ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:

अटलजी: अनंत, अथांग

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी |

त्याच्याबद्दल लोकांकडून अगदी उत्स्फूर्तपणे ‘महापुरुष’ या शब्दाचा हुंकार निघतो. त्या प्रत्येक वेळी महापुरुष या सर्वनामाचे विशेषनामात रुपांतर होत असते. अटलजींना हे वर्णन शब्दश:च नव्हे तर तंतोतंत लागू पडते. लौकिकार्थाने अटलजी भारताचे माजी पंतप्रधान होते, भारतीय जनसंघाचे शीर्षस्थ नेते होते. जनता पार्टीचे संस्थापक नेते होते. भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष होते. कठोर निर्णय घेणारे प्रशासक होते. अमोघ वक्ते होते. थोर मुत्सद्दी होते. आघाडीचे संसदपटु होते. त्यांची लोकप्रियता तर अफाटच होती आणि त्यांना आणखी काही विशेषणेच लावायची झाली तर त्याला कदाचित मर्यादाही राहणार नाही. पण इतके सगळे होऊनही ते दशांगुळे उरतातच. कारण ते अटलजी होते. त्यांच्यासम ते.

या जगात एका माणसासारखा दुसरा माणूस असू शकत नाही. म्हणूनच त्यांची तुलना करायची नसते. मग त्याला महापुरुष कसे अपवाद असतील? जसे माणूस हे सर्वनाम आहे तसेच महापुरुष हेही सर्वनामच आहे. माणसांच्या मृत्युनंतर आपण त्यांना महापुरुषांच्या रांगेत बसविण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा त्यांच्यात तुलना करण्याचा मोहही आपल्याला होतो. पण प्रत्येक महापुरुष त्याच्यासारखा तोच असतो. त्यांच्यात काही बाबतीत साम्य असूही शकते पण त्यांच्यावरचे संस्कार, त्यांची तपश्‍चर्या याबरोबरच त्यात योगायोगाचा भागही असतो. कुणी ठरवून महापुरुष बनत नाही आणि लोक कुणालाही त्याच्या विचाराच्या, धर्माच्या, देशाच्या, जातीच्या, शिक्षणाच्या वा अन्य कोणत्याही आधारावर महापुरुष बनवत नाहीत. त्याच्याबद्दल लोकांकडून अगदी उत्स्फूर्तपणे ‘महापुरुष’ या शब्दाचा हुंकार निघतो. त्या प्रत्येक वेळी महापुरुष या सर्वनामाचे विशेषनामात रुपांतर होत असते. अटलजींना हे वर्णन शब्दश:च नव्हे तर तंतोतंत लागू पडते. लौकिकार्थाने अटलजी भारताचे माजी पंतप्रधान होते, भारतीय जनसंघाचे शीर्षस्थ नेते होते. जनता पार्टीचे संस्थापक नेते होते. भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष होते. कठोर निर्णय घेणारे प्रशासक होते. अमोघ वक्ते होते. थोर मुत्सद्दी होते. आघाडीचे संसदपटु होते. त्यांची लोकप्रियता तर अफाटच होती आणि त्यांना आणखी काही विशेषणेच लावायची झाली तर त्याला कदाचित मर्यादाही राहणार नाही. पण इतके सगळे होऊनही ते दशांगुळे उरतातच. कारण ते अटलजी होते. त्यांच्यासम ते.
खरेतर गेल्या सुमारे बारा वर्षांपासून प्रकृति अस्वास्थ्यामुळे ते लोकजीवनापासून अलिप्तच होते. या बारा वर्षांपैकी काही वर्षांपासूनच्या काळात देशात घडलेल्या घटनांमध्ये ते कोणतेही योगदान देऊ शकले नाहीत. कदाचित नरेंद्र मोदी २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले, एनडीएने एवढे प्रचंड बहुमत मिळविले हे त्यांच्यापर्यंत पोचूही शकले नसेल. काळ कुणासाठी थांबत नाही हे त्यांनाही ठाऊक होते. त्यामुळे त्यांना त्याची खंतही नसावी. पण महापुरुषांचे निव्वळ अस्तित्वही अभावितपणे घटनांना आकार देत असते. ते त्यांनाही ठाऊक होत नाही. गेल्या काही वर्षांपासून तर अटलजींची प्रकृती खूपच खालावली होती. अगदी आपले अंत:करण व्याकुळ होईपर्यंत प्रकृतीने मर्यादा गाठली होती. ना कुणाशी बोलणे, ना कुणाला ओळखणे अशी त्यांची अवस्था झाली होती. पण गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी