Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » माध्यमांवर नियम लादणार नाही

माध्यमांवर नियम लादणार नाही

=स्वयंशिस्त केव्हाही चांगली : नायडू=
venkaiah-naidu2नवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] – देशातील प्रसारमाध्यमांवर कोणतेही नियम लादण्याचा सरकारचा विचार नाही. स्वयंशिस्त केव्हावी चांगली असते, अशी भूमिका केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज गुरुवारी विशद केली. त्याचवेळी नायडू यांनी सोशल मीडिया पूर्णपणे सैराट झाले असल्याची टीका केली.
भारतासारख्या लोकशाहीत, येथील मुक्त समाजात जिथे राज्य घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पूर्ण हमी दिली आहे, तिथे तुम्ही प्रसारमाध्यमांवर नियम लादू शकत नाही, असे माझे स्पष्ट मत असल्याचे नायडू यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
प्रत्येकांनी स्वत:ला शिस्तीच्या बंधनात बांधून घ्यायला हवे. यासाठी कोणत्याही विधेयकाची गरज नाही, तर राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कौशल्य आवश्यक आहे. पण, काही क्षेत्रांमध्ये नेमका याचाच अभाव असल्याचे जाणवत आहे, असे सांगताना नायडू म्हणाले की, दिवस संपेपर्यंत कोणी जर त्याचे उल्लंघन केले, तर या देशात कायदा आहे आणि तो स्वत:हून कारवाई करण्यास समर्थ आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा योग्य वापर व्हायला हवा. इतरांनी देखील अशा स्वातंत्र्याचे स्वागत करायला हवे. जेव्हा या स्वातंत्र्यांचा कायद्याच्या चौकटीबाहेर जावून वापर होतो, तेव्हा आपल्या देशातील न्यायव्यवस्थेचा हस्तक्षेप अनिवार्य होत असतो. आम्हाला कोणावरही निर्बंध घालायचे नाही आणि नियमाच्या बंधनातही अडकवायचे नाही. प्रत्येकांनी आपली जबाबदारी ओळखावी आणि त्यानुसार काम करावे, एवढीच अपेक्षा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील प्रसारमाध्यमांवर कोणतेही नियम लादण्यात आले नसले, तरी त्यांनी देशविरोधी ठरावे, असे कोणतेही कृत्य करू नये, देशाच्या विरोधात प्रचार करू नये आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देऊ नये, एवढी आपल्या सरकारची रास्त अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
सेन्सॉरवरील नियमात बदल होणार
अनेक वादांचे केंद्र ठरत असलेल्या सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी सिनेमाटोग्राफीच्या सुमारे सहा दशक जुन्या कायद्यात बदल करण्यावर आपले सरकार विचार करीत आहे, असे संकेतही नायडू यांनी यावेळी दिले. न्या. मुडगल समिती आणि बंगाल समितीने याच अनुषंगाने काही शिफारसी केल्या असून, मी स्वत: त्यांचा अभ्यास करीत आहे. तथापि, कायद्यातील बदलांवरील विधेयक संसदेत केव्हा येणार, याबाबत मी आताच काही सांगू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1737 of 1817 articles)

    narandra-modi-7
    =पंतप्रधानांचा सनदी अधिकार्‍यांना सल्ला= नवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] - राजकारण धोरणांपेक्षा मोठे असू नये, असा मोलाचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी ...