अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक » अंध असूनही दीपस्तंभ : ५० कोटींच्या कंपनीचा सीईओ!

अंध असूनही दीपस्तंभ : ५० कोटींच्या कंपनीचा सीईओ!

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

श्रीकांत बोल्ला आज हैदराबादस्थित बोलॅण्ट इंडस्ट्रीजचा सीईओ असून, दृष्टिहीन असूनही आपण काहीही करू शकतो, हे त्यानं आपल्या कर्तृत्वानं सिद्ध करून दाखवलं. पर्यावरणपूरक अशा ग्राहकोपयोगी पॅकिंग पर्यायांचे उत्पादन करणार्‍या या संस्थेत अपंगांनाच नोकरीवर ठेवलं जातं, हे विशेष! आज या कंपनीची उलाढाल तब्बल ५० कोटींच्या घरात आहे! आज श्रीकांत करोडपती आहे म्हणून स्वत:ला जिवंत असलेल्यांपैकी सर्वात नशीबवान समजत नाही, तर वर्षाला २० हजार रुपये कमावणार्‍या त्याच्या पालकांनी, शेजार्‍यांनी दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष न देता प्रेम आणि जिव्हाळ्याने त्याचं पालनपोषण केलं, हे त्याचं मुख्य कारण आहे.

