Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » वाघा सीमेवर मिठाई आदान-प्रदानाच्या परंपरेला छेद

वाघा सीमेवर मिठाई आदान-प्रदानाच्या परंपरेला छेद

wagha-borderनवी दिल्ली, [३० ऑक्टोबर (हिं.स.)] : दिवाळीनिमित्त वाघा सीमेवर पाकिस्तानच्या सैनिकांना मिठाई न देण्याचा निर्णय भारतीय लष्कराकडून घेण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू होती. मात्र पाकिस्तानकडून वारंवार होत असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन व दहशतवाद्यांना दिल्या जाणार्‍या मदतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
उरी हल्ल्‌यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यातच पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्‌यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन लक्ष्यभेदी हल्ला करण्यात आला. त्यात लष्कराने अनेक दहशतवादी चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यावरून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यातही भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्त्युत्तर दिले जात आहे.

शेअर करा

Posted by on Oct 31 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1568 of 1696 articles)


    हैदराबाद, ३० ऑक्टोबर, (हिं.स.) : घरकाम करणार्‍या कर्मचार्‍यांनाही कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे केंद्रीय ...