ब्राह्मोसची चाचणी यशस्वी

ब्राह्मोसची चाचणी यशस्वी

►जमीन, समुद्र तसेच हवेतून मारा करता येईल अशी जगातील…

नवीन वेतन धोरणाला मंजुरी

नवीन वेतन धोरणाला मंजुरी

►अरुण जेटली यांची माहिती, नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर –…

मंत्री, मुख्यमंत्री व भाजपा नेत्यांना जैशकडून धोका

मंत्री, मुख्यमंत्री व भाजपा नेत्यांना जैशकडून धोका

►गुप्तचर यंत्रणांची माहिती, नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील…

मुगाबेंची ३७ वर्षांची राजवट संपली

मुगाबेंची ३७ वर्षांची राजवट संपली

►अध्यक्षांचा अखेर राजीनामा, हरारे, २२ नोव्हेंबर – झिम्बाब्वेच्या संसदेत…

चीनची उत्तर कोरियाच्या उड्‌डाणांवर बंदी

चीनची उत्तर कोरियाच्या उड्‌डाणांवर बंदी

बीजिंग, २२ नोव्हेंबर – चीनने उत्तर कोरियाच्या सर्व उड्‌डाणांवर…

चीन, उ. कोरियाच्या १३ कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध

चीन, उ. कोरियाच्या १३ कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध

वॉशिंग्टन, २२ नोव्हेंबर – अमेरिकेने चीन आणि उत्तर कोरियातल्या…

२ कोटी २० लाखांचे अवैध कीटकनाशक व खत जप्त

२ कोटी २० लाखांचे अवैध कीटकनाशक व खत जप्त

►कृषी आयुक्तालयाची कारवाई ►कंपन्यांवर फौजदारी गुन्हे, मुंबई, २२ नोव्हेंबर…

परीक्षा शुल्कासह निर्वाह भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार

परीक्षा शुल्कासह निर्वाह भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार

►२०१७-१८ च्या पहिल्या सत्रासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई, २१ नोव्हेंबर…

मला फाशी नको, जन्मठेप द्या!

मला फाशी नको, जन्मठेप द्या!

►कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याची विनवणी, अहमदनगर,…

‘भारते नवजीवनम्’

‘भारते नवजीवनम्’

संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम ॥ विशेष :…

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जाती-पातीच्या राजकारणाला, छद्मी…

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

॥ विशेष : ॠषिकेश बदामीकर | आपण जसे आपले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:38 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » लोकसभेत गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी स्थगित

लोकसभेत गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी स्थगित

=ही तर काळ्या पैशाविरुद्धची लढाई : राजनाथसिंह=
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर –
loksabha-parliamentपाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात विरोधकांच्या गदारोळामुळे आज सोमवारीही संसदेचे कामकाज स्थगित करावे लागले. नोटबंदीच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी यांनी सभागृहात येऊन निवेदन करावे, अशी विरोधकांची मागणी होती. नोटबंदीच्या मुद्यावर विरोधकांनी आज देशभर आक्रोश दिनाचे आयोजन केले होते, त्याचे पडसाद दोन्ही सभागृहात उमटले.
लोकसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्यासह अनेक सदस्यांनी स्थगनप्रस्तावाची सूचना देत नोटबंदीच्या मुद्यावर चर्चेची मागणी केली. मात्र विरोधकांचा स्थगनप्रस्ताव सभापती सुमित्रा महाजन यांनी फेटाळून लावला. त्यामुळे विरोधी पक्षांचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातारण निर्माण झाले. या गोंधळातच महाजन यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. पण गोंधळामुळे काही ऐकू येत नव्हते. सदस्यांनी शांत राहण्याचे आणि आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन अध्यक्ष महाजन करत होत्या, पण सदस्य त्याला प्रतिसाद देत नव्हते. नोटबंदीच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी यांनी सभागृहात उपस्थित राहून चर्चेला उत्तर द्यावे, अशी विरोधकांची मागणी होती. नोटबंदीच्या सरकारच्या निर्णयामुळे देशभरातील जनतेत आक्रोश आहे, बाहेर त्याचे प्रतिबिंब उमटत आहे, असे कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे म्हणाले. यावर भाजपा सदस्यांनी आक्षेप घेतला. नोटबंदीच्या निर्णयानंतर आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला असून हजार लोक जखमी झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला. नोटबंदीच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी सभागृहात निवेदन करणार नाही, तोपर्यंत गतिरोध दूर होणार नाही, असे ते म्हणाले. नोटबंदीच्या निर्णयाचा फटका मंत्रिमंडळातील एका मंत्र्यालाही बसल्याचे खडगे म्हणाले. समाजवादी पार्टीचे मुलायमसिंह यादव यांनीही नोटबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसल्याचे सांगितले. या मुद्यावर पंतप्रधानांनंी सभागृहात येऊन निवेदन करण्याची मागणीही त्यांनी केली. विरोधकांच्या आक्रमक घोषणाबाजीमुळे सभापती महाजन यांना सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. नोटबंदीच्या मुद्यावर नियम ५६ नुसार चर्चेची विरोधी पक्षांची मागणी आहे, तर सरकार नियम १९३ नुसार चर्चेला तयार आहे. नियम १९३ नुसार होणार्‍या चर्चेत मतविभाजनाची तरतूद नाही, तर नियम ५६ मध्ये तशी तरतूद आहे.
राजनाथसिंहांची भूमिका
दुसर्‍यांदा कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा विरोधक वेलमध्ये आले आणि घोषणा देऊ लागले. नोटबंदीचा सरकारचा निर्णय म्हणजे काळ्या पैशाविरुद्ध सरकारने सुरू केलेली लढाई आहे, त्यामुळे आतापर्यंत कोणीही सरकारच्या हेतुबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले नाही, याकडे लक्ष वेधत राष्ट्रहितासाठी सरकारने हा क्रांतिकारी, साहसी आणि गरिबोन्मुखी निर्णय घेतला, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले. आवश्यकता पडली तर पंतप्रधान मोदी सभागृहात येतील आणि चर्चेत हस्तक्षेप करतील, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. नोटबंदीचा निर्णय लागू करताना त्यात काही त्रुटी राहिल्या असल्यास त्यावर निश्‍चितपणे चर्चा झाली पाहिजे, मात्र देशाच्या एकता आणि अखंडतेवर कोणत्याच प्रकारचे प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाऊ नये, असे राजनाथसिंह म्हणाले. नोटबंदीच्या निर्णयावर पहिल्या दिवसापासूनच आम्ही चर्चेला तयार आहे, मात्र चर्चा कोणत्या नियमानुसार व्हावी, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांचा आहे, सभातती याबाबत जो निर्णय देतील त्यानुसार सरकार चर्चेला तयार असल्याचे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. राजनाथसिंह निवेदन करीत असताना विरोधी सदस्यांची घोषणबाजी सुरूच होती. त्यामुळे सभापती महाजन यांनी दुपारी २ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित केले. दुपारी २ वाजता कामकाज सुरु झाल्यावर अध्यक्ष महाजन यांनी शून्य तास पुकारला. मात्र विरोधी सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. त्यामुळे पुन्हा गोंधळ सुरु झाला, या गोंधळातच सभापती महाजन यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (2253 of 2812 articles)


तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर - नोटबंदीच्या मुद्यावर आज राज्यसभेतही प्रचंड गदारोळ झाला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. ...