Home » कर्नाटक, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या कार्यालयांवर आयकर धाडी

माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या कार्यालयांवर आयकर धाडी

वृत्तसंस्था
बंगळुरु, २१ नोव्हेंबर –
jnardan-reddyमाजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानावर आज सोमवारी आयकर विभागाने धाडी घातल्यात. या धाडींमध्ये आयकर विभागासोबत विशेष तपास पथकही (एसआयटी) होते. या धाडीमध्ये महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे.
अवैध खनिकर्मप्रकरणी साडेतीन वर्षे तुरुंगवास भोगलेले माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचा नुकताच झालेला शाही विवाह सोहळा या धाडींसाठी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते टी. एम. मूर्ती यांनी या लग्नात झालेल्या खर्चाची तक्रार आयकर खात्याकडे केली होती.
कर्नाटकमधील बेल्लारी येथे रेड्डी बंधुंचा खाण उद्योग आहे. रेड्डी यांनी मुलीच्या लग्नासाठी शेकडो कोटी रुपये खर्चून विवाह साजरा केला होता. या शाही विवाह सोहळ्याची देशभरात चर्चा होती. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर अशा प्रकारे पैशांची उधळण करण्यात आल्याने सरकारलाही टीकेचा सामना करावा लागला.  देशभर चर्चा झालेल्या या विवाह सोहळ्यात आयकर विभागाचे अधिकारी वेश बदलून हजर होते, असे सूत्रांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under कर्नाटक, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in कर्नाटक, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (1441 of 1930 articles)


    =सर्वसामान्यांना मोठा दिलासा= वृत्तसंस्था मुंबई, २१ नोव्हेंबर - नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात चलनी नोटांचा प्रचंड तुटवडा असल्याने आणि बँका व एटीएममधून ...