Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या पगारात वाढ करणार

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या पगारात वाढ करणार

sansad1नवी दिल्ली, [२६ ऑक्टोबर] – राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या पगारात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचे समजते. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. तसे झाले तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या पगारात तीनशे टक्क्यापेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर मंत्रिमंडळ सचिवाचा पगार राष्ट्रपतींपेक्षा जास्त झाला होता.  मंत्रिमंडळ सचिवांना अडीच लाख तर सचिव दर्जाच्या अन्य अधिकार्‍यांना २ लाख २५ हजार रुपये पगार मिळत आहे. देशाचे सर्वोच्च घटनात्मक पद असलेल्या राष्ट्रपतींचा पगार मंत्रिमंडळ सचिवापेक्षाही कमी झाल्यामुळे त्याची चर्चा सुरु झाली होती. परिणामी सरकारची स्थिती अडचणीची झाली होती. त्यामुळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागला आहे.
राष्ट्रपतींना सध्या दीड लाख रुपये पगार मिळतो. तो आता वाढवून ५ लाख रुपये केला जाणार असल्याचे समजते. उपराष्ट्रपतींना सध्या १ लाख २५ हजार रुपये पगार मिळतो, तो वाढवून साडेतीन लाख रुपये केला जाणार आहे. राज्यपालांना सध्या १ लाख १० हजार रुपये वेतन मिळते. माजी राष्ट्रपतींच्या निवृत्तीवेतनातही वाढ केली जाणार आहे. आता माजी राष्ट्रपतींना दीड लाख रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे. याशिवाय त्यांना सहायकासाठी म्हणून दरमहा ३० हजार रुपये  मिळणार आहेत.
यासंदर्भातील प्रस्ताव गृहमंत्रालयाने तयार केला असून तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्याला मंजुरी दिली जाणार आहे. जानेवारी २०१६ पासून ही वेतनवाढ लागू केली जाणार असल्याचे समजते. राष्ट्रपतींच्या पगारात २००८ मध्ये वाढ करुन तो ५० हजारावरुन दीड लाख रुपये करण्यात आला होता.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या पगारात वाढ केल्यामुळे सरकारवर खासदारांच्या वेतनाही वाढ करण्याचा दबाव वाढणार आहे.  ऑगस्टमध्ये २५० खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपल्या वेतन आणि भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र पंतप्रधान मोदी खासदारांच्या वेतन आणि भत्त्यात फारशी वाढ करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समजते.
खासदारांना सध्या ५० हजार रुपये वेतन मिळते. त्यात वाढ करुन ते एक लाख रुपये करण्याची त्यांची मागणी आहे. याशिवाय मतदारसंघ भत्ता आणि सहायकांच्या पगारातही दुप्पट वाढ करण्याची खासदारांची मागणी आहे. फर्निचारसाठी वार्षिक दीड लाख रुपये मिळावे, तसेच निवृत्तीवेतनातही वाढ करण्याची खासदारांची मागणी आहे. सध्या माजी खासदारांना २० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते, त्यात वाढ करुन ते ३५ हजार करण्याची मागणी आहे.

शेअर करा

Posted by on Oct 27 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1925 of 1994 articles)


    =पहिलेच अमेरिकन साहित्यिक= लंडन, [२६ ऑक्टोबर] - अमेरिकेचे लेखक पॉल बेट्‌टी यांना यंदाच्या प्रतिष्ठेच्या ‘मॅन बुकर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ...