Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » राहुल, केजरीवालांविरुद्ध काय कारवाई केली? : कोर्ट

राहुल, केजरीवालांविरुद्ध काय कारवाई केली? : कोर्ट

=सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्‍नचिन्ह=
rahul-gandhi-arvind-kejriwalनवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] – भारतीय लष्कराने गुलाम काश्मिरात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दाखल फौजदारी खटल्यात आतापर्यंत काय कारवाई केली, ती आमच्यापुढे सादर करा, असे निर्देश स्थानिक न्यायालयाने आज पोलिसांना दिले आहेत.
या प्रकरणावरील कृती अहवाल पुढील वर्षी ५ फेब्रुवारीपर्यंत आम्हाला मिळायलाच हवा, असे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी सुनील बेनिवाल यांनी स्पष्ट केले.
पूर्व दिल्लीतील रहिवासी प्रवेश कुमार यांनी राहुल गांधी व केजरीवाल यांच्यासोबतच कॉंगे्रसचे नेते दिग्विजयसिंह व संजय निरुपम, दिल्लीचे जलसंपदा मंत्री कपिल शर्मा आणि अभिनेते ओम पुरी यांच्याविरोधातही फौजदारी खटला दाखल केला आहे.
लष्कराच्या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून या सर्वांनी सर्जिकल स्ट्राईक बनावट आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला. यामुळे देशात भारतीय लष्कराच्या विश्‍वासार्हतेलाच धक्का बसला आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (1735 of 1994 articles)


  जम्मू, [८ नोव्हेंबर] - जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरच्या नियंत्रण रेषेवरील लष्करी तळांवर आणि लोकवस्त्यांवर पाकिस्तानच्या सैनिकांनी आज मंगळवारी सकाळी ...