Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मौलाना आझादांना गांधी घराण्याने भारतरत्न का दिला नव्हता?

मौलाना आझादांना गांधी घराण्याने भारतरत्न का दिला नव्हता?

=रविशंकर प्रसादांचा सवाल=
ravi-shankar-prasad-2हैदराबाद, [६ नोव्हेंबर] – कॉंगे्रसने देशावर इतकी वर्षे राज्य केले असताना या काळात नेहरू-गांधी घराण्याने मौलाना आझाद यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने का सन्मानित केले नव्हते, असा सवाल भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला.
प्रसाद यांनी यावेळी कॉंगे्रस नेते एस. जयपाल रेड्डी यांच्यावरही जोरदार टीका केली. पं. जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात कोणतेही मतभेद नव्हतेच, असा दावा रेड्डी करतात. पण, नेहरू आणि पटेल यांच्यातील मतभेदाची माहिती संपूर्ण देशालाच होती. १९४८ मध्ये निझामांची सत्ता असलेल्या आणि नंतर भारतीय महासंघात सहभागी झालेल्या हैदराबादेत पोलिस कारवाई करण्याच्या मुद्यावरूनही त्यांच्यात सुरुवातीला तीव्र मतभेद उफाळून आले होते, याकडेही प्रसाद यांनी वृत्तसंस्थेच्या मुलाखतीतून लक्ष वेधले.
मी वस्तुस्थितीला अनुसरून बोलत नाही, व्यर्थ बडबड करीत आहो, असे जयपाल रेड्डी यांचे म्हणणे आहे. पण, माझे बोलणे व्यर्थ नसून, सत्यता आहे, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. भारताला संघटित करणारे सरदार पटेल यांचा मृत्यू १९५० मध्ये झाला असताना त्यांना १९९१ मध्ये भारतरत्नने का सन्मानित करण्यात आले, असा सवाल त्यांनी केला.
पटेल यांच्या मृत्युनंतर जवाहरलाल नेहरू १४ वर्षे पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांच्या कन्या इंदिरा गांधी १६ वर्षे पंतप्रधान होत्या. राजीव गांधी हे देखील या पदावर होते. या काळात त्यांनी लोकांना त्यांनी केलेल्या देशसेवेसाठी भारतरत्नने सन्मानित केले. पण, महान कार्य करणारे सरदार पटेल दुर्लक्षित राहिले. त्यांना या सर्वोच्च पुरस्काराने नेहरू-गांधी घराण्याशी कोणताही संबंध नसलेले पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनीच सन्मानित केले. इतकेच नव्हे, तर १९५८ मध्ये निधन झालेले मौलाना आझाद या आणखी एका महान भारतीय नेत्यालाही गांधी घराण्याने या सन्मानापासून वंचित ठेवले होते. १९९२ मध्ये त्यांना देखील नरसिंहराव यांनीच या पुरस्काराने गौरविले होते, याकडेही प्रसाद यांनी लक्ष वेधले.
नेहरू आणि गांधी घराण्यातील सदस्यांचा आणि कॉंगे्रस नेत्यांचा एकूणच व्यवहार पाहून माझे असे ठाम मत झाले आहे की, ज्या लोकांनी जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली, त्यांना ते ज्या सन्मानासाठी पात्र होते, तो या नेत्यांनी मुद्दाम नाकारला होता, असा आरोपही प्रसाद यांनी केला.

शेअर करा

Posted by on Nov 7 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1603 of 1817 articles)

  Army's 'School Chalo' operation in Kashmir
  =मोफत कोचिंगचीही सुविधा= अवंतीपुरा, [६ नोव्हेंबर] - बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर हिंसाचाराच्या आगीत होरपळलेल्या काश्मीर खोर्‍यात शांतता मोहीम यशस्वीपणे राबविल्यानंतर भारतीय ...