ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » अटलजींच्या सहवासात…

अटलजींच्या सहवासात…

॥ प्रासंगिक : शशिकुमार भगत |

Atal Bihari Vajpayee File

Atal Bihari Vajpayee File

मंगळवार दि. ३ जून २००३! जर्मनी, रशिया व स्वित्झर्लंड या तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विशेष विमान मायदेशी परत निघाले होते. या विमानात अटलजी यांच्या प्रतिनिधी मंडळासोबत-जे सुमारे दोन डझन पत्रकार होते- त्यात सुदैवाने ‘तरुण भारत’च्या वतीने माझाही नंबर लागला होता. गेले आठ दिवस आम्ही अटलजींच्या सतत संपर्कात होतो. भरगच्च कार्यक्रम सुरू होते. दिग्गज जागतिक नेत्यांशी अटलजींच्या भेटी सुरू होत्या. त्या धावपळीत त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता येणे शक्यच नव्हते. पण, परतीच्या प्रवासात मात्र त्यांची थोडा वेळ तरी भेट व्हावी, अशी तीव्र इच्छा होती. आणखी आठ-दहा तासांनी भारतात पोहोचलो की, पुन्हा पंतप्रधानांच्या जवळ जाण्याची संधी मिळणे दुरापास्त होते. आम्ही, मीडियाप्रमुख अशोकजी टंडन यांना भेटलो. अटलजींची लहानशी तरी मुलाखत मिळावी, अशी विनंती केली. अटलजींना विचारून कळवितो, असे ते म्हणाले. तासाभराने त्यांनी निरोप आणला- तीन-चार पत्रकारांना अटलजी भेटू शकतील. प्रत्येकाने दहा मिनिटांहून अधिक त्यांचा वेळ घेऊ नये. एकामागून एक अटलजींच्या कक्षात जाणारे चार पत्रकार त्यांनीच निवडले. त्यात सुदैवाने माझ्याही भाग्याने मला साथ दिली.
एक अपूर्व अनुभव!
विमानातील अटलजींच्या चेंबरमध्ये प्रवेश केला तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून आला होता. आकाशाएवढ्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाच्या सान्निध्यात काही मिनिटे मला घालविता आली, हा माझ्या जीवनातील एक अपूर्व, चिरंतन टिकणारा व अविस्मरणीय क्षण होता. काही प्रश्‍नोत्तरे झाली. काश्मीरप्रकरणी आमचा जो संवाद झाला, तोच संदर्भ त्यांनी दिल्ली विमानतळावर उतरल्यावर पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरं देताना दिला होता. तरुण भारतसाठी मला एक मुलाखत मिळाली होती. पण, त्याहूनही आनंद होता- अटलजींच्या सहवासात घालविलेल्या देवदुर्लभ क्षणांचा !
अटलजी २००३ साली मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जर्मनी, रशिया व स्वित्झर्लंड या तीन देशांच्या दौर्‍यावर गेले होते. वाजपेयी मंत्रिमंडळातील परराष्ट्र व्यवहारमंत्री यशवंत सिन्हा व उद्योग-वाणिज्यमंत्री अरुण जेटली त्यांच्या समवेत होते. पंतप्रधान कार्यालयाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी ब्रजेश मिश्र व परराष्ट्र सचिव कवल सिब्बल यांच्यावर या दौर्‍याची धुरा होती; तर सुधींद्र कुळकर्णी व अशोकजी टंडन यांच्याकडे मीडियाची जबाबदारी होती. अटलजींचे कुटुंबीय म्हणून रंजन भट्टाचार्य, नमिता कौल-भट्टाचार्य व निहारिका, ही नावेही आम्हाला मिळालेल्या सहप्रवाशांच्या यादीत होती. प्रादेशिक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी फार थोडे होते. सुमारे दोन डझन पत्रकारांच्या