Shrikanth Bolla

Shrikanth Bolla

जगाने जर माझ्याकडं बघितलं आणि म्हटलं की, श्रीकांत, तू काहीही करू शकत नाहीस, तर मी जगाकडे बघून म्हणतो- मी काहीही करू शकतो!
‘इच्छा तेथे मार्ग’ असं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आपल्याला सांगत असतात. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करता येते आणि काहीच करण्याची इच्छा नसेल, तर लहानसहान संकटांसमोर गुडघे टेकावे लागतात. ही बाब दैनंदिन जीवनातील अनेक बाबींवरून सिद्ध करून दाखवता येऊ शकते.
जेव्हा श्रीकांत बोल्लाचा जन्म झाला तेव्हा गावातील शेजार्‍यांनी त्याचा गळा घोटून टाका, असा सल्ला त्याच्या पालकांना दिला होता. आयुष्यभर वेदना सहन करत बसण्यापेक्षा एकदाच दु:ख सहन करणं केव्हाही चांगलं, असंही त्यांना सांगण्यात आलं. दृष्टी नसलेला मुलगा काहीही कामाचा नाही, दृष्टिहीन मुलगा म्हणजे पाप, असंही काही जणांनी सांगितलं. मात्र, २३ वर्षांनंतर श्रीकांतनं अशी काही कर्तबगारी करून दाखविली की, असले उफराटे सल्ले देणार्‍यांचे दात त्यांच्याच घशात घातले!
श्रीकांत बोल्ला आज हैदराबादस्थित बोलॅण्ट इंडस्ट्रीजचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असून, दृष्टिहीन असूनही जगाकडे बघून आपण काहीही करू शकतो, हे त्यानं आपल्या कर्तृत्वानं सिद्ध करून दाखवलं. पर्यावरणपूरक आणि नष्ट करता येतील अशा ग्राहकोपयोगी पॅकिंग पर्यायांचे उत्पादन करणार्‍या या संस्थेत अशिक्षित अपंगांनाच नोकरीवर ठेवलं जातं, हे विशेष! आज या कंपनीची उलाढाल थोडीथोडकी नसून, तब्बल ५० कोटींच्या घरात आहे! आज श्रीकांत करोडपती आहे म्हणून स्वत:ला जिवंत असलेल्यांपैकी सर्वात नशीबवान समजत नाही, तर वर्षाला २० हजार रुपये कमावणार्‍या त्याच्या पालकांनी, शेजार्‍यांनी दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष न देता प्रेम आणि जिव्हाळ्याने त्याचं पालनपोषण केलं, हे त्याचं मुख्य कारण आहे. माझे पालक आज सर्वात श्रीमंत आहेत, याची मला कल्पना आहे, असे श्रीकांत सांगतो.
श्रीकांत बोल्लाचा हा यशस्वी प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आणि मनामनांत आशेची ज्योत प्रज्वलित करणारा आहे. जर कोणतीही गोष्ट मनापासून केली आणि आपण ती करू शकतो असा आत्मविश्‍वास उराशी बाळगला, तर डॉलरच्या चिन्हानंतर असे कितीतरी शून्य लावता येऊ शकतात. अडचणी प्रत्येकालाच येत असतात. परंतु, काहीतरी स्वप्न बघून त्या दिशेनं कठोर परिश्रम करणार्‍यांच्याच पायाशी यश लोळण घेतं, हेही तेवढंच खरं आहे. श्रीकांतच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तपश्‍चर्या त्याच्या नशिबात असलेल्या काळ्याकुट्ट ढगांमधूनही तेवढ्याच प्रखरतेनं चमकते. अंध म्हणून जन्माला आला, हा श्रीकांतच्या जीवनपटातील फक्त एक भाग झाला. तो जन्मापासूनच गरीबही होता आणि आमच्यासारख्या समाजात गरीब असणं म्हणजे काय असतं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शाळेतही त्याला मागच्या बाकावर बसवलं जायचं आणि खेळूही दिलं जात नसे. अंतर्भाव म्हणजे काय, याचा त्या छोट्या गावातील शाळेला गंधही नव्हता.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर जेव्हा श्रीकांत विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यास उत्सुक होता, तेव्हा त्याच्या अपंगत्वामुळं त्याला ही संधी नाकारण्यात आली. १८ वर्षांचा होईपर्यंत श्रीकांतनं फक्त व्यवस्थेशीच लढा दिला असं नसून, अमेरिकेतील प्रतिष्ठित मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेत प्रवेश मिळविणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ठरला! पाहतापाहता यशाला गवसणी घालणार्‍या श्रीकांतचे आज हुबळी (कर्नाटक), निझामाबाद (तेलंगणा) आणि हैदराबाद येथे दोन, असे चार कारखाने आहेत.
