निकालापूर्वीच काँग्रेसला झटका!

निकालापूर्वीच काँग्रेसला झटका!

►व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, नवी दिल्ली,…

त्रिवार तलाकविरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

त्रिवार तलाकविरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

►हिवाळी अधिवेशनात कायदा करण्याचा प्रयत्न, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

दोन अध्यक्षांचे पहिलेच अधिवेशन

दोन अध्यक्षांचे पहिलेच अधिवेशन

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, १५ डिसेंबर – संसदेच्या हिवाळी…

अमेरिका आणि रशियाच्या लढाऊ विमानांमध्ये जुंपली

अमेरिका आणि रशियाच्या लढाऊ विमानांमध्ये जुंपली

वॉशिंग्टन, १५ डिसेंबर – आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि रशिया…

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

काठमांडू, १३ डिसेंबर – पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांमुळे आधीच…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

मुख्यमंत्र्यांच्या तडाखेबंद उत्तराने विरोधकांची बोलती बंद

मुख्यमंत्र्यांच्या तडाखेबंद उत्तराने विरोधकांची बोलती बंद

►४३ लाख शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा ►अपात्र लाभार्थी साडेसहा…

अभिनेता, दिग्दर्शक नीरज व्होरा काळाच्या पडद्याआड

अभिनेता, दिग्दर्शक नीरज व्होरा काळाच्या पडद्याआड

मुंबई, १४ डिसेंबर – ‘रंगीला’, ‘हेरा फेरी’, ‘दौड’, ‘मन’,…

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

नागपूर, १३ डिसेंबर – विधान परिषदेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारतीय व्यावसायिकांना आता सुलभ ब्रिटिश व्हिसा