यादीत बहुतांश नामवंत मंडळी होती. त्यात एशियन एजचे संपादक एम. जे. अकबर, पायोनियरचे संपादक चंदन मित्रा, हिंदुस्थानच्या संपादक मृणाल पांडे, टेलिग्राफचे संपादक भारत भूषण अशा बड्या मंडळींचा समावेश होता. यातील अनेकांना अटलजी व्यक्तिश: ओळखत होते. एम. जे. अकबर सध्या मोदी मंत्रिमंडळात मंत्री आहेत, तर चंदन मित्रा पुढे राज्यसभेवर निवडून गेले होते. या पार्श्‍वभूमीवर अटलजींसोबत काही क्षण घालविता येणे माझ्यासाठी व तरुण भारतसाठीही सुवर्णक्षण होता.
बर्लिन ते पीटस्बर्ग
माझा हा पहिलाच विदेश दौरा होता व तोही भारताच्या पंतप्रधानांसमवेत! त्यामुळे मनावर दडपण होते. पंतप्रधान त्याच विमानातून प्रवास करणार असल्याने विमानाची रचना वेगळी होती. सुरक्षाव्यवस्था जय्यत होती. त्या विमानातून जाणार्‍या प्रतिनिधी मंडळात वाजपेयींचे कुटुंबीय, दोन मंत्री, परराष्ट्र खात्यातील वरिष्ठ अधिकारी, दोन डॉक्टर, पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी व सुरक्षा अधिकारीही होते. एअरक्राफ्ट सिक्युरिटी चमूची संख्याही पंचवीसवर होती. हे विमान प्रत्येक शहरात उतरल्यावर पंतप्रधानांना घेऊन जाणार्‍या गाड्यांचा क्रम कसा राहील व कोणत्या गाडीत कोण बसणार, याचे संपूर्ण वेळापत्रक पत्रकारांनाही दिल्लीहून प्रस्थान करतानाच देण्यात आले होते. दिल्ली- बर्लिन हा पहिला टप्पा नऊ तास २० मिनिटांचा होता. जर्मनीचे चान्सलर गेरहार्ड व प्रेसिडेंट जोहान्स राऊ यांच्या भेटी व नंतरची पत्रपरिषद, हा प्रमुख कार्यक्रम होता (या निमित्ताने बर्लिनची भिंतही पाहता आली). अटलजींनी तेथील संसदेला संबोधित केले. म्युनिच येथे भारत-जर्मनी उद्योगपतींच्या भेटी झाल्या. त्यातून काही करार झाले. तेथे अटलजींनी विद्वत्जनांच्या एका मेळाव्यातही मार्गदर्शन केले.
त्यानंतरचा पडाव रशियातील पीटस्बर्ग येथे होता. पीटस्बर्ग शहराचा तीनशेवा वर्धापनदिन रशियन सरकारने मोठ्या उत्साहाने साजरा केला. या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे व या समारंभासाठी रशियाने जगभरातील राष्ट्रप्रमुखांना निमंत्रित केले होते. अमेरिकेसह ८० वर देश या सोहळ्यात सहभागी झाले होते. येथून अटलजी जी-८ परिषदेसाठी स्वित्झर्लंडला जाणार होते.
दोन दिग्गजांतर्फे स्वागत!
या दौर्‍यातील एका अभिमानास्पद घटनेचा आवर्जून उल्लेख करायला हवा. जर्मनीचा दौरा आटोपून अटलजी पीट्सबर्ग येथे पोहोचले तेव्हा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांचे थाटात स्वागत केले. त्यांच्या सन्मानार्थ सिल्वर व्हीस्पर शिपवर मेजवानी आयोजित करण्यात आली होती. दुसर्‍या दिवशी नेवा नदीच्या परिसरात मुख्य समारंभ होता. रात्री थ्रोन हॉलमध्ये शाही मेजवानी होती. जगातील बहुतांश देशांचे प्रमुख त्यात सहभागी झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश व रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या टेबलवर अटलजींसाठी जागा ठेवण्यात आली होती. अटलजींचे तेथे आगमन झाले तेव्हा बुश व पुतिन दोघांनीही उभे राहून व पुढे जाऊन अटलजींचे स्वागत केले आणि त्या तिघांनीही एकत्र भोजन घेतले. फ्रान्स-ब्रिटनपासून अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख तेथे उपस्थित असताना, जगातील दोन महाशक्तींकडून भारताच्या पंतप्रधानांना असा सन्मान मिळणे सामान्य बाब नव्हे. जगातील अनेक वृत्तपत्रांनी त्या वेळी या घडामोडीची नोंद घेतली व त्याला प्रसिद्धी दिली, हेही उल्लेखनीय!
