भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

•►अमित शाह यांनी दिले ३५० जागांचे लक्ष्य, नवी दिल्ली,…

उषाताई चाटी कालवश

उषाताई चाटी कालवश

►आज मोक्षधाम येथे होणार अंत्यसंस्कार, नागपूर, १७ ऑगस्ट –…

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

►भाजपा, संघावरील आरोपांचा घेतला खरपूस समाचार, नवी दिल्ली, १७…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

►कोरियाच्या जनतेचे धमकावणारे प्रत्युत्तर, प्यॉंगयॉंग, १० ऑगस्ट – आमच्या…

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

►मुख्यमंत्री फडणवीस यांचे सूतोवाच,• प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेच, मुंबई, १७…

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

मुंबई, १३ ऑगस्ट – राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले…

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

►विधानसभेत उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव, मुंबई, १० ऑगस्ट –…

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

मकरंद कुळकर्णी | काश्मिरी जनतेने भारतीय लष्कराच्या क्षमतेवर विश्‍वास…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

•तरंग : दीपक कलढोणे | २० एप्रिल १९३९ रोजी…

३७० कलम संपले तर?

३७० कलम संपले तर?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | नाक दाबले की…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » हजारो लोकांना रडवून गेला तो २० रुपयांचा डॉक्टर…

हजारो लोकांना रडवून गेला तो २० रुपयांचा डॉक्टर…

वृत्तसंस्था
कोईम्बतूर, २४ नोव्हेंबर –
dr-v-balasubramaniam1देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती |
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती
तेच डोळे देखणे, जे कोंडीती सार्‍या नभा |
वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा
कवी बा. भ. बोरकर यांनी वरीलप्रमाणे आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे ‘त्यांची’ पावले सतत ध्येयमार्गावरूनच चालायची, ‘त्यांनी’ दुसर्‍यांचे दु:ख आपल्या डोळ्यात साठवून ठेवले व ते दूर करण्यासाठी अहोरात्र कष्ट व त्रास सहन केला, लोकांचे सुख, समाधान हेच ‘त्यांच्या’ आयुष्याचे उद्दिष्ट बनले आणि आयुष्यभर सेवाव्रती राहून त्यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत आपले कर्तव्य पार पाडले… ते म्हणजे दुसरेतिसरे कुणी नसून तामिळनाडूतील ख्यातनाम डॉक्टर व्ही. बालसुब्रमण्यम आहेत.
अतिशय अल्प फीमध्ये आयुष्यभर गरीब रुग्णांची सेवा करणारा हा देवमाणूस रविवारी हे जग सोडून गेला आणि हजारो माणसे अक्षरश: दु:खात बुडाली. ‘२० रुपयांचा डॉक्टर’ (२० रूपीज डॉक्टर) या या नावानेच ते संपूर्ण तामिळनाडूत ओळखले जायचे. त्यांनी कधीही २० रुपयांपेक्षा अधिक फी आकारली नाही. रुग्णांवर ते अतिशय उत्तमप्रकारे उपचार करीत असत.
डॉक्टरी पेशाला ‘नोबेल प्रोफेशन’ म्हटले जाते. मात्र, आजचे डॉक्टर कमालीचे ‘प्रोफेशनल’ होत असताना व अधिकाधिक पैसे कमविण्याच्या मागे लागले असताना कोईम्बतूर येथील डॉ. बालसुब्रम्ण्यम यांचा सेवा आणि त्यागाचा अनोखा आदर्श निश्‍चितच प्रेरणा देणारा व सेवावृत्ती जागविणारा आहे.
१९७३ मध्ये एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर डॉ. व्ही. बालसुब्रम्ण्यम तामिळनाडूतील थेनी जिलह्यातील इम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी) च्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झाले. तेथून बदली झाल्यानंतर त्यांनी स्वत:चे खाजगी क्लिनिक कोईम्बतूर जिल्ह्यातील थिरूनवेली आणि चेन्नीमलाई येथे सुरू केले. त्यांची प्रारंभीची फी केवळ दोन रुपये होती. वर्षानुवर्षे दोन रुपये घेतल्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने यात वाढ केली. अनेक वर्षे त्यांनी १० रुपयेच रुग्णांकडून आकारले. मात्र, सर्वच किमती प्रचंड वाढल्याने त्यांनी नाईलाजाने २० रुपये फी केली. पण, ही त्यांची जास्तीत जास्त फी होती. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी यात एका रुपयाचीही वाढ केली नाही. गरीब, गरजू रुग्णांकडून त्यांनी तेवढेही पैसे आकारले नाहीत. उलट गरीब रुग्णांना त्यांनी औषधे, इंजेक्शन व अन्य सामुग्री मोफत दिली. नव्हे कुठल्याच रुग्णाला औषधे विकत घ्यायला लागू नयेत असाच त्यांचा प्रयत्न असायचा. कंपन्यांच्या मेडिकल सँपलचा सकारात्मक उपयोग करीत त्यांनी औषधे अक्षरश: फुकट वाटली. भूपती हे त्यांचे गेल्या दहा वर्षांपासून पेशंट होते. डॉ. बालसुब्रम्ण्यम माझ्यासाठी देवदूतच होते, असे त्यांनी सांगितले. अरुण हे देखील कित्येक वषार्र्पासून डॉक्टरांकडे येत होते. ते म्हणाले, अगदी मध्यरात्री जरी बालसुब्रम्ण्यम यांच्या घराचा दरवाजा ठोठावला तरी त्यांनी उपचार करण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्यांनी कधीच रुग्णांवर उपचार करण्यास नाकारले नाही. त्यांच्या चेहर्‍यावर कधीच त्रासिक भाव नसायचे. आनंदी व प्रसन्न वृत्तीने त्यांनी रुग्णसेवा केली. सकाळी साडेआठला त्यांचा दवाखाना सुरू व्हायचा तो रात्री १० पर्यंत अखंडपणे चालायचा. अचूक निदान आणि उत्तम उपचार यामुळे सरासरी १५० ते २०० रुग्ण दररोज त्यांच्या दवाखान्यात यायचे. अनेकांनी त्यांना फी वाढविण्याचा सल्ला दिला. मात्र, परमेश्‍वराने मला भरपूर दिले आहे, असे सांगत त्यांनी शेवटपर्यंत २० रुपयांपेक्षा अधिक फी घेतली नाही.
या महान सेवाव्रतीचा रविवारी हृदयाघाताने मृत्यू झाला आणि त्यांच्या हजारो रुग्णांना फारच दु:ख झाले. त्यांच्यासाठी हा फारच मोठा धक्का होता. आपला मोठा आधार गमविल्याचे दु:ख त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होते. त्यांच्या अंत्ययात्रेला अक्षरश: जनसागर उसळला होता. लोकांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते. ‘आमचा २० रुपयांचा डॉक्टर गेला’ अशीच प्रतिक्रिया सर्वत्र उमटत होती. शेवटपर्यंत हा डॉक्टर रुग्णांशी प्रामाणिक व ध्येयाशी एकनिष्ठ राहिला.
देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके |
चांदणे ज्यातून वाहे, शुभ्र पार्‍यासारखे
देखणा देहान्त तो, जो सागरी सूर्यास्तसा |
अग्निचा पेरून जातो, रात्रगर्भी वारसा या बोरकरांच्याच ओळींप्रमाणे डॉ. बालसुब्रमण्यम यांनी सेवारूपी यज्ञकुंडात कर्तव्याच्या समिधा अर्पण करून त्यागाचा उच्च आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य (1442 of 1944 articles)


वृत्तसंस्था नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर - क्रिकेटपटू युवराज सिंहने पंतप्रधान नरेन्द्र मोदींना लग्नाची आमंत्रण पत्रिका दिली आहे. मॉडेल आणि अभिनेत्री ...