त्यांनी अनंताच्या दिशेने महाप्रयाण केले आणि क्षणात संपूर्ण देश अटलजीमय होऊन गेला. प्रत्येकाच्या अंत:करणात अटलजी दिसू लागले, पूर्वीसारखेच उर्जापूर्ण अटलजी. त्यांचे विराट रुप प्रत्येकासमोर आले. त्यांनी प्रत्येकाशी भूतकाळातील हजारो घटनांच्या माध्यमातून मूक संवाद सुरु केला आणि आश्‍चर्य असे की, त्यांच्या अमोघ वाणीपेक्षाही तो अस्खलित होता, बुलंद होता, विचार प्रवर्तक होता, प्रेरणादायी होता, ‘मूकं करोति वाचालम’चा प्रत्यय आणून देणारा होता. क्षणार्धात त्या धीरगंभीर वाणीने अवघे विश्‍व व्यापून टाकले. तरीही दशांगुळे उरले ते अटलजीच.
मृत्युसमयी त्यांचे वय ९३ वर्षे होते. पण त्यांची उंचपुरी आणि धट्टीकट्टी शरीरयष्टी, गेल्या उण्यापुर्‍या ६५ वर्षात त्यांनी केलेली धावपळ, देशविदेशांचा केलेला प्रवास, देशबंधुंच्या कल्याणासाठी काया, वाचा, मने केलेले अखंड परीश्रम पाहता ते शंभर वर्षे जगले असे सहज म्हणता येईल. पण अटलजींसारख्या महापुरुषांना मृत्यु कधीच शिवू शकत नाही. कारण ते त्यांच्या कृतीने केव्हाच अमर झालेले असतात. अटलजींनी आपल्या संघर्षपूर्ण जीवनातून असे अमरत्व प्राप्त केले आहे. आज आपण त्यांच्या मृतदेहावर फुले अर्पण करीत आहोत, शासकीय इतमामाने त्यांचा अन्त्यसंस्कार करीत आहोत. उद्या त्यांचे स्मारकही उभे राहील. पण ह्या सगळ्या औपचारिकता आहेत. त्या आवश्यकही आहेत. कारण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न म्हणून आपण तेवढेच करु शकतो. पण अटलजी त्या औपचारिकतांच्याही पलीकडे गेले आहेत. कारण ते अटलजी आहेत.
गेल्या जून महिन्यापासून अटलजींवर एम्समध्ये उपचार सुरु होते. ते त्या उपचारांना प्रतिसादही देत होते. म्हणून तर ते मृत्युला तीन महिनेपर्यंत पिटाळत राहिले. त्यांच्या प्रकृतिविषयी सर्वांच्याच मनात चिंता डोकावत असणार. त्या दिव्यातूनही ते सुखरुप बाहेर येतील अशी सर्वांनाच आशा असणार. मध्यंतरी त्यांची प्रकृति खालावली असतांना थोडी चर्चा झाली. काही महाभागांनी विवाद निर्माण करण्याची हौसही भागवून घेतली. पण अटलजी मात्र निश्‍चल होते. पण स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: एम्समध्ये त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले तेव्हापासूनच शंकेची पाल चुकचुकायला लागली होती. मात्र नियतीला जे घडवायचे असते ते कुणीही टाळू शकत नाही. एम्समधल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या ज्ञानाला आणि अनुभवाला शेवटी मर्यादा होत्याच. पण त्या पार करुन अटलजी सर्वांसमक्ष कसे निघून गेले हे गुरुवारी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांपर्यंत कुणाला कळलेच नाही. त्यांनीच म्हटले आहेना की, मृत्युचे वय ते किती? काही क्षणांचे. त्यानंतर उरते ते अमरत्व. अटलजी त्या अमरत्वाचे धनी बनले आहेत.
बुधवारच्या सायंकाळपासून व विशेषत: गुरुवारच्या सकाळपासून सर्व वृत्तवाहिन्यांवरुन, श्राव्य माध्यमांवरुन, गावोगावी आणि शहरोशहरी, देशात आणि विदेशात एकच आणि फक्त एकच विषय चर्चिला जात होता. अटलजी आणि अटलजीच. तिकडे केरळामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजला होता. जीव आणि मालमत्तेचा विध्वंस होत होता. माणसे वाहून जात होती. पावसाने तर वेगाची हद्दच गाठली होती. तिथे मदतकार्यही सुरु होते. पण वाहिन्यांवर प्राधान्याने विषय चर्चिला जात होता तो अटलजींचाच. क्षणाक्षणांची माहिती दिली जात होती. अटलजींच्या आठवणी जागविल्या जात होत्या. त्यांच्या अजरामर कवितांचे, शब्दकळांनी नटलेल्या संसदेतील आणि संसदेबाहेरील, संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरील भाषणांचे सादरीकरण होत होते. अव्याहत झालेल्या या गौरवाचे धनी होते अटलजी.
