Home » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » ममता, केजरीवालच्या सभेत ‘मोदी जिंदाबाद’चे नारे

ममता, केजरीवालच्या सभेत ‘मोदी जिंदाबाद’चे नारे

=दोन्ही मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर
kejriwal-mamata-rally-leadचलनविषयक परिस्थितीवरून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज गुरुवारी एका सभेत जोरदार टीका केली. या सभेच्या सुरूवातीस बराच गोंधळही झाला. रॅलीमध्ये मोदी जिंदाबादचे नारे लागले. या घोषणाबाजीमुळे सभा विस्कळित स्वरुपात झाली. आझादपूर सब्जी मंडी येथे पोहोचण्यापूर्वी दोन्ही मुख्यमंत्र्यांना अनेकांनी काळे झेंडे दाखविले.
नवी दिल्लीत भारतीय रिझर्व्ह बँकेबाहेर ममता आणि केजरीवाल यांनी सभा घेतली. या सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, लोकांना भाजी अन् खाण्या-पिण्याच्या वस्तू मिळाल्या नाहीत, तर ते एटीएम खातील का? देशाची आर्थिक स्थिती बिघडत असल्याचे मला जाणवले. त्यामुळेच मी राष्ट्रपतींना निवेदन दिले. आम्ही संसदेतही सरकारच्या निर्णयाचा विरोध करीत आहोत.
तुम्ही आमच्या बोटाला काळी शाई लावत आहात. आम्हाला तुम्ही चोर समजता का? तुम्हाला जर काळ्या पैशाच्या विरोधात कारवाई करायची असेल तर, विदेशात साठवलेला पैसा देशात आणा.
या  रॅलीत केजरीवाल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांसमोर देशभक्तीच्या आडून घोटाळे करीत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही.

शेअर करा

Posted by on Nov 18 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1512 of 1951 articles)

    arun-jaitley9
    ♦२२ हजार ५०० एटीएमची पुनर्रचना ♦२ हजारांच्या नवीन नोटा मिळणार, वृत्तसेवा नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर हजार रुपयांची नवीन नोट एवढ्यातच ...