ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, श्यामकांत जहागीरदार, स्तंभलेखक » अटलजी अटल थे, अटल हैं और अटल रहेंगे…

अटलजी अटल थे, अटल हैं और अटल रहेंगे…

॥ प्रासंगिक : श्यामकांत जहागीरदार |

अटलजींना आपल्यातून जाऊन एक महिना होवून गेला. त्यानिमित्त त्यांची सावलीसारखी सोबत करणारे त्यांचे घनिष्ठ मित्र, निकटवर्ती, अघोषित स्वीय सचिव, सहायक तसेच अंगरक्षक शिवकुमार पारिक यांनी सांगितलेल्या काही आठवणी खास तभाच्या वाचकांसाठी…

Atalji1

Atalji1

‘‘अटलजी अटल थे, अटल हैं, अटल रहेंगे, लेकीन साथ साथ वो बिहारी भी थे…’’ जवळपास ५० वर्षे, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची सावलीसारखी सोबत करणारे त्यांचे घनिष्ठ मित्र, निकटवर्ती, अघोषित स्वीय सचिव, सहायक तसेच अंगरक्षक… अशा विविध जबाबदार्‍या स्वेच्छेने तसेच निष्ठेने पार पाडणारे शिवकुमार पारिक अतिशय भावुक होत बोलत होते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे मनातून खचलेले शिवकुमार, डीफेन्स कॉलनीस्थित आपल्या निवासस्थानी ‘तरुण भारत’शी बोलत होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना शिवकुमार यांनी अतिशय व्यथित अंत:करणाने यावेळी उजाळा दिला. शिवकुमार बोलताबोलता वेगळ्याच दुनियेत गेले होते…
१९५१ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संविद सरकारमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, नेहरूंशी विविध मुद्यांवर मतभेद झाल्यामुळे डॉ. मुखर्जी यांनी राजीनामा दिला. गुरुजी गोळवलकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काही नेत्यांनी जनसंघाची स्थापना केली. डॉ. मुखर्जी यांच्याकडे जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून जबाबदारी आली. काही दिवसांतच जम्मू-काश्मीरमधील परमिट राजच्या विरोधात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आंदोलन छेडले. या आंदोलनासाठी डॉ. मुखर्जी श्रीनगरकडे निघाले. अटलबिहारी वाजपेयी पत्रकार म्हणून त्यांच्यासोबत होते. पठाणकोटला डॉ. मुखर्जी यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक करून श्रीनगरला नेताना डॉ. मुखर्जी अटलबिहारींना म्हणाले, ‘‘अटलजी, तुम जाओ, सारे देश को बताओ, मैने काश्मीरका अन्याय कानुन तोडा हैं.’’ पण, आपली डॉ. मुखर्जी यांच्याशी ही शेवटची भेट आहे, हे त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांना माहिती नव्हते. काही दिवसांत श्रीनगरच्या तुरुंगात संशयास्पद स्थितीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू झाला, देशभर संतापाची लाट उसळली. वाजपेयी यांनी ‘राष्ट्रधर्म’च्या संपादकीयातून काश्मिरातील अब्दुल्ला सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर डॉ. रघुवीर जनसंघाचे अध्यक्ष झाले. डॉ. रघुवीर यांना १७ भाषा येत होत्या! डॉ. राममनोहर लोहिया यांच्या निवडणूक प्रचारसभेत भाषण करून परत येत असताना त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली. यात डॉ. रघुवीर यांचा मृत्यू झाला. या अपघाताचे कारण कधीच समजले नाही.
दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी यांचा जनसंघात प्रवेश झाला होता. जनसंघाचा प्रभावही वाढू लागला होता. १९५३ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी लखनौमधून सरोजिनी नायडू यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. १९५७ मध्ये पुन्हा अटलबिहारी वाजपेयी लखनौ, मथुरा आणि बलरामपूर अशा तीन मतदारसंघांतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यांपैकी बलरामपूरमधून ते विजयी झाले, मात्र लखनौ आणि मथुरा येथे त्यांचा पराभव झाला. यानंतर मात्र वाजपेयी यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. राजकारणात त्यांनी कधीही आपल्या विरोधकांना विरोधक मानले नाही. भाषणातून कधी कंबरेखाली वार केला नाही. त्यामुळे वाजपेयी यांची राजकारणातील लोकप्रियता वाढत होती.