रवी मांथा हा अ‍ॅन्जेल गुंतवणूकदार दोन वर्षांपूर्वी श्रीकांतला भेटला. पहिल्या भेटीतच श्रीकांतची कुशाग्रता आणि व्यावसायिक दूरदृष्टीने तो इतका प्रभावित झाला की, त्याने केवळ मार्गदर्शक बनण्याचाच नव्हे, तर श्रीकांतच्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णयदेखील घेतला. मी हैदराबादच्या औद्योगिक वसाहतीत टिनाचे शेड असलेल्या त्याच्या कार्यालयात भेटलो, तेव्हा तो आपण समाजाला कसे प्रभावित करू इच्छितो, याबाबत बोलेल, असे मला वाटले. परंतु, एवढ्या तरुण वयात असलेली त्याची व्यावसायिक स्पष्टता आणि तांत्रिक ज्ञानाने मी अचंबित झालो, असे रवीने श्रीकांतबरोबरच्या प्रवासाबाबत बोलताना सांगितलं.
१३ कोटी रुपयांचा (२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) निधी जमा करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यापैकी ९ कोटी रुपये जमा झाले आहेत. रवी यांच्या मते कंपनीचा आयपीओ बाजारात आणणे हे श्रीकांतचं ध्येय आहे. अपंगत्व असलेल्या सुमारे ७० टक्के कर्मचारीवर्गासह टिकाऊ कंपनी स्थापन करण्याचं स्वप्न कमी धोक्याचं नाही. या कंपनीच्या माध्यमातून श्रीकांतचं स्वप्न प्रत्यक्षात आलं आहे, असंही रवी सांगतात.
वेगळ्या वागणुकीचा शाप
अपंगांना जन्मापासूनच वेगळी वागणूक दिली जाते, असं नुकत्याच मुंबईत झालेल्या इंकटॉक्सच्या व्यासपीठावरून प्रथमच जाहीर भाषण देताना श्रीकांतनं सांगितलं. करुणा हा कुणालातरी जीवन जगण्याचा, उत्कर्ष करणे आणि संपन्न होण्यासाठीचा मार्ग आहे. श्रीमंती ही केवळ पैशाचीच नसते, तर ती आनंदातूनही मिळते, असेही श्रीकांत यावेळी म्हणाला.
श्रीकांत लहानाचा मोठा होत असताना शेतकरी असलेले त्याचे वडील त्याला शेतात घेऊन जात. परंतु, लहानगा श्रीकांत वडिलांना काहीही मदत करू शकत नसे. त्यामुळे त्यानं शिकावं, असं त्याच्या वडिलांना वाटू लागलं. वडिलांच्या उद्योजकतेच्या मॉडेलनुसार मी अपयशी होतो. उद्योजकतेमध्ये आम्ही दुबळ्या बिझिनेस मॉडेलच्या आधारे मूल्यांकन करून ते इतक्या लवकर अपयशी कसं झालं हे सांगतो, असेही श्रीकांत म्हणाला. गावात जवळ असलेली शाळा पाच किमी अंतरावर होती. त्यामुळे श्रीकांतला पायीच शाळेत जावं लागे. त्याने असं दोन वर्षे केलं. माझ्या उपस्थितीची कुणीही दखल घेतली नाही. मला शेवटच्या बाकावर बसविलं जायचं. मला पीटी क्लासमध्येही सहभागी होऊ दिलं जात नसे. तेव्हा मी जगातील सर्वात गरीब मुलगा आहे, असे विचार माझ्या मनात येत होते ते पैसे नव्हे म्हणून नव्हे, तर एकटेपणामुळे.
श्रीकांत काहीही शिकत नाही, असं लक्षात आल्यावर वडिलांनी त्याला हैदराबाद येथील अपंगांच्या शाळेत टाकलं. या ठिकाणी दाखविण्यात आलेल्या करुणेमुळे श्रीकांतमध्ये वेगळाच उत्साह संचारला. त्या ठिकाणी तो केवळ बुद्धिबळच नव्हे, तर क्रिकेटही खेळायला शिकला. तो वर्गात पहिला आला आणि लीड इंडिया प्रोजेक्टमध्ये, माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करण्याची संधीही त्याला मिळाली. परंतु, याचाही फारसा उपयोग झाला नाही आणि अकराव्या वर्गात विज्ञात शाखेत श्रीकांतला प्रवेश नाकारण्यात आला. आंध्रप्रदेश परीक्षा मंडळाची दहावीची परीक्षा तो ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाला. परंतु, त्यानंतर फक्त कला शाखेतच प्रवेश घेऊ शकतो, असं मंडळानं त्याला सांगितलं. मी अंध म्हणून जन्माला आलो म्हणून असं झालं का? मुळीच नाही. लोकांच्या आकलनशक्तीनं मला अंध बनवलं. ही संधी नाकारण्यात आल्यामुळे श्रीकांतने लढण्याचा निर्धार केला. मी सरकारला न्यायालयात खेचलं आणि सहा महिने लढलो. अखेर मला सरकारी आदेश मिळाला आणि स्वत: धोका पत्करून मला विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात आला. ही संधी मिळाल्यावर त्यांना चुकीचं ठरविण्यासाठी श्रीकांतने शक्य होईल ते सर्व केलं. त्यानं अभ्यासक्रमाच्या सगळ्या पुस्तकांची ध्वनिफीत तयार केली, दिवसरात्र एक केला आणि मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत तब्बल ९८ टक्के गुण मिळविले!
