रोहिंग्यांना भारतात थारा नाही : राजनाथ सिंह

रोहिंग्यांना भारतात थारा नाही : राजनाथ सिंह

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर – म्यानमारमधून भारतात आलेले रोहिंग्या…

लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने सहकार व मनुष्यबळ अकादमी स्थापणार

लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने सहकार व मनुष्यबळ अकादमी स्थापणार

►जन्मशताब्दी समारंभाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, नवी दिल्ली,…

नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगींचा नऊ दिवस उपवास

नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगींचा नऊ दिवस उपवास

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर – नवरात्रौत्सवाला आज गुरुवारपासून सुरुवात…

भारतात फुटीचे राजकारण : राहुल

भारतात फुटीचे राजकारण : राहुल

न्यूयॉर्क, २१ सप्टेंबर – भारतात नरेंद्र मोदी सरकारकडून फुटीचे…

पॅरिस कराराच्या पुढे जाऊन काम करू : सुषमा स्वराज

पॅरिस कराराच्या पुढे जाऊन काम करू : सुषमा स्वराज

वॉशिग्टन, २१ सप्टेंबर – पर्यावरण रक्षणासाठी भारत वचनबद्ध असून…

पाकने शांतता, सहकार्यासाठी चर्चेचा मार्ग अनुसरावा : अश्रफ घनी

पाकने शांतता, सहकार्यासाठी चर्चेचा मार्ग अनुसरावा : अश्रफ घनी

संयुक्त राष्ट्रे, २१ सप्टेंबर – पाकिस्तानने आता शांतता, सुरक्षा…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

राज्यभरात पावसाने झोडपले

राज्यभरात पावसाने झोडपले

►हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, पुणे, १९ सप्टेंबर –…

सत्तेतून बाहेर पडण्यास २५ सेना आमदारांचा विरोध

सत्तेतून बाहेर पडण्यास २५ सेना आमदारांचा विरोध

►सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची हवा निघाली ►शिवसेनेत मोठ्या फुटीची शक्यता…

ब्रह्मदेशातील बांगलादेशी

ब्रह्मदेशातील बांगलादेशी

॥ विशेष : रमेश पतंगे | ब्रह्मदेशातील बौद्ध जनता…

‘शहरी नक्षली’ गौरी लंकेश हत्या आणि त्यामागचे राजकारण…

‘शहरी नक्षली’ गौरी लंकेश हत्या आणि त्यामागचे राजकारण…

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | गौरी लंकेश या…

काट्याचा नायटा होण्याआधीच रोहिंग्यांना हकला!

काट्याचा नायटा होण्याआधीच रोहिंग्यांना हकला!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | बांगलादेशी मुस्लिमांनी जशी…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:20
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » लोकसभेत प्रचंड गदारोळ

लोकसभेत प्रचंड गदारोळ

=कामकाज दिवसभरासाठी स्थगित=
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर
loksabhaपाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात आज प्रचंड गदारोळ झाला. या मुद्यावरून झालेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. राज्यसभेतही विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे दुपारी दोन वाजेपर्यंत चारवेळा कामकाज स्थगित करावे लागले.
आज लोकसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच कॉंग्रेस आणि अन्य पक्षांच्या सदस्यांनी स्थगनप्रस्तावाची नोटिस दिली. नोटबंदीच्या मुद्यावरून देशात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे, लोकांना अतिशय हालअपेष्टांच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, याकडे लक्ष वेधून सभागृहातील प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करत या मुद्यावर तात्काळ चर्चा सुरू करण्याची मागणी कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी केली. हा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच फुटला, ही अतिशय गंभीर बाब आहे, असे ते म्हणाले. या मुद्यावरून कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, डावे पक्ष आणि अण्णाद्रमुकचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभापती सुमित्रा महाजन सदस्यांना आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन करत होत्या.
काळा पैसा, भ्रष्टाचार तसेच नकली नोटांना लगाम घालण्यासाठी सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, असे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितले. काळ्या पैशाच्या बळावर फोफावणार्‍या दहशतवादालाही आटोक्यात आणण्यासाठी सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, असे ते म्हणाले. या निर्णयावर देशातील जनता सरकारसोबत असल्याचे स्पष्ट करत अनंतकुमार म्हणाले की,  नोटबंदीसह सर्व मुद्यांवर सरकार चर्चेला तयार आहे. विरोधक स्थगनप्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी करत असतांना अनंतकुमार यांनी नियम १९३ नुसार सरकार  चर्चेला तयार असल्याचे सांगितले.
सरकार चर्चेला तयार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या जागेवर जा, असे सभापती महाजन म्हणत होत्या, पण विरोधी सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सरकार चर्चेला तयार असतांना तुम्हाला चर्चा करायची नाही, फक्त गोंधळ घालायचा आहे, असे संतप्त होत महाजन म्हणाल्या. आम्ही नियम ५६ नुसार स्थगनप्रस्ताव दिला आहे, त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करुन चर्चा करा, असे खडगे म्हणाले. तृणमूल कॉंग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांनी सरकारने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. राजदचे जयप्रकाश नारायण यादव आणि माकपचे मोहम्मद सलीम यांनीही या मुद्यावरून सरकारवर हल्ला चढवला. विरोधी सदस्यांच्या घोषणा सुरूच होत्या. पंतप्रधानानी उत्तर द्यावे, अशा घोषणा विरोधी सदस्य देत होते. या गोंधळातच सभापती सुमित्रा महाजन यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. मंत्री उत्तर देत होते, पण गोंधळामुळे काहीच ऐकू येत नव्हते. त्यामुळे महाजन यांनी आधी एकदा १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा असाच गोंधळ होत असल्यामुळे त्यांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले.

शेअर करा

Posted by on Nov 18 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (2137 of 2538 articles)


=कामकाज स्थगित= तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर नोटबंदीच्या मुद्यावरून आज राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरात अनेकदा ...