सामान्य माणूसही आपल्या अध्ययनाच्या, चिंतनाच्या, प्रतिभेच्या आणि परीश्रमांच्या बळावर छोट्याशा आयुष्यात किती उंची गाठू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटलजी. ग्वाल्हेरमधील एका गरीब कुटुंबात जन्मलेला अटलबिहारी नामकरण झालेला मुलगा शालेय जीवनातच आपल्या प्रतिभेचे दर्शन काय घडवितो, १९४२ च्या चलेजाव आंदोलनात काय सहभागी होतो, काही काळ कां होईना साम्यवादी विचारांच्या प्रेमात काय पडतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांमुळे प्रचारक या नात्याने अल्पकाळ कां होईना पत्रकारिता काय करतो, संघाच्याच निर्देशानुसार राजकारणात काय प्रवेश करतो, पाहता पाहता संसदेत काय प्रवेश करतो, आपल्या अमोघ वक्तृत्वाने पं. नेहरुंसारख्यांचे लक्ष काय वेधतो, विरोधी पक्षनेता काय बनतो, प्रधानमंत्रिपदाची शपथ काय घेतो, भारताच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी काय करतो, अटलजींच्या कर्तृत्वाचे पोवाडे गावेत तरी किती? पण अटलजींनी मात्र या सर्व रंगांमध्ये मन:पूर्वक रंगूनही आपला सर्वांपेक्षा वेगळा रंग मात्र अखेरपर्यंत कायम ठेवला. आज एकाही राजकीय पक्षाचा, समाजातील सार्वजनिक संस्थांचा एकही नेता असा नसेल जो अटलजींचे गुणगान करीत नसेल. त्यात कसल्याही प्रकारची राजकीय वा वैचारिक अपरिहार्यता नाही. सगळे कसे अटलजींना मनापासून श्रध्दांजली देत आहेत. कारण अटलजी हे अटलजी आहेत.
शेवटी प्रश्‍न येतो अटलजींसारख्या महापुरुषांची जडणघडण होते कशी? त्याचे श्रेय मातापित्यांच्या, गुरुजनांच्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांना जरुर देता येईल. सार्वजनिक जीवनात त्यांनी खालेल्या टक्क्याटोणप्यांकडेही त्याचे श्रेय जाऊ शकेल. पण मूलत: असे महापुरुष ‘स्वयेची घडत गेला’ या पध्दतीनेच घडत असतात. आयुष्यातील कसोटीच्या प्रत्येक क्षणी या जडणघडणीची शिदोरी त्यांना उपयोगी पडत असेलही पण असे महापुरुष क्षणोक्षणी आपल्या सदसदविवेक बुध्दीच्या आधारावरच पुढे जात असतात. निर्वाणीच्या कोणत्याही क्षणी त्यांच्याजवळ मातापिता वा गुरुजन वा मार्गदर्शक नसतात. प्रत्येक क्षणी काय बोलायचे, कसे बोलायचे, कसे वागायचे याबाबतचे निर्णय त्यांना आणि तेथेच घ्यावे लागतात. अटलजींचे महापुरुषत्वही याच प्रक्रियेतून घडले आहे असे म्हणावे लागेल.
अटलजींच्या सार्वजनिक जीवनाचे विश्‍लेषण करण्याची ही वेळ नाही. त्यासाठी हे स्थानही नाही. गेल्या काही दिवसात संपूर्ण देशाने आपल्या कृतीतून, अटलजींविषयीच्या अटल श्रध्देतून ते प्रकट केले आहे. पण आपल्याला तेवढ्यावरच थांबता येणार नाही. अटलजींनाही ते आवडणार नाही. त्यांच्या संकल्पनेतील भारत लवकरात लवकर निर्माण करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरणार आहे. त्यांनीच सांगून ठेवले आहे ना
सत्ताका खेल तो चलेगा,
सरकारे आयेगी जायेगी,
पार्टीया बनेगी बिगडेगी
मगर ये देश रहना चाहिये
इस देशका लोकतंत्र अमर रहना चाहिये।

https://tarunbharat.org/?p=60126
Posted by : | on : 19 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक (257 of 1152 articles)

Atal Bihari Vajpayee Rss
आदरांजली : मदनदास देवी | स्वयंसेवकत्व हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आधार अटलबिहारी वाजपेयींनी अबाधित राखला आहे. ‘राजनीति की रपटिली राहे’ या ...

×