्लब, चित्रपट थिएटर, स्विमिंग पूल, स्पासोबत मनोरंजनाच्या सर्व सुविधा या जहाजावर आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंदही पर्यटकांना लुटता येणार आहे. या जहाजावर १५०० कर्मचारी पर्यटकांच्या सेवेसाठी आहेत. रात्रीच्या वेळी एलईडी बल्बनी या जहाजावर करण्यात येणार्‍या रोषणाईने पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटते.
हे जहाज पर्यटकांना कोलंबो, सिंगापूर, हॉंगकॉंग, चीन आणि व्हियतनामचा प्रवास घडवत स्वर्गीय सुखाचा आनंद देणार आहे. आतापर्यंत अशा प्रकारच्या सागरी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना परदेशात जावे लागत होते, आता मात्र ही सुविधा मुंबई बंदरातच उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील प्रवासासाठी या जहाजाला हिरवी झेंडी दाखवली.
सागरी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. आतापर्यंत अशा प्रकारच्या जहाजांना बंदरात २४ तास राहण्याची मुभा होती, ती आता ३ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी आकारण्यात येणारे शुल्कही रद्द करण्यात आले आहे. जेन्टिंग ड्रीमसारख्या आणखी ५९ अवाढव्य पंचतारांकित जहाजांनी भारतात या वर्षभरात येण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी २२५ कोटी रुपये खर्च करून मुंबई बंदराचा विकास करण्यात येत आहे. यासाठी २ लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे नवे टर्मिनल तयार करण्यात आले आहे. सध्या येथे २५ हजार चौरस फूटाचे टर्मिनल आहे.
जेंन्टिंगनंतर कोस्टामालिकेतील दुसरे अशाच प्रकारचे कोस्टा नीओ क्लासिका हे पंचतारांकित जहाज २२ नाव्हेंबरला मुंबई बंदरात येणार आहे. या जहाजाची दर १५ दिवसांनी एक फेरी होणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1920 of 2121 articles)


पणजी, [५ नोव्हेंबर] - पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचे संवेदनशील बाजूने कव्हरेज केल्याबद्दल एनडीटीव्हीच्या हिंदी वाहिनीचे प्रक्षेपण एक दिवस बंद ठेवण्याचा ...