Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » मोदींच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान

मोदींच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान

supreme-court_6नवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] – अतिरेक्यांची आर्थिक नाकेबंदी करतानाच भ्रष्टाचार रोखणे व नकली नोटांचे रॅकेट उद्‌ध्वस्त करण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील एका वकिलाने याबाबतची याचिका न्यायालयात दाखल केली आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा व लोकांना दैनंदिन गरजांसाठी पैसे खर्च करण्याची संधी दिली जावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
चलनी नोटा रद्द केल्याने रुग्णालयांमध्ये देखील रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला जात आहे. लग्नसराईचा काळ असल्याने लग्नातही अडथळे येत आहेत. सरकारने लोकांना मुळीच वेळ न देता हा निर्णय घेतल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत, याकडे याचिकाकर्त्याने न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. मात्र, सुनावणी करायची की नाही, याबाबतचा निर्णय उद्या गुरुवारी घेतला जाणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 10 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (1424 of 1692 articles)


    ♦इंग्लंड ४ बाद ३११ धावा ♦रूट १२४, मोईन अली नाबाद ९९ ♦आर. अश्‍विनचे २ बळी, उमेश यादव, जडेजा प्रत्येकी १ ...