१९६५ मध्ये केरळमधील कालिकत येथे झालेल्या जनसंघाच्या अधिवेशनात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जनसंघाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. जनसंघाचे अध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम करत असताना ११ फेब्रुवारी १९६७ मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा मृतदेह मुगलसराय रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये रेल्वेरुळावर आढळला. पंडितजींच्या अशा संशयास्पद मृृत्यमुळे प्रचंड खळबळ उडाली. दीनदयाल उपाध्याय यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात आले. दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. जनसंघाच्या तिसर्‍या अध्यक्षाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता.
दीनदयाल उपाध्याय यांच्या जागेवर अटलबिहारी वाजपेयी यांची जनसंघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. १९६६ च्या सुमारास मी जयपूरहून दिल्लीला आलो होतो आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होतो. मी सुरुवातीपासून अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रशंसक होतो. अटलजी माझे हिरो होते. त्यांचे वक्तृत्व, कविता आणि लेख यांमुळे मी प्रभावित झालो होतो. जनसंघाच्या तीन अध्यक्षांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे माझ्या मनात अटलजींबद्दल चिंता निर्माण झाली होती. त्या काळात नेत्याला विशेषत: जनसंघाच्या नेत्याला खाजगी सचिव आणि सुरक्षा असा प्रकार नव्हता.
जनसंघाचे नेते एकटेच देशभर प्रवास करत होते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यासोबत एखादा कार्यकर्ता असता तर त्यांचा असा मृत्यू होऊ शकला नसता, असे माझ्या मनात येत होते. त्यामुळे अटलजींना सोबत आणि त्यांची सेवा करण्याचा विचार माझ्या मनात येत होता, अटलजींशी माझी ओळख होती, पण त्यांच्याशी बोलायची हिंमत होत नव्हती. एक दिवस हिंमत करून मी त्यांच्याशी बोललो, पण, त्यांनी माझे म्हणणे उडवून लावले. मृत्यूला का घाबरायचे, असा प्रतिप्रश्‍न मला केला. त्यामुळे हा विषय लांबणीवर पडला. वर्षभर काहीच झाले नाही.
अटलजींसोबत काम करण्याची माझी इच्छा संघपरिवारात बहुतेकांना माहीत झाली होती. वर्षभरानंतर अटलजींना जयपूरला एका कार्यक्रमासाठी जायचे होते. दिल्ली प्रांत संघचालक सोमसिंह तसेच नानाजी देशमुख यांनी, अटलजींसोबत तू जयपूरला जा, असे मला सांगितले. जयपूरला माझे घर आहे, हे या दोघांना माहिती होते. माझा आनंद गगनात मावेना. जे स्वप्न मी पाहिले होते, ते पूर्ण होण्याच्या दिशेने सुरुवात झाली होती. पडत्या फळाची आज्ञा मानून मी अटलजींच्या घरी आलो व त्यांना मी तुमच्यासाबत जयपूरला येतो, असे सांगितले. अटलजींनी माझ्याकडे पाहिले. तुझे जेवण झाले का, अशी विचारणा अटलजींनी मला केली. मी नाही म्हणताच त्यांनी मला जेवण करायला सांगितले.
आम्ही पुरानी दिल्ली रेल्वेस्थानकावर जयपूरची गाडी पकडायला आलो. रात्री साडेदहाची गाडी होती. प्रथम श्रेणीच्या डब्यात अटलजींचे तिकीट होते. पहाटे साडेपाच वाजता गाडी जयपूरला पोहोचली. भैरोसिंह शेखावत रेल्वेस्थानकावर अटलजींना घ्यायला आले होते. मी अटलजींचे सामान गाडीतून काढत असताना भैरोसिंह शेखावत यांच्या गाडीत बसून अटलजी निघून गेले. थोडे अंतर जाताच त्यांना माझी आठवण आली. त्यांनी शेखावतांना विचारले, माझ्यासोबत एक कार्यकर्ता होता, तो कुठे आहे? शेखावत म्हणाले, तो जयपूरचाच आहे, आपल्या घरी निघून जाईल. पण, अटलजींनी गाडी मागे घेतली आणि मलाही गाडीत बसवले. दिवसभर त्यांच्यासोबत राहून आम्ही रात्रीच्या गाडीने दिल्लीला परतलो.
