Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » रिक्षा परवान्यासाठी मराठी अनिवार्य

रिक्षा परवान्यासाठी मराठी अनिवार्य

=मुंबई हायकोर्टाचा दणका=
वृत्तसंस्था
मुंबई, १८ नोव्हेंबर –
mumbai-high-courtमहाराष्ट्रात रिक्षाचालकांना परवाना हवा असल्यास त्यांना या राज्यात सर्वसामान्यांना समजणारी मराठी भाषा यायलाच हवी, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे अमराठी लोकांची मोठी कोंडी होणार असून, प्रांतवादही पुन्हा एकदा डोके वर काढण्याची शक्यता आहे.
स्थानिक प्रदेशात जी भाषा सर्वाधिक बोलली जाते, तीच भाषा जर सार्वजनिक वाहतूकदारांना बोलता येत किंवा समजत नसेल, तर प्रवाशांनी दिलेल्या सूचना त्यांना समजणार कशा, असे न्यायालयाने एका प्रकरणी सुनावणी करताना स्पष्ट केले. रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्यासंदर्भात राज्य परिवहन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकावर स्थगिती देण्यासही न्यायालयाने यावेळी नकार दिला.
महाराष्ट्रात वावरणार्‍या सर्व रिक्षाचालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक आहे. मराठी भाषा न येणार्‍याला परवाना न देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेताना, तसे परिपत्रकही जारी केले होते. या परिपत्रकाला उच्च न्यायालयात मीरा-भाइंदर रिपब्लिकन रिक्षाचालक-मालक संघटनेने आव्हान दिले होते. या परिपत्रकामुळे अनेक अमराठी रिक्षावाल्यांना व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. राज्य सरकार मराठी भाषेची सक्ती करूच शकत नाही. हे परिपत्रक बेकायदेशीर असून ते रद्द करण्यात यावं, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.

शेअर करा

Posted by on Nov 19 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1148 of 1561 articles)

    finance-ministry
    =कडक कारवाईचा अर्थमंत्रालयाचा इशारा= वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर - नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा असणारे अनेक लोक आपला काळा पैसा ...