Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » ‘लष्कराच्या पाठीशी’ हेशब्दांनी नव्हे कृतीने दाखवा

‘लष्कराच्या पाठीशी’ हेशब्दांनी नव्हे कृतीने दाखवा

=राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र=
PTI8_5_2013_000255Bतभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [२९ ऑक्टोबर] – लष्कराबद्दल सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांवर कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. सरकारने शब्दांनी नाही तर कृतीने लष्कर तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांना संकटाच्या या वेळी आम्ही तुमच्यासोबत असल्याचा दिलासा द्यायला पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.
वन रँक वन पेन्शन योजनेतून लष्करी जवानांना न्याय मिळाला नाही, असा आरोप करत राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटले की, लष्करी कारवाईत अपंगत्व आल्यामुळे निवृत्त झालेल्या लष्करी जवानांना मिळणार्‍या निवृत्ती वेतनाच्या श्रेणीत बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला, त्यामुळे या जवानांना मिळणारे निवृत्तीवेतन कमी झाले, हे ऐकून मला धक्का बसला. सातव्या वेतन आयोगातून ही लष्करातील जवान आणि अधिकार्‍यांच्या हातात फारसे काही पडले नाही.
देशातील १२५ कोटी जनतेच्या रक्षणासाठी लष्करातील जवान आपल्या प्राणांचे बलिदान करतात, मात्र यांच्याबद्दल सरकारचे धोरण अन्यायकारक आहे, असा आरोप करत गांधी म्हणाले की, त्यामुळे निवृत्त लष्करी जवानांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. देशाचे रक्षण करतांना जे अपंगत्व येते त्याबद्दल लष्करी जवान आणि अधिकारी कधीच नुकसान भरपाईचा दावा करत नाही. त्यामुळे अपंगत्व आल्यामुळे निवृत्त व्हावे लागलेल्या जवानांना योग्य निवृत्तीवेतन मिळेल, सातव्या वेतन आयागाच्या शिफारसींनुसार लष्करी जवान आणि अधिकारी यांच्यावर अन्याय होणार नाही, तसेच वन रँक वन पेन्शन योजनेमुळे लष्करी जवान तसेच अधिकार्‍यात निर्माण झालेला असंतोष दूर करण्याची जबाबदारी सरकारचे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1718 of 1817 articles)

    isro-logo
    =एकाचवेळी ८२ उपग्रहांच्या प्रक्षेपणाची तयारी= मुंबई, [२९ ऑक्टोबर] - भारताला अंतराळ क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त करून देणार्‍या भारतीय अंतराळ संशोधन ...