जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

►बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्याच अंतरावर, नवी दिल्ली, २६ जून…

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवी दिल्ली, २६ जून – नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा…

अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

माझे सरकार निष्कलंक

माझे सरकार निष्कलंक

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, २६ जून – माझ्या…

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

क्विन्सटाऊन, २६ जून – न्यूझीलंडमध्ये मद्यपानाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍या…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » सपाच्या रौप्य महोत्सवातही रंगली यादवी

सपाच्या रौप्य महोत्सवातही रंगली यादवी

=काका-पुतण्याचे आरोप-प्रत्यारोप=
samajwadi-jublieeलखनौ, [५ नोव्हेंबर] – मुलायमसिंहांच्या कुटुंबातील यादवी आज शनिवारी समाजवादी पार्टीच्या रौप्य महोत्सवी समारंभातही पहायला मिळाली. यादव कुटुंब एक आहे, असे चित्र रेखाटण्याच्या प्रयत्नांत मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झाडल्या.
सपाच्या या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह अद्याप एकत्र न आलेल्या जनता परिवारातील अनेक नेते उपस्थित होते. यादव कुटुंबातील लोक भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात, हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न यातून झाला. पण, अखिलेश आणि शिवपाल यादव यांनी आपल्या भाषणांमध्ये एकमेकांवर कडवट टीका करण्याची एकही संधी न सोडल्याने मुलायम कुटुंबातील महाभारत अजूनही शमले नसल्याचेच संकेत बाहेर आले आहेत.
कोणत्याही परीक्षेसाठी तयार : अखिलेश
कोणतीही परीक्षा देण्यासाठी मी तयार आहे. मी आज जे काही बोलत आहो, ते आता कोणीच ऐकणार नाही. पण, जेव्हा पक्षाचे फार मोठे नुकसान होईल, तेव्हा माझे शब्द त्यांच्या कानापर्यंत जातील. आता मी कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देणार नाही. राम मनोहर लोहिया देखील हेच सांगायचे की, माझ्या मृत्यूनंतरच माझे शब्द लोकांच्या कानावर पडतील, अशा बोचर्‍या शब्दात अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यादव यांच्यावर हल्ला चढवला.
तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता. त्यासाठी मी तयार आहे. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि बसपाचा पराभव करणे, हेच माझे उद्दिष्ट आहे. उत्तरप्रदेशातील ही निवडणूकच देशाचे भवितव्य निर्धारित करणार आहे. लोकसभा निवडणुकीत ८० पैकी ७० जागा जिंकणार्‍या भाजपाने आदर्श गावांची योजना सादर करण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही. मुझफ्फरनगर आणि कैरानासारख्या घटनांच्या माध्यमातून भाजपाने समाजात तणाव निर्माण केला आहे. या निवडणुकीनंतर सपा पुन्हा एकदा सत्तेत येईल आणि अशा शक्तींना मोडून काढेल, असे अखिलेश म्हणाले.
विशेष म्हणजे, ज्या गायत्री प्रसाद प्रजापतींना अखिलेश यांनी आपल्या मंत्रिमंडळातून हाकलले, त्याच प्रजापती यांनी या कार्यक्रमात अखिलेशना तलवार दिली. हाच धागा पकडून ते म्हणाले की, ‘तुम्ही माझ्या हातात तलवार देता आणि त्याचा वापर मी करायलाच नको, अशीही अपेक्षा ठेवता, हे कसे शक्य आहे.’
हाकला, अपमानित करा : शिवपाल यादव
मला मंत्रिमंडळातून हाकला, अपमानित करा. पण, एक लक्षात ठेवा मी पक्षासाठी आणि गेल्या साडेचार वर्षांच्या काळात सरकारसाठी अतिशय चांगले काम केले आहे. प्रसंगी पक्षाच्या हितासाठी स्वत:चे रक्त देण्याचीही माझी तयारी आहे, अशा शब्दात शिवपाल यांनी अखिलेशवर हल्ला केला.
मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची माझी मुळीच इच्छा नाही आणि तसा विचारही मी केला नाही. काही लोकांना काहीच न करता सत्ता मिळते आणि काही लोकांना फार मोठा त्याग करूनही काहीच मिळत नाही. मुख्यमंत्री असलेले अखिलेश यांना मी एकच सांगू इच्छितो की, तुम्हाला माझ्यापासून जो काही त्याग हवा आहे, तो करण्याची माझी पूर्ण तयारी आहे. तुम्ही मला वारंवार अपमानित करा, एकदा नव्हे, अनेकदा मंत्रिमंडळातून बडतर्फ करा. त्याने माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असा चिमटाही शिवपाल यांनी काढला.
बिहारप्रमाणे येथेही भाजपाला पराभूत करू : लालू
राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. समाजवादी पार्टीचे हात बळकट करण्यासाठी आणि बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशातही भाजपाचा पराभव करण्यासाठी मी येथे आलो आहो. तर, देवेगौडा यांनी जनता परिवारातील नेत्यांनी मतभेद बाजूला सारून एकत्रित येण्याचा सल्ला दिला.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (1658 of 1852 articles)


=ट्रस्टच्या विदेशी निधीचे मार्ग गोठवले= नवी दिल्ली, [५ नोव्हेंबर] - सुमारे ११ हजारावर स्वयंसेवी संस्थांची मान्यता रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने ...