गोंधळामुळे विरोधकांचेच नुकसान

गोंधळामुळे विरोधकांचेच नुकसान

►प्रणव मुखर्जी यांच्या कानपिचक्या ►•संसदेतर्फे भावपूर्ण निरोप, श्यामकांत जहागीरदार…

‘सुपरफास्ट ट्रेन’च्या नावाखाली वसुली थांबवा : कॅग

‘सुपरफास्ट ट्रेन’च्या नावाखाली वसुली थांबवा : कॅग

►प्रवाशांकडून पैसे अधिक, गाड्या मात्र उशिरा, आग्रा,२३ जुलै –…

निवृत्तीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करणार वाचन, लेखन

निवृत्तीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करणार वाचन, लेखन

►१० राजाजी मार्ग स्वागतास तयार,  नवी दिल्ली, २३ जुलै…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

गायीतील अँटिबॉडीजमुळे एचआयव्हीचा परिणाम कमी

गायीतील अँटिबॉडीजमुळे एचआयव्हीचा परिणाम कमी

►•‘नेचर’मधील अहवाल • ►गायींचे संवर्धन करण्यावर भर, वॉशिंग्टन, २३…

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

►अमेरिकेचे दोन दिवसात दोन धक्के, वॉशिंग्टन, २१ जुलै –…

अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट!

अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट!

►आधी नाव कुणाचे? इंदिरा गांधी की पवार? ►कॉंग्रेस, राष्ट्रवादीची…

सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य हात पाठीशी

सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य हात पाठीशी

►मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट, शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा, मुंबई, २२ जुलै –…

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

►मुंबईतील दीड लाख शेतकर्‍यांना कर्ज माफी ►२८७ कोटी वाटले,…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 19:01
अयनांश:
Home » छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक » मातृशक्ती जागृत झाल्यावरच भारताचा विकास: भागवत

मातृशक्ती जागृत झाल्यावरच भारताचा विकास: भागवत

⇒भारतीय विचारधारेतच जगातील समस्या सोडवण्याचा मार्ग  
⇒रा. से. समितीच्या त्रिदिवसीय प्रेरणा शिबिराचे उद्‌घाटन,
sarsanghchalak-dr-bhagwat-inogreated-rashtra-sevika-samiti-shibirश्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, [११ नोव्हेंबर] – भारतीय मूल्यांसह मातृशक्ती जागृत होणार नाही तोपर्यंत भारताचा विकास होऊ शकणार नाही, आणि जोपर्यत भारताचा विकास होणार नाही, तोपर्यंत जगातील समस्या सोडवण्याचा मार्ग प्रशस्त होणार नाही, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज येथे केले.
राष्ट्र सेविका समितीच्या स्थापनेला ८० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राजधानी दिल्लीच्या छतरपूर परिसरातील अध्यात्म साधना केंद्राच्या वर्धमान सभागृहात आयोजित अखिल भारतीय प्रेरणा शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. भागवत बोलत होते. जैनमुनी जयंतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला रा. से. समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम् सीता, स्वागत समितीच्या अध्यक्ष सुनीता भागचंद्रिका आणि उपाध्यक्ष शकुंतला गुप्ता उपस्थित होत्या.
मुलांवर संस्कार करण्याचे काम आईच करत असते. त्यामुळे मातृशक्ती जागृत झाली तरच समाजात परिवर्तन येईल, मात्र यासाठी मातृशक्ती सक्रीय आणि सामर्थ्यवान झाली पाहिजे, सामर्थ्यवान मातृशक्तीच्या आधारानेच भारताला त्याचे  परमवैभव आपण मिळवून देऊ शकतो, असे स्पष्ट करत डॉ. भागवत म्हणाले की, भारतीय संस्कृतीतील मूल्य जपण्याची गरज आहे. नीतिमत्ता आणि संस्कार आपल्याला जपावे लागतील. धर्म माणसाला एकत्र ठेवण्याचे, जोडण्याचे काम करतो. धर्म म्हणजे फक्त पूजापद्ध्‌ती नाही, तर जीवन जगण्याचा मार्ग आणि प्रेरणाही आहे.
कुटुंबव्यवस्था हा आपल्या समाजाचा आणि संस्कृतीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळेच भारतातील कुटुंबव्यवस्थेबद्दल पाश्‍चात्त्य जगात कुतूहल आहे, तो त्यांच्या अभ्यासाचा विषय झाला आहे, याकडे डॉ. भागवत यांनी लक्ष वेधले.
जगात परिवर्तन वेगाने होत आहे, पण या परिवर्तनातून आपल्याला अपेक्षित असा बदल आतापर्यंत घडून आला नाही. त्यामुळे जगातील बदलत्या स्थितीचा विचार करुन आपल्याला आपल्या कामाची दिशा ठरवावी लागणार आहे, याकडे लक्ष वेधत डॉ. भागवत म्हणाले की, परिस्थितीत बदल झाला तरी जगातील समस्या कायम आहे, या समस्या सोडवण्याचा मार्ग जगाला सापडला नाही. समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आपण करून पाहिल्या. पण जगातील समस्यांचे निराकरण झाले नाही.
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती झाली. यामुळे माणसाचे जीवन सुसह्य आणि सुखवस्तू झाले. काळाच्या ओघात आणखी असेच बदल विज्ञान आणि तंत्रज्ञानाने होणार आहे. आज ई मेल आणि अन्य तंत्रज्ञानामुळे डाक खात्याची गरज कमी झाले. असे बदल समाजाच्या सर्व क्षेत्रात पुढेही होणार आहे. आणि या बदलांना आपल्या काळानुरूप सामोरेही जावे लागणार आहे. एक वेळ अशी येईल की शेतीपासून सर्व कामे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे होतील, माणसाला करण्यासाठी कामेच उरणार नाही. त्यामुळे रिकामे डोके सैतानाचे घर अशी माणसाची स्थिती होईल, जी धोकादायक आहे. याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे.
आपल्या स्वार्थासाठी माणसाने नैसर्गिक साधनसंपत्तीचे अमर्याद दोहन केले, ज्याचा परिणाम पर्यावरणावर झाला, पर्यावरणाची प्रचंड हानी झाली, असे स्पष्ट करत डॉ, भागवत म्हणाले की, पर्यावरणाच्या हानीमुळे झालेल्या समस्येवर विचार करण्यासाठी ब्रॉझिल, पॅरिस येथे अनेक बैठका झाल्या, पण याठिकाणी झालेल्या बैठकीतून काही साध्य झाले नाही. समस्येवर मार्ग आम्ही काढू शकलो नाही. कारण समस्यांच्या मुळापर्यंत आम्ही गेलो नाही. कोणत्याही गोष्टीवर ठोस पावले उचलली नाही. त्यामुळे आता आणिबाणीची स्थिती आली आहे. वाहत्या ऊर्जेचा वापर करण्याची आणि स्थिर ऊर्जेचा वापर थांबवण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. पर्यावरणाचा बळी देऊन होणारा विकास आम्हाला नको आहे, तर पर्यावरणाचे रक्षणासोबतचा विकास अपेक्षित आहे. जिओ और जीने दो हा मार्ग आम्हाला अवलंबावा लागेल.
जगात वाढत असलेल्या कट्टरतेवर डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणातून चिंता व्यक्त केली. जगात वारंवार युद्धजन्य स्थिती निर्माण होत आहे. युध्द बंद करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात नाही, असे ते म्हणाले. अहिंसा हाच जगातील सर्व समस्यांवर एकमात्र उपाय असल्याचे ते म्हणाले. जगातील सर्व समस्यांवर तोडगा काढण्याची ताकद भारतीय संस्कृती आणि विचारधारेत असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले.
जैनमुनी जयंतकुमार
रा. स्व. संघ आणि जैन धर्मातील मुनी करत असलेल्या कामात खूप साम्य आहे. एकाच प्रवाहाचे हे दोन किनारे आहेत, असे जैनमुनी जयंतकुमार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. व्यसनाधीनता ही आज आपल्या देशातील सर्वांत मोठी समस्या झाली, त्यामुळे व्यसनाधीनतेविरोधात कठोर उपाययोजना करण्यासाठी संघाने सरकारला सूचना करावी, अशी मागणी जैनमुनी यांनी केली.
कोणतीही संघटना यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे, त्याची कार्यपद्धती कशी असली पाहिजे, याचा आढावा त्यांनी घेतला. समाजातील अनिष्ट प्रथा-परंपरा दूर करण्यासाठी जैन धर्म करत असलेल्या कामाकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रमुख संचालिका शांताक्का यांनी डॉ. मोहनजी भागवत आणि जैनमुनी जयंतकुमार यांचे स्वागत केले. स्वागताध्यक्ष सुनिता भागचंद्रिका यांनी स्वागतपर भाषण केले. समितीच्या अ. भा. संपर्कप्रमुख सुनिता हळदेकर यांनी यांनी प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला. प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम सीता यांनी प्रास्ताविक केले. प्रेरणांजली या विशेषांकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. यावेळी अंजनगान सुर्जीच्या मठाचे जितेंद्रनाथ महाराज, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपालजी, समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कॅशलेस ट्रान्झॅक्शनची स्थिती
५०० आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचा उल्लेख करत डॉ. भागवत म्हणाले की, जगात सातत्याने सुरू असलेल्या परिवर्तनामुळे आज या नोटा रद्द कराव्या लागल्या. उद्या सर्वच चलन रद्द होऊ शकेल. जगात कॅशलेस ट्रान्झाक्शनची स्थिती निर्माण होईल. त्यामुळे या बदलांचा सामना करण्यासाठी माणसाने तयार राहिले पाहिजे.

बहुध्रुवीय व्यवस्था
सुरुवातीला जगात अमेरिका आणि रशिया असे दोन ध्रुव होते, पण नंतर रशिया कमकुवत झाल्यामुळे अमेरिका हा एकच ध्रुव उरला. पण स्वत:ला सर्वशक्तिमान समजला जाणारा अमेरिकाही नंतर कमजोर झाला. आता तर जगात बहुध्रुवीय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे स्पष्ट करत डॉ. भागवत म्हणाले की, अमेरिकेसोबत रशियाही ताकदवान होत आहे. चीनही मुसंडी मारण्याच्या स्थितीत आहे. जपान आणि जर्मनीही आपली ताकद वाढवत आहे.

संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी
डॉ. हेडगेवार यांनी १९२० मध्ये नागपुरात झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात गोहत्या बंदी आणि संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा प्रस्ताव दिला होता. पण कॉंग्रेसने हे प्रस्ताव फेटाळले असे स्पष्ट करत डॉ. भागवत म्हणाले की, जगाच्या व्यापक कल्याणाच्या हेतूने हे प्रस्ताव डॉ. हेडगेवार यांनी दिले होते.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक (2038 of 2388 articles)


=रोख संपल्याने गोंधळ= [gallery ids="3023,3024,3025,3026,3027"] नवी दिल्ली, [११ नोव्हेंबर] - आज शुक्रवारी एटीएम सुरू झाल्यानंतर सुमारे दोन तासांमध्येच त्यात खडखडाट ...