भारतीय व्यावसायिकांना आता सुलभ ब्रिटिश व्हिसा

=ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांची घोषणा=
pm-modi-british-pm-theresa-mayनवी दिल्ली, [७ नोव्हेंबर] – भारतीय व्यावसायिकांसाठी ब्रिटनमध्ये येण्याकरिता आता व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येईल, अशी घोषणा ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी केली. भारत-ब्रिटन तंत्रज्ञान शिखर संमेलनात त्या बोलत होत्या.
भारताने आपल्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी सुलभ व्हिसा प्रणालीची विनंती यापूर्वी ब्रिटनला केली होती, हे विशेष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या विनंतीचा पुनरुच्चार केला. यावर ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेली व्हिसा प्रणाली आम्ही भारतासाठी अधिक सुलभ रूपात जाहीर करीत आहोत. आम्ही पहिल्यांदाचा कुठल्या देशासाठी असा निर्णय घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी ब्रिटन सरकारने युरोपीय समुदायाबाहेरील देशांमधील नागरिकांसाठी व्हिसाचे नियम यापूर्वी अधिक कडक केले होते, हे येथे उल्लेखनीय. [pullquote]८३०० कोटींचे व्यापारविषयक करार होणार
ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या तीन दिवसीय भारत दौर्‍यादरम्यान सुमारे ८३०० कोटी रुपयांचे व्यापारविषयक करार दोन्ही देशांमध्ये होणार आहेत. व्यापारविषयक कराराशिवाय मध्यप्रदेशातील स्मार्ट सिटी प्रकल्प आणि वाराणसीचा विकास प्रकल्प यांच्याशी संबंधित करारही होणार आहेत. भारतीय गुंतवणूकदार ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असल्याचे मत पंतप्रधान मे यांनी आज सोमवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केले. [/pullquote]
‘मेक इन इंडिया’ महत्त्वाचा दुवा
भारत-ब्रिटन या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांपुढे मोठी आर्थिक आव्हाने आहेत. संरक्षण, उत्पादन आणि विमान व अंतराळ क्षेत्रात दोन्ही देशांसाठी नवीन संधींना भरपूर वाव असून भारत-ब्रिटन संबंधांत ‘मेक इन इंडिया’ महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला. भारत-ब्रिटन तंत्रज्ञान शिखर संमेलनात ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या उपस्थितीत ते बोलत होते.
थेरेसा मे यांना उद्देशून पंतप्रधान म्हणाले, युरोपबाहेरील पहिल्या द्विपक्षीय भेटीसाठी आपण भारताची निवड केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो. भारताचे पारंपारिक ज्ञानाचे प्रचंड भांडार आणि ब्रिटनच्या आधुनिक वैज्ञानिक तंत्राची जोड देऊन आरोग्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणता येतील. किफायतशीर आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत आणि ब्रिटन यांच्यादरम्यान व्यापाराच्या नवीन शक्यता निर्माण होत आहेत.
भारत हा ब्रिटनमधील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा गुंतवणूकदार असून ब्रिटन हा जी-२० गटातील भारतातील सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे, असे ते म्हणाले.
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे प्रथमच तीन दिवसीय भारत भेटीवर आल्या आहेत. त्यांच्यासोबत उद्योजकांचे शिष्टमंडळही भारतात आलेले आहे. आज सोमवारी सकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
अमरावती प्रकल्पात ब्रिटनला स्वारस्य
स्मार्ट सिटी योजनेत डिजिटल तंत्रज्ञान आणि वाढत्या शहरीकरण यांचा संगम आपल्याला आढळून येईल. ब्रिटनने पुणे, अमरावती आणि इंदूर येथील प्रकल्पात यापूर्वीच स्वारस्य दर्शविले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. पुणे, अमरावती आणि इंदूर येथील स्मार्ट सिटी प्रकल्पात शहर विकासासाठी ब्रिटनने तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्य भारताला देऊ केले आहे, हे येथे उल्लेखनीय. या तीन शहरांमधील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि शिक्षण या क्षेत्रात ब्रिटनने सहकार्याचा हात देऊ केलेला आहे.
‘वॉंटेड’ व्यक्तींच्या प्रत्यार्पणाची परस्परांना विनंती
भारताला हव्या असलेल्या ५७ ‘वॉंटेड’ व्यक्तींना सोपविण्याची विनंती आज ब्रिटनकडे करण्यात आली. या ५७ व्यक्तींमध्ये ३६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा-वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील मध्यस्थ ख्रिश्‍चियन मिशेल याचाही समावेश आहे. भारतात केलेल्या गुन्ह्यांबद्दल या व्यक्तींविरुद्ध खटले चालविता येण्यासाठी ही विनंती करण्यात आली. त्याच प्रमाणे ब्रिटनने देखील भारताकडे १७ व्यक्तींच्या प्रत्यार्पणाची विनंती केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्यातील बैठकीदरम्यान प्रत्यार्पणाबाबत चर्चा झाली.
विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांचे प्रत्यार्पण लवकरच?
ब्रिटनद्वारे उद्योगपती विजय मल्ल्या यांचे भारताकडे लवकर प्रत्यार्पण होण्याची शक्यता बळावली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्यातील बैठकीनंतर या शक्यतेला परराष्ट्र मंत्रालयातील अधिकार्‍यांनी दुजोरा दिला. मल्ल्या यांच्या प्रमाणेच आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांनीदेखील ब्रिटनमध्ये आश्रय घेतला आहे. भारतातील कायद्यांना चुकवून मल्ल्या आणि ललित मोदी हे ब्रिटनमध्ये आहेत. एकमेकांच्या देशांतील गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यास मुभा मिळू नये, असे एकमत आज सोमवारी पंतप्रधान मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या बैठकीत झाले, याकडे परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव रणधीर जैस्वाल यांनी लक्ष वेधले.

शेअर करा

Posted by on Nov 8 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2790 of 3055 articles)


=खासगी इमेल सर्व्हर वापर: अखेरच्या क्षणी मिळाला दिलासा= वॉशिंग्टन, [७ नोव्हेंबर] - अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआयने डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार ...