भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

•►अमित शाह यांनी दिले ३५० जागांचे लक्ष्य, नवी दिल्ली,…

उषाताई चाटी कालवश

उषाताई चाटी कालवश

►आज मोक्षधाम येथे होणार अंत्यसंस्कार, नागपूर, १७ ऑगस्ट –…

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

►भाजपा, संघावरील आरोपांचा घेतला खरपूस समाचार, नवी दिल्ली, १७…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

►कोरियाच्या जनतेचे धमकावणारे प्रत्युत्तर, प्यॉंगयॉंग, १० ऑगस्ट – आमच्या…

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

►मुख्यमंत्री फडणवीस यांचे सूतोवाच,• प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेच, मुंबई, १७…

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

मुंबई, १३ ऑगस्ट – राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले…

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

►विधानसभेत उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव, मुंबई, १० ऑगस्ट –…

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

मकरंद कुळकर्णी | काश्मिरी जनतेने भारतीय लष्कराच्या क्षमतेवर विश्‍वास…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

•तरंग : दीपक कलढोणे | २० एप्रिल १९३९ रोजी…

३७० कलम संपले तर?

३७० कलम संपले तर?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | नाक दाबले की…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » राज्यसभेतही घोषणाबाजी, कामकाज स्थगित

राज्यसभेतही घोषणाबाजी, कामकाज स्थगित

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर –
rajyasabhaनोटबंदीच्या मुद्यावर आज राज्यसभेतही प्रचंड गदारोळ झाला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. नोटबंदीच्या मुद्यावरून जवळपास दहा दिवसापासून राज्यसभेचे कामकाज ठप्प झाले आहे.
आज सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. ‘गरिबोंका पैसा गरिबोंको दो’ अशा घोषणा विरोधी सदस्य देत होते. पंतप्रधान मोदी यांनी सभागृहात येऊन निवेदन करण्याची संतप्त विरोधकांची मागणी होती. १८ विरोधी पक्षांनी नोटबंदीच्या मुद्यावर आज जनआक्रोश दिनाचे आयोजन केले आहे, मात्र सरकारनेच भारतबंद केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला. नोटबंदीचा निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी त्रासदायक असल्याचे बसपाच्या मायावती म्हणाल्या. विरोधी पक्षांनी भारतबंदचे आयोजन केल्याचा आरोप सरकार करत आहे, पण सरकारनेच नोटबंदीचा निर्णय घेत भारत बंद केला असल्याचा आरोप मायावती यांनी केला. आम्ही भारत बंदमध्ये सहभागी नाही, विरोधाचा आमचा वेगळा मार्ग आहे, असे स्पष्ट करीत मायावती म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी बाहेर भाषणं देतात, पण सभागृहात येण्याची त्यांची हिंमत नाही. नोटबंदीच्या मुद्यावर आपली हुकुमशाही भूमिका सरकारने सोडावी, असे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधान मोदी संसदेचा सामना करत नाही, मात्र दुसर्‍या देशात जाऊन भाषणे देतात, असे माकपचे सीताराम येचुरी म्हणाले. नोटबंदीच्या निर्णयाचा उद्योगांवर प्रतिकूल परिणाम झाल्याचा आरोप सपाचे रामगोपाल यादव यांनी केला. यावेळी विरोधकांची घोषणबाजी सुरूच होती. सभागृहातील गोंधळ शांत होत नसल्यामुळे उपाध्यक्ष कुरियन यांनी कामकाज अर्धा तासासाठी स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधकांची घोषणबाजी पुन्हा सुरु झाली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी १२ पर्यंत स्थगित करण्यात आले. दुपारी १२ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधकांनी वेलमध्ये येत घोषणबाजी सुरु केली. सभागृहात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न उपाध्यक्ष कुरियन करत होते, पण सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे दुपारी २ पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले.
पंतप्रधान मोदी संसदेत येऊन कोणावर उपकार करीत नाही, असे कॉंग्रेसचे आनंद शर्मा म्हणाले. नोटबंदीच्या निर्णयाची माहिती मंत्रिमंडळात कोणालाच नव्हती, अर्थमंत्र्यांनाही नव्हती, त्यामुळे ज्यांना निर्णयाची माहिती होती, त्या पंतप्रधानांनी सभागृहात येऊन विरोधकांच्या आक्षेपांचे निराकरण करावे, असे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले. विरोधकांच्या घोषणबाजीला भाजपा सदस्यही जोरदार प्रत्युत्तर देत होते. सभागृहाबाहेर अपयशी ठरल्यामुळे तसेच काळे पैसेवाले कंगाल झाल्यामुळे तुम्ही सभागृहात गोंधळ घालत आहात, असा आरोप सांसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला. सभागृहातील गोंधळ शांत होत नसल्यामुळे कुरियन यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
… चौकट ….
सरकारी दलाल शब्दावरून गोंधळ
भाजपा सदस्य सरकारी दलाल असल्याच्या सपाचे नरेश अग्रवाल यांच्या विधानावरून राज्यसभेत गदारोळ झाला. सरकारी दलाल या शब्दाला भाजपाच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. दलाल हा शब्द असांसदीय असल्याचा भाजपा सदस्यांचा आक्षेप होता. दलाल हा शब्द कामकाजातून वगळण्याची भाजपा सदस्यांची मागणी होती. त्यासाठी दोन्ही बाजूंनी पुस्तकातील नियमांचा हवाला देण्यात आला. या वादात हस्तक्षेप करीत कुरियन म्हणाले की, मला चांगली हिंदी येत नाही. तुटकीफुटकी हिंदी मला समजते. राजस्थान विधानसभेने दलाल हा शब्द असांसदीय ठरवल्याच्या दाखल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र यावर कॉंग्रेसचे आनंद शर्मा यांनी हरकत घेतली. कोलकाता येथे दलाल स्ट्रिट आहे, अनेकांचे आडनावही दलाल असते, मग ते असांसदीय होईल का, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर ज्या दलाल शब्दासमोर सरकारी हा शब्द येईल, तेव्हाच तो असांसदीय मानला जाईल, असे कुरियन म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1809 of 2367 articles)


वृत्तसंस्था नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर - ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाविरोधात ...