रोहिंग्यांना भारतात थारा नाही : राजनाथ सिंह

रोहिंग्यांना भारतात थारा नाही : राजनाथ सिंह

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर – म्यानमारमधून भारतात आलेले रोहिंग्या…

लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने सहकार व मनुष्यबळ अकादमी स्थापणार

लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने सहकार व मनुष्यबळ अकादमी स्थापणार

►जन्मशताब्दी समारंभाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, नवी दिल्ली,…

नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगींचा नऊ दिवस उपवास

नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगींचा नऊ दिवस उपवास

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर – नवरात्रौत्सवाला आज गुरुवारपासून सुरुवात…

भारतात फुटीचे राजकारण : राहुल

भारतात फुटीचे राजकारण : राहुल

न्यूयॉर्क, २१ सप्टेंबर – भारतात नरेंद्र मोदी सरकारकडून फुटीचे…

पॅरिस कराराच्या पुढे जाऊन काम करू : सुषमा स्वराज

पॅरिस कराराच्या पुढे जाऊन काम करू : सुषमा स्वराज

वॉशिग्टन, २१ सप्टेंबर – पर्यावरण रक्षणासाठी भारत वचनबद्ध असून…

पाकने शांतता, सहकार्यासाठी चर्चेचा मार्ग अनुसरावा : अश्रफ घनी

पाकने शांतता, सहकार्यासाठी चर्चेचा मार्ग अनुसरावा : अश्रफ घनी

संयुक्त राष्ट्रे, २१ सप्टेंबर – पाकिस्तानने आता शांतता, सुरक्षा…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

राज्यभरात पावसाने झोडपले

राज्यभरात पावसाने झोडपले

►हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, पुणे, १९ सप्टेंबर –…

सत्तेतून बाहेर पडण्यास २५ सेना आमदारांचा विरोध

सत्तेतून बाहेर पडण्यास २५ सेना आमदारांचा विरोध

►सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची हवा निघाली ►शिवसेनेत मोठ्या फुटीची शक्यता…

ब्रह्मदेशातील बांगलादेशी

ब्रह्मदेशातील बांगलादेशी

॥ विशेष : रमेश पतंगे | ब्रह्मदेशातील बौद्ध जनता…

‘शहरी नक्षली’ गौरी लंकेश हत्या आणि त्यामागचे राजकारण…

‘शहरी नक्षली’ गौरी लंकेश हत्या आणि त्यामागचे राजकारण…

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | गौरी लंकेश या…

काट्याचा नायटा होण्याआधीच रोहिंग्यांना हकला!

काट्याचा नायटा होण्याआधीच रोहिंग्यांना हकला!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | बांगलादेशी मुस्लिमांनी जशी…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:20
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » ‘यादवी’ तूर्तास शमली

‘यादवी’ तूर्तास शमली

♦सत्तेची नशा डोक्यात आणू नका!
♦मोदींपासून धडा घे! : नेताजींनी अखिलेशला फटकारले, मुख्यमंत्रिपद कायम
♦अमरसिंह मला भावासारखा, शिवपाल यांचे योगदान विसरता येणार नाही
shivpal-mulayam-akhilesh-yadavलखनौ, [२४ ऑक्टोबर] – यादव कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या महाभारतावर तात्पुरता तोडगा काढण्यात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांना आज सोमवारी अखेर यश आले. शिवपाल यादव यांनी पक्षासाठी आजवर जे केले, ते विसरता येणार नाही आणि माझ्या लहान भावाप्रमाणे असलेले अमरसिंह यांनीही मला अतिशय कठीण काळात मदत केली आहे, अशा शब्दात शिवपाल व अमरसिंह यांची पाठराखण करताना मुलायमसिंह यांनी आपले पुत्र आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना चांगलेच फटकारले. सत्तेची नशा डोक्यात शिरू देऊ नका, असा कठोर इशाराच त्यांनी दिला.
शिवपाल यादव हे तळागळातील जनतेचे नेते आहेत. त्यांच्यामुळेच पक्षाने इतकी मोठी प्रगती साधली आहे, तर, अमरसिंह यांनी मला संकटकाळात वाचवले आहे. त्यांची मदत मिळाली नसती तर मला कारागृहात जावे लागले असते. त्यांना सर्व अपराधांबद्दल मी क्षमा केली आहे. तेव्हा अमरसिंह व शिवपाल यांच्याविरोधातील कोणतेही पाऊल मी सहन करणार नाही. मी तुमच्याकडे सत्तेची सूत्रे सोपवली, याचा अर्थ असा मुळीच नाही की, मला आता युवा पिढीचे समर्थनच राहिले नाही. माझ्या एका हाकेवर अजूनही असंख्य युवक धावून येतील, हे लक्षात ठेवा.
अतिशय संघर्ष करून स्थापन केलेल्या समाजवादी पार्टीत सुरू असलेल्या संघर्षामुळे मला अतिशय वेदना होत आहेत. पक्षातील वाद अशा प्रकारे चव्हाट्यावर येत असेल, तर पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीत पक्ष कदापि विजयी होणार नाही. पक्ष मजबूत व एकत्रित राहावा, याच उद्देशाने ही बैठक बोलावली आहे, असे मुलायमसिंह यादव यांनी बैठकीत स्पष्ट केले.
अखिलेश यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविणार नाही. ते या पदावर कायम राहणार आहेत, असे जाहीर करताना त्यांनी अखिलेश यांना खडे बोल सुनावले. तुझी क्षमता काय आहे, तू स्वबळावर निवडणुका जिंकू शकतो काय? आपल्यातील दोषांविरोधात लढण्याऐवजी आपण एकमेकांविरोधात लढत आहोत. डोक्यावर लाल टोपी चढवल्याने कोणी खरा समाजवादी होत नाही. मी अजूनही शक्तिहीन झालो नाही. या पक्षाच्या उभारणीसाठी मी फार कष्ट घेतले आहेत. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांवर वाटचाल करताना गरीब आणि शेतकर्‍यांसाठी बरीच कामे केली आहेत. सध्याचे काही मंत्री हे केवळ स्तुतिपाठक आहेत. फार उड्या मारणारे, वेळ येताच एक काठीही सहन करू शकणार नाही. मोठा विचार न करता येणारे आणि टीका सहन न करणारे कधीच मंत्री होऊ शकत नाहीत. कुणी आपल्यावर टीका केली आणि ती योग्य असेल, तर त्यातून स्वत:च्या कामात सुधारणा करण्यास वाव मिळत असतो, असे सांगताना, आता गुंड, दारुड्यांचा पक्षामध्ये प्रवेश झाला आहे. जे लोक पक्ष तोडण्याची भाषा करतात, त्यांना कसे हाताळायचे, हे मला चांगलेच ठावूक आहे, असेही मुलायमसिंह संतापानेच म्हणाले.
गळाभेट
शिवपाल यादव हे तुझे काका आहेत. ते माझे भाऊ आहेत. निवडणुका तोंडावर असल्याने तुमची ही भांडणे पक्षाच्या आणि राज्याच्याही हितात नाहीत. तेव्हा आपसातील मतभेद मिटविण्यासाठी तुम्ही दोघेही एकमेकांना आलिंगन द्या, अशी सूचना मुलायमसिंह यादव यांनी केली. यानंतर स्वत: अखिलेश आपल्या जागेवरून उठले आणि शिवपाल यांना आलिंगन दिले. पण, त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची मात्र सुरूच होती.
कडाक्याचा वाद
या बैठकीत शिवपाल यादव यांनी, अखिलेश कसा खोटे बोलत आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला असता, अखिलेश त्यांच्यावर जोरदार संतापले. यात मुलायमसिंह यांनी त्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला असता, अखिलेश त्यांच्यावरही ओरडले. मुलायमसिंह आणि अखिलेश यांचा आवाज इतक्या जास्त प्रमाणात वाढल्याने उर्वरित नेतेही शहारून गेले.
मोदींपासून धडा घे!
आपले पुत्र मुख्यमंत्री अखिलेश यांना समज देताना मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवर्जून उल्लेख केला. मोदी यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. समर्पित भावनेने काम करून, प्रचंड संघर्ष करून ते पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत. ते गरीब घरातून आले आहेत आणि आईला सोडू शकत नाही, असे ते आवर्जून सांगतात. त्यांच्या या आदर्शातून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे मुलायमसिंह म्हणाले.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (1965 of 2019 articles)


♦नवीन पक्ष स्थापन करणार नाही ♦नेताजींनी आदेश दिल्यास राजीनामा : अखिलेश लखनौ, [२४ ऑक्टोबर] - समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव ...