Home » अर्थभारत, ठळक बातम्या » वाहन उद्योग वेगाने वाढणार

वाहन उद्योग वेगाने वाढणार

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २० नोव्हेंबर –
kenichi-ayukawa-suzukiपुढील पाच वर्षांत भारतात वाहन उद्योग वेगाने वाढणार आहे. या क्षेत्रात या काळात ६.५ कोटी रोजगार निर्माण होणार असल्याचे मारुती सुझुकी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केनिची आयुकावा यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, पुढील दशकात या क्षेत्राचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण १२ टक्क्यांपर्यत जाणार आहे. सध्या या उद्योगाचे राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण ७.१ टक्के  इतके  असून या क्षेत्रात ३.२ कोटी लोक काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत तब्बल ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.
हा उद्योग एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता या उद्योगाने विस्तारीत विचार करून नवे तंत्रज्ञान शोधण्याचा प्रयत्न करावा. पर्यावरणाचा प्रश्‍न  गंभीर होत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक वाहन निर्मितीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
सरकारनेही या क्षेत्रासाठी पूरक असे नियम तयार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सरकारने सामाजिक उपक्रमात भाग घेण्यास नव्या कंपनी कायद्यानुसार सांगितले आहे. त्याअगोदरच या कंपन्यांनी त्या दिशेने काम करायला सुरुवात केली होती, असे त्यांनी
सांगितले. आता अनेक कंपन्यांनी ग्रामीण विकासासाठी काम करायला सुरुवात केली आहे. काही कंपन्या तर जलसंवर्धनासाठीही काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 21 2016. Filed under अर्थभारत, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in अर्थभारत, ठळक बातम्या (1125 of 1558 articles)


    वृत्तसंस्था मुंबई, २० नोव्हेंबर - पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचा वापर होण्याचा धोका अतिशय वाढला आहे, असे माजी विदेश सचिव शिवशंकर मेनन यांनी ...