×
मतांचे नाही, विकासाचे राजकारण

मतांचे नाही, विकासाचे राजकारण

►आमच्यासाठी देशवासी सर्वतोपरी ►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, शहनशाहपूर, २३…

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

►रविशंकर प्रसाद यांची स्पष्ट भूमिका, नवी दिल्ली, २३ सप्टेंबर…

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

►शबीर शहाची कबुली ►ईडीचे आरोपपत्र दाखल, नवी दिल्ली, २३…

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

►संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सुषमा स्वराज यांचा घणाघात ►निष्पाप लोकांचे…

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

संयुक्त राष्ट्रसंघ, २३ सप्टेंबर – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार…

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

►कारण एकच, पाकचे दहशतवादी धोरण, न्यूयॉर्क, २३ सप्टेंबर –…

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

►दोन हजार कोटींचा आराखडा तयार, पंढरपूर, २३ सप्टेंबर –…

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

►मराठमोळ्या मसुरकरची मोठी भरारी, मुंबई, २२ सप्टेंबर – मराठमोळे…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

॥ परराष्ट्रकारण : अनय जोगळेकर | भारत-जपान संबंधांची चर्चा…

रोहिंग्यावर दया नकोच

रोहिंग्यावर दया नकोच

॥ विशेष : डॉ. प्रमोद पाठक | सुमारे दोन-तीन…

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:19
अयनांश:
Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » मला हटविणे बेकायदेशीर : सायरस मिस्त्री

मला हटविणे बेकायदेशीर : सायरस मिस्त्री

  • रतन टाटांवर आरोपांच्या फैरी
  • बचावाची संधी आणि निर्णयस्वातंत्र्य दिले नाही
  • शेअर्समध्ये पुन्हा घसरण

New Delhi:  **FILE** File photo of Cyrus Mistry whom Tata Sons on Monday removed as its Chairman, nearly four years after he took over the reins of the group. PTI Photo (STORY DEL66) (PTI10_24_2016_000175A)

मुंबई, [२६ ऑक्टोबर] – टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून तडकाफडकी हटवण्याच्या निर्णयावर सायरस मिस्त्री यांनी संचालक मंडळातील सदस्य आणि टाटा ट्रस्टला ई-मेल पाठवून आज आपला संताप व्यक्त केला. टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांच्यावर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. संचालक मंडळाच्या  निर्णयाने आपल्याला धक्का बसला असून हा निर्णय बेकायदेशीर  असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण चेअरमनपदावर असताना रतन टाटा यांच्याकडून एकसारखा हस्तक्षेप सुरु होता. माझ्या अधिकारांमध्ये सतत कपात करून अखेरीस मला ‘नामधारी अध्यक्ष’ बनविण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.
आपण समूहाची सूत्रे स्वीकारल्यानंतर  टाटा सन्सने अनेक नियमांमध्ये बदल केला. त्यामुळे आपल्याला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले नाही. कंपनीच्या अध्यक्षाला त्याची बाजू मांडू न देता हटविण्यात आले. कॉर्पोरेट क्षेत्राच्या इतिहासातील अशा पद्धतीचा हा एकमेव निर्णय असेल, असे सायरस मिस्त्री यांनी म्हटले आहे. नॅनो प्रकल्प तोट्यात असतानाही, भावनिक कारणांसाठी रतन टाटा यांनी तो सुरू ठेवला. यामुळे समूहास नुकसान सहन करावे लागले.
मी अध्यक्षपदासाठी सुरूवातीला नकार दिला होता. स्वत:चा व्यवसाय पुढे नेण्यामध्ये मला जास्त स्वारस्य होते. मात्र निवड समितीला योग्य उमेदवार सापडला नाही. मला फेरविचार करण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी टाटा समूहाचे हित डोळयासमोर ठेऊन अध्यक्षपद  स्वीकारण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. पण नियुक्तीनंतर पूर्ण स्वातंत्र्य मिळाले नाही.
कुठलेही स्पष्टीकरण न देता मला हटविले. त्यामुळे माझे आणि समूहाच्या प्रतिमेची मोठी हानी झाली आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आपण  भविष्यकालीन योजना सादर केली होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आल्याने टाटा समुहातील कंपन्यांच्या शेअर्सवर आज बुधवारी परिणाम झाला. कंपनीच्या समभागांची पुन्हा घसरण झाली. टाटा समूहातील कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे १० हजार रुपयांनी दुसर्‍या दिवशीही कमी झाले.

एक लाख १८ हजार कोटींचा फटका बसेल
नफ्यात नसलेल्या उद्योगांमध्ये टाटा समूहातील पाच कंपन्यांची मोठी  गुंतवणूक आहे. त्यामुळे  समूहाला एक लाख १८ हजार कोटींचा फटका बसू शकतो, असे सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळातील सदस्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.

कॉर्पोरेट व्यवस्थेचा अभाव
टाटा समूहात कॉर्पोरेट व्यवस्थेचा अभाव आहे. टाटा उद्योगसमूहामधील भागधारकांसाठी असलेले कर्तव्य पार पाडण्यात संचालक मंडळ अपयशी ठरले आहे. समूहात सत्तेची समांतर केंद्रे तयार झाली आहेत. आपल्याला अखेरीस केवळ ‘नामधारी’ अध्यक्ष बनविण्यात आले, असा ठपका सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहावर ठेवला आहे. कुटुंबाच्या ट्रस्टमधील अनेक सदस्य ‘पोस्टमन’ची भूमिका निभावत असत. वारंवार बैठक सोडून सूचना घेण्यासाठी ते रतन टाटा यांच्याकडे जात, अशी टीकाही त्यांनी केली.

शेअर करा

Posted by on Oct 27 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1513 of 1583 articles)


नवी दिल्ली, [२६ ऑक्टोबर] - २०१९ पर्यंत रस्ते अपघातातील बळींची संख्या अर्ध्यावर आण्याचा निर्धार व्यक्त करत मोटर वाहन (दुरुस्ती) विधेयक ...