Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » सुप्रीम कोर्टाची सलमानला नोटीस

सुप्रीम कोर्टाची सलमानला नोटीस

=काळवीट शिकार प्रकरण=
salman-khan1नवी दिल्ली, [११ नोव्हेंबर] – १९९८ मधील काळविटाच्या शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला निर्दोष मुक्त करण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज दाखल करून घेताना सलमानला नोटीस जारी केली आहे.
राजस्थान सरकारने सलमानच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान दिले आहे. यावर जलदगतीने सुनावणी करण्यात येईल, असे न्या. ए. के. सिकरी आणि न्या. आर. बानुमती यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने म्हटले आहे. सलमानसोबतच इतर पक्षकारांनाही न्यायालयाने नोटीस पाठवून उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.
जोधपूर उच्च न्यायालयाने २५ जुलै रोजी काळविट शिकाराशी संबंधित दोन घटनांमध्ये सलमान आणि इतर अभिनेते व अभिनेत्रींना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला होता. राजस्थान सरकारने गेल्या महिन्यात या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देताना, उच्च न्यायालयाने या निकालात गंभीर चूक केली आहे, याकडे सरकारने याचिकेतून न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (1251 of 1560 articles)


    अहमदाबाद, [११ नोव्हेंबर] - भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेला अद्यापही दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असला, तरी इस्रोने ...