धाडस दाखविणार्‍यांनाच नशीब साथ देतं (फॉर्च्युन फेव्हर्स द ब्रेव्ह), असं नेहमी म्हटलं जातं आणि श्रीकांतच्या बाबतीत ते तंतोतंत लागू पडतं. कधीकधी जीवन हे अडथळ्यांची नक्कल करतं. विशेष करून जे मोठ्या योजना तयार करतात, अशांच्या बाबतीत तर बहुधा असं घडतंच. पहिल्या टप्प्यात विजय मिळविल्यानंतर श्रीकांतला मोकळा श्‍वास घेण्याची उसंत मिळाली नाही. त्याने आयआयटी, बीआयटीएस पिलानी आणि इतर प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अर्ज केला. परंतु, त्याला हॉल तिकीटच मिळालं नाही. याउलट अंध असल्यामुळे स्पर्धा परीक्षेला बसता येणार नाही, असं त्याला सांगण्यात आलं. जर आयआयटीला मी नको असेल, तर मलासुद्धा आयआयटी नको होती.
या भानगडीत न पडता श्रीकांतनं अभियांत्रिकीत आपल्यासारख्यासाठी सर्वोत्तम काय आहे, याचा इंटरनेटवर शोध घेतला. त्याने अमेरिकेतील शाळांसाठी अर्ज केला आणि एमआयटी, स्टॅनफोर्ड, बेर्केले आणि कार्निजी मेलन या चार अव्वल शाळांमध्ये प्रवेशाची संधी त्याला मिळाली. तो शिष्यवृत्ती घेऊन शाळेच्या इतिहासातील पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी म्हणून एमआयटीत गेला. तिथेही जीवनाशी जुळवून घेणं सोपं नव्हतं. परंतु, कालांतरानं त्याने जुळवून घेतलं. पदवी अभ्यासक्रमाच्या अखेरीस पुढे काय, असा प्रश्‍न जेव्हा उभा ठाकला तेव्हा श्रीकांत पुन्हा फिरून आधी होता तिथंच आला. आपल्याला इतरांसारखं प्रतिष्ठित जीवन का जगता येऊ नये, अशा विविध प्रश्‍नांचं काहूर त्याच्या मनात उठलं.
त्यानंतर अमेरिकन कॉर्पोरेट जगतात मिळालेल्या सुवर्णसंधीवर पाणी सोडण्याचा निर्णय श्रीकांतनं घेतला आणि मनात उपस्थित झालेल्या प्रश्‍नांची उत्तरं मिळविण्यासाठी तो मायदेशी परतला. समाजातील अपंगांचे पुनर्वसन, पालनपोषण आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी त्यानं एका सेवा संस्था सुरू केली. आम्ही सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासह व्यावसायिक पुनर्वसनासाठी मदत केली. परंतु, त्यानंतर मला त्यांच्या रोजगाराची चिंता सतावू लागली. त्यामुळे मी ही कंपनी उभी केली आणि १५० अपंगांना रोजगार दिला, असे श्रीकांत आपला जीवनपट उलगडताना सांगत होता.
आपल्या अवतीभोवती नेहमी काहीतरी चांगलं असतं आणि सहसंस्थापक स्वर्णलताच्या रूपानं श्रीकांतला हे चांगलं गवसलं. स्वर्णलता अपंगांच्या शाळेत त्याची शिक्षिका होती. शिवाय ती त्याची मेण्टॉर आणि मार्गदर्शकही होती. तिने बोलॅण्टमधील सर्वांना प्रशिक्षित करून एक सक्षम समुदाय निर्माण केला.
श्रीकांत हाच माझा खरा प्रेरणास्रोत आहे. तो माझा एक युवा मित्र आणि शिष्यच नसून माझा आदर्शही आहे. मनात ठासलं तर काहीही अशक्य नाही, हेच तो मला दररोज शिकवतो. जी व्यक्ती अंध म्हणून जन्माला आली ती आज अनेकांना खर्‍या आनंदाचा मार्ग दाखवत आहे, असं रवी म्हणाला. करून दाखवा, लोकांना श्रीमंत करा आणि एकान्ताचा त्याग करून जीवनात लोकं जोडा, ही श्रीकांतची त्रिसूत्री आहे. शिवाय तुम्ही काहीतरी चांगलं करा, ते परत तुमच्याकडे येतं, असाही त्याचा कानमंत्र आहे…

Posted by : | on : Aug 5 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (31 of 1275 articles)

Indian Rupees
॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर | [caption id="attachment_59178" align="alignleft" width="300"] Indian Rupees[/caption] कागदी नोटांनी जगावर काय वेळ आणली आहे, याचा ...

×