ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » अटलजींची परराष्ट्र धोरणावरील एक मार्मिक मुलाखत

अटलजींची परराष्ट्र धोरणावरील एक मार्मिक मुलाखत

॥ आदरांजली : डॉ. कुमार शास्त्री |

‘अटलजींची मुलाखत’ एक युवाअवस्थेचं स्वप्न होतं! अटलजी एक झपाटणारी विभूतीच होती आणि योगायोगाने आज अटलजींची ‘ती’ मुलाखत साकारत होती! ८ मार्च १९८१ ची ही तरुण भारतसाठी घेतलेली मुलाखत! थकलेल्या स्वरात- ‘‘आईये शास्त्रीजी! सब कुछ तो हम भाषण में ही बतलाते हैं, आप अलगसा क्या पूछने वाले हो, प्रश्‍न लाये हैं?’’ अशी त्यांनी पृच्छा केली. ‘‘जी हाँ. लेकिन भाषण मे आप जो हर वक्त नही बतलाते वही मैं पूछने आया हूँ।’’ मी हिंदीतूनच, शब्द जुळवीत उत्तरलो. अटलजी हसले, प्रश्‍न बघू लागले. पहिल्याच प्रश्‍नावर त्यांची मुद्रा गंभीर झाली. दृष्टी विचारात बुडाली. प्रश्‍न त्यांनी स्वत:च्या ‘स्टाईलने’ पुनश्‍च वाचला! आणि घडाळ्याच्या धावत्या काट्यांशी स्पर्धा करणारी त्यांची धावती मुलाखत सुरू झाली…

