Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारताला लक्षात राहील, असे सर्जिकल स्ट्राईक करू

भारताला लक्षात राहील, असे सर्जिकल स्ट्राईक करू

=हाफिज सईदची दर्पोक्ती=
hafiz_saeedलाहोर, [७ नोव्हेंबर] – लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पुन्हा एकदा भारतविरोधात गरळ ओकली. जम्मू-काश्मिरात असलेले आमचे अतिरेकी लवकरच भारतात अशी सर्जिकल स्ट्राईक करणार आहेत, जी भारताला नेहमीच लक्षात राहील, अशी दर्पोक्ती त्याने केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे करायचे होते, ते त्यांनी केले. आता आम्ही करून दाखवणार आहोत. आमचे मुजाहिदीन सर्जिकल स्ट्राईककरिता सज्ज झाले आहेत आणि आमची ही कारवाई भारताला दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहणार आहे, अशी बडबड सईदने मिरपूर येथे रविवारी एका मेळाव्याला संबोधित करताना केली.
भारताने जी सर्जिकल स्ट्राईक केली, ती संपूर्ण जगानेच फेटाळून लावली आहे. पण, आमची कारवाई यापेक्षाही वेगळी राहणार आहे. त्यासाठीची आमची तयारी पूर्ण झाली आहे, असे तो म्हणाला. यावेळ त्याने नवाझ शरीफ सरकारवरही टीका केली. भारतीय जवान काश्मिरी नागरिकांवर अत्याचार करीत असताना शरीफ सरकार शांत बसले आहे. काश्मिरींना पाक सरकार आणि लष्कराच्या संपूर्ण पाठिंब्याची गरज आहे, असेही तो म्हणाला.

शेअर करा

Posted by on Nov 8 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1366 of 1605 articles)


    ♦आजारी महिला व मुलीला दिली आपली आरक्षित जागा ♦स्वत: केला इकॉनॉमीतून विमान प्रवास, नवी दिल्ली, [७ नोव्हेंबर] - भाजपाप्रणीत रालोआ ...