Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » शरद पवारांचे राजकीय अर्धशतक; राष्ट्रवादी जल्लोष करणार

शरद पवारांचे राजकीय अर्धशतक; राष्ट्रवादी जल्लोष करणार

sharad-pawar_30मुंबई/नवी दिल्ली, [६ नोव्हेंबर] – मराठा स्ट्रॉंगमन अशी ओळख असलेले राष्ट्रवादी कॉंगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय कारकिदीला पाच दशकं अर्थात ५० वर्षे पूर्ण होत आहेत. हा क्षण केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात एक उत्सव म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची योजना त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आखली आहे.
तळागळातून राज्यस्तरीय आणि नंतर राष्ट्रीय नेते हा शरद पवार यांचा राजकीय प्रवास या निमित्त्याने आयोजित विविध कार्यक्रमांतून सादर केला जाणार आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे अध्यक्ष असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे येत्या फेबु्रवारी महिन्यात पुणे आणि मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सध्या ७६ वर्षे वय असलेल्या शरद पवार यांच्या या अर्धशतकी राजकीय कारकिर्दीत भारतीय राजकारणात अनेक मोठे फेरबदल झाले आहेत. ते स्वत:देखील या राजकीय घडामोडींचे साक्षीदार आहेत. यात कॉंगे्रसमधील मोठी फूट, राष्ट्रवादी कॉंगे्रसची स्थापना आणि केंद्र सरकारमध्ये पवार यांनी पार पाडलेली निर्णायक भूमिका आदी घडामोडींचा समावेश आहे.
राजकीय मित्र असो वा प्रतिस्पर्धी, सारेच पवारांना ‘मराठा स्ट्रॉंगमन’ म्हणूनच ओळखतात. पवार यांनी आपले स्वगृह अर्थात बारामतीतून १९६०च्या दशकात कॉंगे्रसचे तळागळातील कार्यकर्ते म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. यशवंतराव चव्हाण यांच्या तालमीत त्यांनी राजकारणचे धडे घेतले. सहकार क्षेत्राचे मुख्य केंद्र असलेले पश्‍चिम महाराष्ट्र नेहमीच तरुणतुर्कांसाठी राजकीय डावपेच शिकविणारे ठिकाण राहिले आहे. कोणतेही संकट असो, कशीही स्थिती असो, जराही विचलित न होता, त्यावर तोडगा काढण्यात आणि सामना करण्यात निष्णात अशी ओळख असलेले पवार यांनी महाराष्ट्रासोबतच राष्ट्रीय राजकारणातही आपली छाप पाडली आहे. सत्तेचे केंद्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
१९६७ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. तेव्हापासून आजपर्यंत पवार एकही निवडणूक हरले नाहीत. विधानसभेवरील आपल्या या पहिल्याच विजयानंतर त्यांना लगेच कनिष्ठ मंत्री म्हणून राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणूनही बढती मिळाली. त्यानंतर त्यांनी राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती यशस्वीपणे सांभाळली. १९७८ मध्ये ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. त्यावेळी ते केवळ ३८ वर्षांचे होते. यानंतर सलग तीन वेळा ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
१९८० च्या दशकात पवार कॉंगे्रसपासून वेगळे झाले आणि कॉंगे्रस (एस) या नावाचा स्वत:चा पक्ष त्यांनी स्थापन केला. तथापि, १९८६ मध्ये तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादेत आयोजित एका कार्यक्रमात ते पुन्हा स्वगृही अर्थात मूळ कॉंगे्रसमध्ये परत गेले. १९८४ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढले आणि मोठ्या फरकाने विजयी झाले. लोकसभेत आल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातील प्रमुख खेळाडू अशी त्यांची ओळख झाली. मे १९९१ मध्ये राजीव गांधी यांची तामिळनाडूच्या श्रीपेरुम्बूदूर येथे लिट्टेच्या अतिरेक्यांची हत्या केली. त्यानंतर पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांचे नाव सर्वात समोर होते. पण, सोनिया गांधी यांना निमूटपणे ऐकून घेणारा आणि १०, जनपथच्या आदेशानुसारच काम करणारा पंतप्रधान हवा होता आणि शरद पवार अशा प्रकारची हुजरेगिरी करणे शक्य नसल्याने, ऐन वेळी पंतप्रधानपदासाठी पी. व्ही. नरसिंहराव यांची निवड करण्यात आली आणि पंतप्रधान होण्याचे या मराठा स्ट्रॉंगमनचे स्वप्न अपूर्ण राहिले.

शेअर करा

Posted by on Nov 7 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1337 of 1547 articles)


    =बांगलादेशात हिंदूंवर हल्ले= नवी दिल्ली, [६ नोव्हेंबर] - बांगलादेशात हिंदू नागरिक, त्यांची संपत्ती आणि मंदिरांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांची परराष्ट्र ...