Formerindianpmatalbiharivajpayee

Formerindianpmatalbiharivajpayee

(त. भा. रविवार पुरवणी : ८ मार्च १९८१)
…तर जागतिक तणाव वाढतील! -अटलजी
मनोभूमिका
‘अटलजींची मुलाखत’ एक युवाअवस्थेचं स्वप्न होतं! अटलजी एक झपाटणारी विभूतीच होती आणि योगायोगाने आज अटलजींची ‘ती’ मुलाखत साकारत होती! ८ मार्च १९८१ ची ही त. भा.साठी घेतलेली मुलाखत!
अटलजी, श्री गुरुजी समग्रदर्शन ग्रंथमालेच्या प्रथम खंडाच्या प्रकाशनासाठी नागपूरला येणार हे कळताच, मी त्यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू केले. कार्यक्रम भरगच्च, वेळ आणि सवड मिळणे कठीण, तरीही प्रयत्न करून पाहिलाच. अखेर भारतीय विचार साधनेचे अ‍ॅड. सोनटके, बापुराव वर्‍हाडपांडे यांच्या सल्ल्याने मी स्वत:च स्टेशनवर त्यांची भेट घेण्याचे ठरविले! स्टेशनवरील भव्य स्वागत बघून तर मला कठीणच वाटू लागले! गर्दीतून वाट काढीत मी अटलजींपर्यंत पोहोचलो. पुष्पहाराने स्वागत केले आणि मनोदय व्यक्त केला. थकलेले अटलजी प्रथम ‘‘वेळ नाही’’ म्हणाले. क्षण दोन क्षण माझ्याकडे बघितले, अचानक हास्य उमटले आणि अटलजी ताडकन म्हणाले, ‘‘साडेआठ बजे कार्यक्रम के बाद मिलो.’’ जीव भांड्यात पडला! अटलजींचा होकार मिळताच आनंदाला उधाण आलं!
ठीक ८.२५ ला कार्यक्रम आटोपून अटलजी अ‍ॅड. सोनटकेंच्या घरी पोहोचले. तासाभराच्या भाषणानंतर थकलेल्या स्वरात- ‘‘आईये शास्त्रीजी! सब कुछ तो हम भाषण में ही बतलाते हैं, आप अलगसा क्या पूछने वाले हो, प्रश्‍न लाये हैं?’’ अशी त्यांनी पृच्छा केली. ‘‘जी हाँ. लेकिन भाषण मे आप जो हर वक्त नही बतलाते वही मैं पूछने आया हूँ।’’ मी हिंदीतूनच, शब्द जुळवीत उत्तरलो.
अटलजी हसले, प्रश्‍न बघू लागले. पहिल्याच प्रश्‍नावर त्यांची मुद्रा गंभीर झाली. दृष्टी विचारात बुडाली. प्रश्‍न त्यांनी स्वत:च्या ‘स्टाईलने’ पुनश्‍च वाचला! आणि घडाळ्याच्या धावत्या काट्यांशी स्पर्धा करणारी त्यांची धावती मुलाखत सुरू झाली…
मुलाखत
प्रश्‍न : अमेरिकेचे नूतन अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी सत्तेवर आल्याआल्याच रशियावर टीकास्त्र सोडले, याचा आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीवर कोणता परिणाम संभवतो?
मि. रिगन यांच्या निवडीने अमेरिकेत एका नव्या अध्यायाची सुरवात होत आहे. हे नव-परिवर्तन कसे राहील? भूतपूर्व परराष्ट्रमंत्री या नात्याने आपण काय म्हणाल?
रिगन शांततावादी धोरण स्वीकारतील?
अटलजी : मि. रिगन जेव्हा आपल्या निवडणूक प्रचाराची भाषणे अमेरिकेत करीत होते तेव्हा त्यातील रोख पाहता ते रशियावर टीका करतील, असे वाटत नव्हते. मि. रिगन आणि त्यांचे निर्वाचित परराष्ट्र मंत्री दोघेही निवडणुकीच्या भाषणात शांततावादी धोरणाचे पुरस्कर्ते होते आणि माझ्या मते सत्तेवर आल्यानंतरसुद्धा त्यांनी शांततावादी धोरणाचाच पुरस्कार केला आहे.
यावरून आपण कल्पना करू शकतो की, शांतताच अमेरिकन जनमानसाला अधिक अभिप्रेत आहे व त्यामुळे मि. रिगन हे आंतराष्ट्रीय स्थितीत शांततावादी धोरणाचा अधिक पुरस्कार करतील, असे वाटते. हं, नवपरिवर्तन एकच दिसतंय, ते हे की, अमेरिका आणि चीन यांच्या संबंधात मूलभूत परिवर्तन घडून येत आहे. या मूलभूत परिवर्तनाच्या परिणामी (बुनियादी परिवर्तन) त्यांचे संबंध निकटचे होत आहेत.
विश्‍वयुद्ध शक्य नाही
प्रश्‍न : आपण चीनचे नाव घेतले म्हणून विचारतो. चीनचे उपपंतप्रधान डेंग यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना असे म्हटले आहे की, तृतीय महायुद्ध अटळ आहे. डेंग पुढे म्हणतात की, रशिया चीनला तीन दिशांनी घेरू पाहात आहे आणि तो आपला दबावही वाढवू पाहात आहे…
अटलजी : कोणत्या तीन दिशा?
मी : रशिया-चीन सीमा, व्हिएतनाम-चीन सीमा आणि भारत-चीन सीमा या त्या तीन दिशा आहेत. युरोपीय आणि अशियाई प्रदेशावर रशिया दिवसेंदिवस अधिक प्रभुत्व वाढवू इच्छितो आणि ही परिस्थिती अधिक स्फोटक झाल्यास तृतीय महायुद्ध भडकेल, असेही डेंंग म्हणतात. डेंग यांच्या विधानावर आपण काय प्रतिक्रिया द्याल?
अटलजी : चीनचे हे विधान फार पूर्वीपासूनचेच आहे. चीन नेहमीच म्हणत आला आहे की, रशियाकडून त्याला धोका आहे. डेंग यांनी फक्त पुनरुच्चार केला आहे. केवळ चिनीच नव्हे, तर रशियन नेतेही, चीनकडून धोका आहे, असे परस्पर आरोप करीत असतात. दोन्ही साम्यवादी राष्ट्र असूनही ती परस्परांना शत्रू मानतात, हे एक आश्‍चर्यच आहे.
पण, ‘तृतीय महायुद्धाची शक्यता वाटत नाही.’ कारण महायुद्धात केवळ हारणार्‍याचीच हानी होत नाही, तर विजय प्राप्त करणार्‍यांचीपण तेवढीच हानी होत असते. आणि कुठलेही राष्ट्र हे धोक्याचे पाऊल उचलण्यापूर्वी विचारच करील! एक गोष्ट खरी आहे की, मध्यंतरी चीन-रशिया तणाव वाढला होता. पण, आता हा तणाव कमी झाला आहे, चीन आता काळजीपूर्वक पावले टाकील. कारण त्यालाही शक्तिस्पर्धेची जाणीव झाली आहे.
प्रश्‍न : आपण म्हणता, तृतीय महायुद्धाची शक्यता नाही, पण वर्तमान स्थितीत हिंदी महासागरातील तणाव, अफगाणिस्तानवरील रशियाचे प्रभुत्व, इराण-इराक संघर्ष, काम्पुचियावर असलेली रशियाची लबाड नजर, तसेच चीन-अमेरिका सहसंबंध यावरून ही वादळापूर्वीची शांतता किंवा युद्धाची नांदी वाटत नाही काय?
छोट्या युद्धांची शक्यता
अटलजी : हिंदी महासागराच्या क्षेत्रात बलाढ्य शक्तींमध्ये तणाव निर्माण होतोय्, ही गोष्ट सत्य आहे. रशियाचे अफगाणिस्तानवरील प्रभुत्वही बेचैन करणारे आहे. अमेरिका-चीन संबंध जरी जवळिकीचे असले, तरी युद्धात अमेरिका शक्यतो क्रियाशील होणार नाही, अमेरिका चीनचा उपयोग करून घेईल व आशियाई, युरोपीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल राष्ट्रांवर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करील! उदा. लॅटिन अमेरिका, आफ्रिकन देश, आशियायी छोटी दुर्बल राष्ट्रें यावर प्रभुत्व गाजविण्याची बलाढ्य शक्तींमध्ये स्पर्धा होण्याची शक्यता आहे व यातूनच लहान लहान संघर्ष होण्याची शक्यता आहे. पण, त्यासाठी ‘विश्‍वयुद्ध’ होण्याची शक्यता मात्र फार कमी वाटते!
प्रश्‍न : चीनला काम्पुचिया या समृद्ध भूमीला जाण्यासाठी तिबेट व लडाखवरून जवळचा मार्ग आहे आणि त्यासाठी रशिया भारतावर हा प्रदेश जिंकण्यासाठी दबाव आणीत आहे? या दृष्टीने माजी प्रधानमंत्री मोरारजीभाईंनी केलेले वक्तव्य ‘रशियाने दबाव आणला होता हे खरे’ वाटते!
अटलजी : (हास्यातून अर्थहीनता दाखवीत) मोरारजीभाई के बात को छोडो… पण मला नाही वाटत, रशिया दबाव आणील. कारण काम्पुचियाला जाण्यासाठी दुसराही मार्ग उपलब्ध आहे आणि भारताने तो प्रदेश जिंकून रशियाला काय फायदा?
एक गोष्ट खरी आहे, ती म्हणजे बरेच दिवसपर्यंत रशिया हे मानीत होता की, ‘तिबेट’ हा चीनच्या राजअधिकारातला भाग आहे, पण आता मात्र रशिया म्हणतो की, ‘तिबेट’ भारताच्या राजअधिकारात आहे! दुसरी गोष्ट अशी की, सद्य:स्थितीत भारत-चीन संबंध सुधारण्याच्या स्थितीत आहेत!
प्रश्‍न : मग प्रश्‍न असा उपस्थित होतो की, विश्‍वयुद्ध आशियाई भूमीवर, पण युरोपियन राष्ट्रांसाठी होईल, तसेच त्या युद्धाचे स्वरूप आण्विक न राहता, ‘कन्व्हेन्शनल वॉर’चे राहील, हे विधान खरे आहे काय?
अटलजी : हं. आण्विक युद्धाची शक्यता नाही. पण, मी म्हटल्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर तसेच साधनसामुग्रीने संपन्न प्रदेश जिंकण्याच्या दृष्टीने लहान लहान युद्धे होण्याची शक्यता टाळता येत नाही. आणि ही लहान युद्धे आशियाई, युरोपियन आणि आफ्रिकन भूमीवरच होण्याची शक्यता आहे! हे मात्र शक्य आहे.
प्रश्‍न : इतिहास असे सांगतो की, बाबरने जसे काबूल, दिल्ली व कलकत्ता या मार्गावर प्रभुत्व ठेवले होते, त्याचप्रमाणे भविष्यात रशिया अफगाणिस्तान-भारत-कम्बोडिया या प्रदेशावर प्रभुत्व ठेवू इच्छित नाही काय?
अटलजी : (प्रश्‍नार्थक मुद्रा करून) कैसे? भारत हे एक मोठे राष्ट्र आहे. कम्बोडिया आणि अफगाणिस्तान यांच्यापेक्षा मोठे आणि प्रभावशाली राष्ट्र आहे. आणि आम्ही का म्हणून रशियाच्या प्रभुत्वाखाली येऊ? भारतावर प्रभुत्व मिळविणे इतकी सोपी गोष्ट नाही. कल्पनेच्या पलीकडील बाब आहे ती.
प्रश्‍न : पाकिस्तानातील स्थितीबद्दल आपण काय म्हणाल?
अटलजी : पाकिस्तानची परिस्थिती बिकट आहे! आजवर त्यांनी राष्ट्ररक्षणाच्या साहाय्यार्थ अमेरिकेकडे व पाश्‍चिमात्य राष्ट्रांकडे हात पसरले. पण, व्हिएतनामच्या पराजयानंतर अमेरिकन जनमानस आता इतक्या दूरवर सैन्यपुरवठा करण्यास तयार नाही.
आक्रमणाचा धोका नाही
प्रश्‍न : श्रीमती इंदिरा गांधी वारंवार म्हणतात की, विदेशी शक्तीपासून भारताला धोका आहे? या विदेशी शक्ती कोणत्या आहेत व या विधानात वास्तवता किती आहे?
अटलजी : (हसून) ‘‘इंदिराजी को ही पूछो!’’ (गंभीर होऊन) जर भारताला धोका आहे, तर कोणत्या शक्तीपासून धोका आहे, हे त्या स्पष्ट का सांगत नाहीत? कमीतकमी विरोधी पक्षांना शक्तीपासून धोका आहे, हे का सांगू नये? (आवेश व भावनाप्रधान होऊन) ‘‘इस तरहसे प्रधानमंत्री ने बोलना, यह बात खतरनाक खेल हैं।’’
वर्तमान स्थितीत ‘तत्काळ’ या शब्दावर जोर देऊन ‘मी’ बोलतोय्, भारताला कोणत्याच दिशेने आक्रमणाचा धोका नाही, असे मला वाटते. देशातील महागाई आणि अस्थिर परिस्थिती यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे ओढण्यासाठी जर ही धूळफेक केली जात असेल, तर हेच सगळ्यात धोक्याचे आहे, असे म्हणावे लागेल. तरीसुद्धा भारताने सदैव सावध राहायला हवे, असे मात्र मी निश्‍चितच म्हणेन!
प्रश्‍न : आपण परराष्ट्रमंत्री असताना शेजारी राष्ट्रांशी आपण सलोख्याचे संबंध वाढविण्याचा नवा अध्याय सुरू केला होता. वर्तमान सरकारने विदेशी नीतीत परिवर्तन केले. त्याचा संभाव्य परिणाम काय? या अस्थिर परिस्थितीत आंतरराष्ट्रीय धोरण कसे असायला हवे?
शेजार-राष्ट्रसंबंध सुधारावेत
अटलजी : सद्य:परिस्थितीत शेजारी राष्ट्रांशी आमचे संबंध पुनश्‍च बिघडले आहेत. कारण श्रीमती गांधी आणि त्यांचे सरकार विश्‍वासाची भावना उत्पन्न करू शकले नाही. भारत हे एक मोठे राष्ट्र आहे आणि शेजारी राष्ट्रे ही छोटी आहेत. ‘‘बिना राष्ट्रीय हितोंकी बली चढाते हुए हम, पडोसी राष्ट्रों को दिखा सकते हैं की हम शक्तिशाली और समृद्ध राष्ट्र हैं!’’
जनता शासनाने शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्यासाठी व मैत्री वाढविण्यासाठी राष्ट्रीय हितसंबंधाचा बळी दिला. हा श्रीमती गांधींचा आरोप निराधार आहे. या दृष्टीने श्रीमती गांधींनी काही दिवसांपूर्वी फराक्काचे उदाहरण सांगितले! ते ऐकून मला त्यांच्या वक्तव्याबद्दल धक्कादायक आश्‍चर्य वाटले. १९७५ साली श्रीमती गांधींनी बंगलादेशाशी समझोता केला होता. त्या अंतर्गत भारताला ११ ह. ते १६ ह. क्युसेक पाणी मिळत होते. त्यानंतर जनता सरकारने जो समझोता केला, त्यानुसार १६ ह. ते २२॥ ह. क्युसेस पाणी प्राप्त होऊ लागले. ही वस्तुस्थिती असूनसुद्धा इंदिराजींनी जनता सरकारने देशहिताचा बळी दिला असे म्हणावे, हे अचंबा वाटणारे विधान आहे. इंदिराजींच्या वक्तव्यावर बांगलादेशात तर तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे.
नेपाळशी आमचे संबंध पूर्वीप्रमाणे चांगले राहिले नाहीत. ‘भूतान’च्या बाबतीत बेचैनी दिसून येते. श्रीलंकेच्या भूतपूर्व प्रधानमंत्री श्रीमती भंडारनायके यांच्याशी संबंध जोडून श्रीमती गांधींनी कोलंबोत अविश्‍वास निर्माण केला आहे. एकूण असे दिसते की, इंदिराजी शेजारी राष्ट्रांशी बरोबरीच्या नात्याने वागून पारस्परिक हितसंबंधांचा विकास करू इच्छित नाहीत.
‘अफगाणिस्तान’वरील ‘रशिया’चे प्रभुत्व बघून आशियातील सर्व देशांनी एकत्रित यायला हवे. कारण आर्थिक व एकंदर सुरक्षाविषयक बाबी या परस्परावलंबी आहेत. शेवटी असे लक्षात येते की, आम्ही अडीच वर्षांत जे प्राप्त केले होते ते एका वर्षात गमावण्यात आले!
प्रश्‍न : प्रत्येक क्षेत्रातच अस्थिरता दिसून येत आहे. ही आणिबाणीपूर्वीची पूर्वतयारी तर नाही! पुनश्‍च आणिबाणी लावली जाईल काय?
आणिबाणी- शब्द नाही-परिस्थिती येतेय्
अटलजी : नाही, आता आणिबाणी आणणे इतके सोपे नाही. आम्ही जनता शासनाच्या वेळीच भारतीय संविधानात संशोधन केले व सुधारणा केल्या. त्यामुळे ‘आणिबाणी’ लादली जाणे सोपे नाही. पण, आणिबाणीसारखी परिस्थिती मात्र निर्माण केली जात आहे.
आसाममध्ये सेन्सॉरशिप लावली, मुंबईत आमच्या कार्यकर्त्यांना भिवविण्यासाठी अटक केली जात आहे. नजरबंदी कायदा वगैरे गोष्टी निराळ्या पद्धतीने राबवून आणिबाणीसारखीच परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र सुरू आहे.
प्रश्‍न : आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी ‘आर्थिक आणिबाणी’ कलम ३६० खाली लावली जाण्याची शक्यता आहे काय?
अटलजी : नाही. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडेल. परस्परविरोध आणखीनच वाढेल, सरकारला आर्थिक आणिबाणी लावणे परवडणार नाही.
प्रश्‍न : ‘रग रग हिंदु मेरा परिचय’ ही अटलजींची प्रतिमा आणि दुरावलेल्या लाखो मुस्लिम बांधवांच्या संवेदना घेऊन मी पाकिस्तानात आलो आहे, हे म्हणणारे अटलजी…
अटलजी : (प्रश्‍न तोडतच) – रग रग हिंदु मेरा परिचय’ ही प्रतिमा केव्हा पसंत होती? आणि नंतर विरोधी म्हणू लागले की मी जनसंघात होतो, त्यापेक्षा बदललो आहे. ‘‘बदल गये ये शिकायत हैं, और शिकायत का कोई ना कोई रास्ताही विरोधी खोजते रहते हैं! आत्मा वही रहती है, भेष बदलता है!’’
आता मात्र घड्याळाचा काटा नऊचाळीसवर पोहोचला होता. फक्त दहा मिनिटे उरली होती. काही प्रश्‍न विचारता आले असते. पण, रंगात आलेली मुलाखत वेळेच्या अभावी थांबवावी लागली. अटलजींनी ‘आत्मा’ वही हैं, हे अधोरेखित करून आपला पुन:श्‍च ‘खरा परिचय’ मुलाखतीतून करून दिला!

Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (341 of 875 articles)

Modi Notebandi
सारांश : ल.त्र्यं. जोशी | हल्ली काँग्रेसने एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे धडाक्यात खोटे व बिनबुडाचे आरोप मोदी ...

×