जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

►बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्याच अंतरावर, नवी दिल्ली, २६ जून…

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवी दिल्ली, २६ जून – नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा…

अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

माझे सरकार निष्कलंक

माझे सरकार निष्कलंक

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, २६ जून – माझ्या…

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

क्विन्सटाऊन, २६ जून – न्यूझीलंडमध्ये मद्यपानाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍या…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » राज्यसभेत नोटबंदीवर विरोधकांची एकजूट, सरकारवर हल्ला

राज्यसभेत नोटबंदीवर विरोधकांची एकजूट, सरकारवर हल्ला

♦नोटबंदीच्या मुद्यावरून राज्यसभेत विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्ला
♦प्रचंड आर्थिक घोटाळ्याचा आरोप
♦बातमी फुटल्याची चौकशीची मागणी,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर –
rajyasabhaपाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्यसभेत आज बुधवारी कॉंग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हा निर्णय म्हणजे मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला. नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची गोपनीयता सरकारला राखता आला नाही, जाहीर होण्यापूर्वीच हा निर्णय फुटला, त्यामुळे या प्रकरणाची संयुक्त सांसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी एकमुखाने केली.
आज राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच नोटबंदीच्या मुद्यावर कॉंग्रेस, डावे पक्ष आणि जदयुने स्थगनप्रस्ताव देत चर्चेची मागणी केली. या मुद्यावरून विरोधक आक्रमक होते. त्यामुळे काही वेळ गोंधळ झाला. मात्र सरकारने लगेच या मुद्यावर चर्चेची तयारी दर्शवली आणि गोंधळ शांत झाला. कॉंग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी आपल्या भाषणातून नोटबंदीच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला. त्याला सत्ताधारी पक्षाच्यावतीने ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल आणि मंत्र्यांनी समर्पक उत्तर दिले.
आनंद शर्मा
देशातील चलनात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण ८५ टक्के आहे, सरकारने एका फटक्यात हे चलन बंद केले. हा सारा काळा पैसा आहे का, अशी विचारणा करत आनंद शर्मा म्हणाले की, आपल्या या निर्णयातून भारताची अर्थव्यवस्था काळ्या पैशाच्या भरोशावर चालते, असा संदेश सरकारने संपूर्ण जगात दिला. आपलाच पैसा काढण्यासाठी लोकांवर भीक मागण्याची वेळ सरकारने देशातील जनतेवर आणली आहे. सरकारला प्रश्‍न विचारणार्‍यांना देशाच्या विरोधातील मानले जात आहे, असे शर्मा म्हणाले. आजकाल कोणत्याही प्रश्‍नावर सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली जाते, असे ते म्हणाले. देशातील काळा पैसा असणार्‍यांची यादी सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी भाषणात केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी नोटबंदीच्या मुद्यावर सर्व राजकीय पक्षांची भूमिका पंतप्रधान मोदी यांनी समजून घ्यावी, अशी मागणी केली.
मायावती
देशात आर्थिक आणिबाणी लागू केल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप बसपानेत्या मायावती यांनी केला. नोटबंदीच्या मुद्यावर सभागृहात होणार्‍या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी सहभागी व्हावे आणि चर्चेला उत्तर द्यावे. कारण हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे, असे मायावती म्हणाल्या.
रामगोपाल यादव
सरकारच्या या निर्णयामुळे देशातील जनतेला अनेक व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे सपाचे रामगोपाल यादव म्हणाले. शेतकर्‍यांना लुटले जात आहे, धानाच्या किंमती घसरल्या आहेत, असे ते म्हणाले.
शरद यादव
देशाच्या आत असलेल्या काळ्या पैशावर तर सरकारने कारवाई केली, पण देशाच्या बाहेर असणार्‍या काळ्या पैशावर सरकार कारवाई करू शकत नाही, असे जदयुचे शरद यादव म्हणाले. एनपीएमुळे दिवाळखोरीच्या स्थितीत आलेल्या बँकांना वाचवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप यादव यांनी केला. सरकारचा हा निर्णय म्हणजे चालत्या गाडीतून उडी मारण्यासारखा आहे, असे ते  म्हणाले.  नोटबंदीच्या निर्णयामुळे प्रामाणिक लोकांना रांगेत राहावे लागत आहे, काळा पैसावाले लोक मजा करत आहे, असा आरोप करत शरद यादव म्हणाले की, यामुळे दलालांचे फावले आहे. हजाराची नोट पाचशे रुपयांत घेतली जात आहे. नोटबंदीच्या निर्णयाची माहिती फुटली, याची चौकशी करण्याची मागणीही यादव यांनी केली.
सीताराम येचुरी
या निर्णयामुळे काळ्या पैशाचे चलन थांबू शकत नाही, कारण हा पैसा आधीच बाजारात फिरत आहे, याकडे माकपचे सीताराम येचुरी यांनी लक्ष वेधले. ८६ टक्के चलन काढल्यामुळे आज फक्त १४ टक्के चलनावर आपला देश जिवंत असल्याचा आरोप येचुरी यांनी केला. पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करून दोन हजाराच्या नोटा आणल्यामुळे भ्रष्टाचार आणखी वाढेल, अशी शंकाही येचुरी यांनी व्यक्त केली.
मोठ्या रकमांचे चलन बंद करण्याचा निर्णय याआधी हिटलर, मुसोलिनी आणि गडाफी यांनी घेतला होता, आता मोदीही त्यांच रांगेत आल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रमोद तिवारी यांनी केला. पुरेशी तयारी न करता सरकारने हा निर्णय घोषित केला, असा आरोप करत तिवारी म्हणाले की, देशातील अन्नदात्या शेतकर्‍यांना सरकारने भिकारी बनवले, शेतकरी कधीच सरकारला माफ करणार नाही, असे ते म्हणाले.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल, अण्णाद्रमुकचे नवनीतकृष्ण यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. विरोधक आणि सत्ताधारी पक्षात या मुद्यावर आरोप-प्रत्यारोप झाले, शाब्दिक चकमकीही झडल्या, त्यामुळे अनेकवेळा वातावरण तापले.

राजकीय पक्षांचा विरोध का : पीयूष गोयल
ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी भाषणात विरोधकांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. नोटबंदीच्या निर्णयावर सर्व राजकीय पक्ष सरकारला पाठिंबा देतील, असे मला वाटत होते, पण हे पक्ष याला विरोध का करत आहे, ते मला कळत नाही, असे गोयल म्हणाले.
देशातील जनतेने या निर्णयाचे स्वागत केल्यामुळे तर या सार्‍या राजकीय पक्षांची पंचाईत झाली नाही ना, असे ते म्हणाले. ज्यांनी प्रामणिकपणे पैसा कमवला, त्यांच्या पैशाला कोणताच धोका नाही, मात्र ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे, त्यांचे धाबे दणाणले आहे, याकडे गोयल यांनी लक्ष वेधले. ही सर्जिकल स्ट्राईक असल्याचे आम्ही कधी म्हटले नाही, मात्र कोणी तसे समजत असेल तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, असे ते म्हणाले. देशातील जनतेने या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि त्रास सहन करुन रांगेत उभे राहायलाही त्यांची तयारी आहे, असे गोयल म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1721 of 2113 articles)


=एम्समध्ये भरती, डायलिसिसवर= वृत्तसंस्था नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर - परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून, ...