चीन दौर्‍यावर असताना वाजपेयींना प्रश्‍न विचारण्यात आला होता, ‘‘भारत रशियाच्या बाजूने आहे की अमेरिकेच्या?’’ अटलजींचे तत्काळ आणि तडफदार उत्तर होते- ‘‘ते दोघेही भारताच्या बाजूने आहेत!’’ अटलजींच्या परराष्ट्र धोरणाची, दूरदृष्टीची आणि जगातील नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेल्या आदराची प्रचीती यानिमित्ताने पुन्हा एकदा आली. चीनच्या पत्रकारांना त्यांनी जे उत्तर दिले होते, तो केवळ कल्पनाविलास नव्हता, हे त्यांनी सिद्धही करून दाखविले.
लोकसभाध्यक्षांचा मान
या निमित्ताने आणखी एका प्रसंगाचा उल्लेख अनुचित ठरणार नाही. सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम होती. प्रमोद महाजन भंडारा जिल्ह्यात दौर्‍यावर येणार होते. त्यांची मुलाखत घ्यावी, असे मला तरुण भारतकडून सांगण्यात आले. कार्यक्रम व्यग्र होता. त्यामुळे प्रमोदजींसोबत भंडारा दौर्‍यावर जावे व वेळ मिळेल तेव्हा मुलाखत घेऊन परत यावे, असे ठरले. प्रमोदजी भंडार्‍याला असताना त्यांना निरोप मिळाला, अटलजींना त्यांच्याशी बोलायचे होते. सभा संपल्यावर बोलेन, असा निरोप प्रमोदजींनी दिला. रात्री अटलजी व प्रमोदजी यांचे बोलणे झाले व त्याचा मथितार्थ प्रमोदजींकडूनच कळला. लातूरला अटलजींची सभा होती. तेथे काँग्रेस उमेदवार म्हणून शिवराज पाटील उभे होते. ते तत्पूर्वी लोकसभाध्यक्ष होते. या खुर्चीला एक मान आहे. त्यामुळे त्यांच्या गावात त्यांच्याविरुद्धच्या सभेत बोलणे मला उचित वाटत नाही, असे अटलजींनी स्पष्टपणे प्रमोद महाजन यांना सांगितले व दौर्‍याच्या कार्यक्रमात फेरबदल करावा, असे सुचविले. अटलजींचे मन बदलविणे सोपे नव्हे, हे प्रमोदजींना पुरेपूर ज्ञात होते. अटलजींनी त्या सभेत सर्वात शेवटी भाषण करावे, व्यक्तिगत कोणताही उल्लेख करायचा नाही, असा तोडगा निघाला. प्रमोदजींची सूचना तर मान्य झाली, पण या निमित्ताने अटलजींच्या विशाल हृदयाचे आणि विरोधकांनाही पूर्ण सन्मान देण्याच्या अतुलनीय भूमिकेचे सम्यक् दर्शन घडले. आजच्या गढूळ झालेल्या राजकारणात, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी हे भान ठेवावे. यापासून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी व आदर्श ठेवण्याचा किमान प्रयत्न तरी करावा म्हणून या घटनेचा उल्लेख!
अनंताच्या प्रवासाला निघालेल्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाला ही श्रद्धांजली!

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (356 of 875 articles)

Maharashtra Police2
अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार पडणार नाही याची काळजी घेत त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जावा. ...

×