पुन्हा काही दिवसांची गॅप गेली. एक दिवस मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो आणि मला तुमच्यासोबत काम करायचे आहे, असे अटलजींना म्हटलेे. अटलजी म्हणाले, मी संन्यासी माणूस, माझ्या मागेपुढे कोणी नाही, तुला पगार द्यायलाही माझ्याजवळ पैसेही नाहीत. मी म्हटले, मला तुमची सेवा करायची आहे, मला पैसे नको, मी तुम्हाला कधीच काही मागणार नाही. अटलजींनी ते मान्य केले आणि मी अटलजींच्या सेवेत रुजू झालो. माझ्या जीवनातील हा नवा अध्याय होता.
माझा हा निर्णय पाहून औरंगाबादचे गोविंदभाई श्रॉफ अतिशय खुष झाले. तुम्ही अतिशय चांगला निर्णय घेतला, आता आयुष्यभर अटलजींच्या सेवेतच राहा, कोणतीही काळजी करू नका. काही लागले तर मला सांगा, मी तुमच्यासोबत आहे, असे म्हणत त्यांनी माझा उत्साह वाढवला.
राजकारणात अटलजी सक्रिय होते, त्यांचा प्रभाव वाढत होता. १९७१ ची निवडणूक ते ग्वाल्हेरहून लढले आणि जिंकलेही. अटलजी ग्वाल्हेरला फक्त उमेदवारी अर्ज भरायला आणि नंतर विजयाचे प्रमाणपत्र घ्यायला यायचे. त्यांच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी मी सांभाळत असे.
१९७५ मध्ये आणिबाणी लागली. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. बंगलोरच्या तुरुंगात अटलजी १९ महिने होते. कंबरेच्या दुखण्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर येताच अटलजींनी कनॉट प्लेस आणि करोलबागमध्ये भाषण दिले. देशातील राजकीय घडामोडींमुळे आणिबाणी उठवण्यात आली, निवडणुका घोषित झाल्या. निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, अशी नानाजी देशमुख यांची इच्छा होती. अटलजींनी निवडणूक लढवण्यासाठी त्यांचे मन वळवले. मी तुरुंगात जाऊन, उमेदवारी अर्जावर नानाजी देशमुख यांची स्वाक्षरी घेतली. नानाजी देशमुख निवडणूक जिंकले. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात नवीन सरकार सत्तारूढ झाले. विविध पक्षांच्या एकत्रीकरणातून जनता पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. जनसंघाच्या विलीनीकरणाचा निर्णय घेताना अटलजी भावुक झाले, रडलेसुद्धा. अटलजी परराष्ट्र मंत्री झाले, त्यांनी संयुक्त राष्ट्रात हिंदीमध्ये भाषण करून इतिहास घडवला. अटलजी हिंदीत अतिशय चांगले भाषण करत. त्यांचे हिंदीतील भाषण ऐकून पंडित जवाहरलाल नेहरूही प्रभावित होत. हिंदीतही इतके चांगले भाषण करता येते, हे मला आजच समजले, असे अटलजींचे भाषण ऐकून पंडित नेहरू एकदा म्हणाले होते. एकदा संसदेत पंडित नेहरू आणि अटलजी यांच्यात कोणत्या तरी मुद्यावरून वाद झाला. सायंकाळी राष्ट्रपतिभवनात एक कार्यक्रम होता. तिथे नेहरूही आले होते. नेहरूंना पाहून अटलजी थोडे दूर झाले, पण नेहरूंनी त्यांना बोलावून, दुपारी काही झाले नाही, असे दाखवत त्यांच्याशी गप्पा मारल्या. राजकारणात उज्ज्वल भविष्य असलेला नेता, असे नेहरूंनी अटलजींचे वर्णन केले होते. यावरून नेहरूंनी अटलजींना भविष्यातील पंतप्रधान म्हटल्याची चर्चा सुरू झाली. पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांच्या शोकसभेत अटलजींनी केलेले भाषण अप्रतिम होते.
बांगलादेशच्या निर्मितीनंतर अटलजींनी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अटलजींच्या भाषणानंतर काँग्रेसच्या एका नेत्याने इंदिरा गांधी यांची प्रशंसा करताना ‘या देवी सर्व भूतेषु…’ असा श्‍लोक म्हटला. त्यामुळे अटलजींनी आपल्या भाषणात श्रीमती इंदिरा गांधींना दुर्गादेवी म्हटल्याची चर्चा सुरू झाली. अटलजींनी कधीही इंदिरा गांधींना दुर्गादेवी म्हटले नाही. पण, त्यांनी अशा चर्चेचा कधी इन्कारही केला नाही. कोणत्याही अनावश्यक वादात पडणे त्यांना आवडत नव्हते.
पक्षाच्या व्यासपीठावर आपली भूमिका अटलजी दृढतेने मांडत असत. मात्र, एकदा पक्षाने निर्णय घेतला की ते त्या निर्णयासोबत राहात. पक्षाने आपले सर्व ऐकलेच पाहिजे, असा त्यांचा अनाठायी आग्रह राहात नव्हता. रामजन्मभूमीच्या काळात लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात रथयात्रा काढण्याचा निर्णय पक्षाने घेतला. रथयात्रा काढण्याचा निर्णय अटलजींना मान्य नव्हता, पण एकदा पक्षाने ठरवल्यामुळे ते त्या निर्णयासोबत राहिले, अडवाणींच्या रथयात्रेला त्यांनी हिरवी झेंडी दाखवली. अडवाणींची रथयात्रा, बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवली आणि अडवाणी यांना अटक केली. अडवाणींच्या अटकेमुळे अटलजी संतप्त झाले, त्यांनी केंद्रातील व्ही. पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला.
१९८४ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला दोन जागा मिळाल्या. अटलजीही ग्वाल्हेर येथून हरले. त्यानंतर दिल्लीतील त्यांच्या ६ रायसीना रोडवरील निवासस्थानी पत्रकार अटलजींना भेटायला आले. त्यांना भाजपाच्या भविष्याबद्दल विचारणा केली. त्यावर भाजपाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे उत्तर अटलजींनी अतिशय आत्मविश्‍वासाने दिले. त्यावर सर्व जण हसले. मात्र, दूरदृष्टीच्या अटलजींची भविष्यवाणी खरी झाली. नंतर १९९६ मध्ये १३ दिवसांचे, १९९८ मध्ये १३ महिन्यांचे, असा प्रवास करत १९९९ मध्ये पाच वर्षांचे सरकार भाजपाने पूर्ण बहुमताने बनवले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार असल्याचा अंदाज अटलजींना आला होता. त्यांनी तसे माझ्याजवळ बोलूनही दाखवले होते.
२००७ मध्ये भैरोसिंह शेखावत यांना उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाने विरोधी पक्षांच्या पाठिंब्याने उभे केले. शेखावत विजयीही झाले. २००९ पासून अटलजींचा राजकारणातील पुढाकार कमी झाला. २००९ मध्ये ते बाथरूममध्ये पडले. त्यांच्या डोक्याला मार लागला. एम्समध्ये ऑपरेशन करण्यात आले. त्या वेळी २२ दिवस अटलजी व्हेंटिलेटरवर होते. गळ्याला छिद्र करून आत नळी टाकण्यात आल्यामुळे त्यांच्या आवाजावर परिणाम झाला. ते बोलायचे, पण ते समजत नसे. त्यामुळे त्यांनी बोलणे कमी केले. आधी दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाल्यामुळे त्यांच्या चालण्यावरही परिणाम झाला. त्यांचे चालणे-बोलणे-फिरणे कमी झाले. सार्वजनिक जीवनातील त्यांचा वावर कमी झाला. आपल्या निवासस्थानी जुने चित्रपट, मराठी नाटक आणि जुनी गाणी ऐकत अटलजी वेळ घालवत होते. पुढे तर त्यांच्या डोळ्यांतील भावावरून तसेच चेहर्‍यावरील हावभावावरून त्यांना काय म्हणायचे, याचा अंदाज आम्ही बांधत होतो. भीष्म पितामहासारखी अटलजींची स्थिती झाली होती. त्यांना अशा अवस्थेत पाहून आमच्या मनाला अतिशय वेदना होत होत्या.
अटलजींनी आपले प्राण रोखून धरले होते. स्वातंत्र्यदिनी आपल्या मृत्यूमुळे राष्ट्रध्वज अर्ध्यावर झुकवणे त्यांना मान्य नव्हते. १५ ऑगस्टला देशाचा राष्ट्रध्वज डौलात फडकत राहावा म्हणून त्यांनी मृत्यूलाही थोपवले होते. १६ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. जगेल तर देशासाठी तसेच मरेल तेही देशासाठीच, असा त्यांच्या आयुष्याचा निर्धार होता. आयुष्यभर देशासाठी झटणार्‍या अटलजींनी मरतानाही देशाचाच विचार केला होता… अटलजींच्या आठवणी सांगताना शिवकुमार यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. आता आपल्याला उर्वरित आयुष्य अटलजींशिवाय काढावे लागणार, याच्या वेदना त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत होत्या.

Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, श्यामकांत जहागीरदार, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, श्यामकांत जहागीरदार, स्तंभलेखक (409 of 1224 articles)

Kerala Flood
विशेष : विनय अशोकन् | सरकारचे पूर्ण लक्ष केवळ मदतनिधी उभारण्याकडेच असल्यामुळे, महापुरानंतरच्या मदत, पुनर्वसन, पुनर्बांधणी या महत्त्वाच्या कार्यांकडे दुर्लक्ष ...

×