Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » भारतात दोन कोटी बांगलादेशी

भारतात दोन कोटी बांगलादेशी

=सरकारची राज्यसभेत माहिती=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर –
kiren-rijiju_2सुमारे दोन कोटी बांगलादेशी घुसखोर देशाच्या विविध भागांमध्ये बेकायदेशीरपणे राहात आहेत, असे गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
भारतात बेकायदेशीर वास्तव्य करीत असलेल्या अशा विदेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे, असे सांगताना ते म्हणाले की, केवळ गठ्ठा मतांवर डोळा ठेवून काही राजकीय पक्ष या घुसखोरांसाठी लाच गालिचा अंथरत असतात.
कोणत्याही वैध प्रवासी दस्तावेजांशिवाय बांगलादेशी नागरिक भारतात प्रवेश करतात. या नागरिकांच्या भारतातील प्रवेशाची कोणतीही अधिकृत माहिती नसल्याने आणि नोंदही होत नसल्याने त्यांची नेमकी संख्या किती आहे, हे सध्या तरी सांगणे कठीण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1179 of 1560 articles)


    वृत्तसंस्था नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर - सिनेसृष्टीनंतर आता क्रीडाजगतातूनसुद्धा मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचे समर्थन करीत आहे. हजार व पाचशेच्या नोटाबंदी ...