Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » मुख्यमंत्र्यांची यशस्वी शिष्टाई; निर्मात्यांना ५ कोटी दंड

मुख्यमंत्र्यांची यशस्वी शिष्टाई; निर्मात्यांना ५ कोटी दंड

  • ‘ए दिल है’ची मुश्किल अखेर दूर
  • चित्रपटाच्या सुरुवातीला शहीदांना श्रद्धांजली
  • पाकी कलाकारांसाठी पाच कोटींचा दंड

devendra-fhadnavis

तभा वृत्तसेवा
मुंबई, [२२ ऑक्टोबर] – पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आज अखेर मोकळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही अटींसह चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतला. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या सुरुवातीलाच उरी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. त्यामुळे ‘ए दिल है’ची मुश्किल अखेर दूर झाली, असेच म्हणावे लागेल.
करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात पाकिस्तानी कलाकारांची भूमिका आहे. उरी येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाल्यानंतर देशभरात पाकविरोधात संतापाची लाट उसळली होती. हिंदी चित्रपट सृष्टीत काम करणार्‍या पाकी कलाकारांविरोधात राज ठाकरे यांनी कठोर भूमिका घेतल्याने या सर्वच कलाकारांना भारत सोडावा लागला होता. या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देणार नाही, असा आक्रमक पावित्राच राज ठाकरे यांनी घेतल्याने प्रचंड वाद निर्माण झाला आणि हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचला होता. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी करण जोहर आणि मुकेश भट यांना ठोस आश्‍वासन देतानाच, उर्वरित जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सोपवली होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज आपल्या वर्षा निवासस्थानी राज ठाकरे, करण जोहर आणि मुकेश भट यांना भेटीला बोलावले. सुमारे तासभर झालेल्या या चर्चेत राज ठाकरे यांनी भविष्यात कोणत्याही पाकिस्तानी कलाकार व तंत्रज्ञाला चित्रपटात घेऊ नका, सैन्य कल्याणनिधीत प्रत्येकी पाच-पाच कोटी रुपये जमा करा आणि चित्रपट सुरू होण्याआधी शहीदांना श्रद्धांजली देणारी फलक दाखवा, अशा अटी घातल्या. निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्या लगेच मान्य केल्या. पाकिस्तानी कलाकार फवाद खानची  या चित्रपटात भूमिका असून, मनसेच्या विरोध आंदोलनामुळे त्याने गुपचूप भारतातून पलायन केले होते.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1530 of 1568 articles)


=संसदेला विश्‍वासात घेऊनच समान नागरी कायद्याबाबत निर्णय= हैदराबाद, [२२ ऑक्टोबर] - तिहेरी तलाक प्रथा बंद करण्याची वेळ आलेली आहे. ही ...