Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधी, कॉंग्रेस पक्षाचे ट्विटर अकाऊंट हॅक

राहुल गांधी, कॉंग्रेस पक्षाचे ट्विटर अकाऊंट हॅक

=पोलिसात तक्रार, चौकशी सुरू=
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १ डिसेंबर –
rahul-gandhi3कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा ट्विटर अकाऊंट हॅक केल्यानंतर काही वेळातच कॉंग्रेस पक्षाचाही अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्यामुळे कॉंग्रेस पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. याप्रकरणी सरकारने मदत करावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
हॅकर्सने या दोन्ही ट्विटर अकाऊंटवरून पक्षाचे अनेक गोपनीय ईमेलही हॅक केले असावे, त्याचा उपयोग आगामी निवडणुकीच्या काळात पक्षाला अडचणीत आणण्यासाठी केला जाण्याची भीती कॉंग्रेसला भेडसावत आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली असून सरकारने मदतीचे आश्‍वासनही दिले असल्याचे समजते.
आपल्या जवळ कॉंग्रेस पक्षाचे अनेक गोपनीय ईमेल असून ख्रिसमसच्या सुमारास आपण ते जाहीर करू अशी धमकी हॅकर्सने आपल्या ट्विटरवरून दिल्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. बुधवारी रात्री राहुल गांधी यांचा तर गुरुवारी सकाळी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल हॅक करण्यात आले होते. कॉंग्रेस पक्षाच्या ट्विटरवर हॅकरने अनेक आक्षेपार्ह मजकूर टाकला होता, नंतर तो हटवण्यात आला.
राहुल गांधी यांचा ट्विटर हॅक करण्याबाबत रात्री उशिरा पोलिसात तक्रार करण्यात आली असून याबाबत एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्विटरकडे पत्र पाठवून हॅकर्सच्या ट्विटरबाबत माहिती मागवली असल्याचे समजते. सायबर एक्स्पर्टची चमू याप्रकरणी तपास करत आहे. राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षाचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले असले तरी सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न उपस्थित करण्यापासून राहुल गांधींना कोणी रोखू शकणार नाही, असे कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1391 of 1994 articles)


  •मुकेश अंबानी यांची घोषणा •नव्या-जुन्या ग्राहकांना लाभ •नोटबंदीसाठी पंतप्रधानांना पाठिंबा, वृत्तसंस्था मुंबई, १ डिसेंबर - जिओच्या नव्या आणि जुन्या यूजर्संना ...