ads
ads
प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

►महिला पत्रकार बसू यांची साक्ष, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर…

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

►सीबीआय विरुद्ध सीबीआय, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रीय…

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रात मंत्री असलेले राष्ट्रीय…

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

►अमेरिकेची भूमिका, वॉशिंग्टन, १२ नोव्हेंबर – बांगलादेशातून म्यानमारला रोहिंग्यांचे…

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

लंडन, १० नोव्हेंबर – घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल…

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

►भारत, पाक व तालिबान एकाच मंचावर, मॉस्को, ९ नोव्हेंबर…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

►ऊर्जामंत्री बावनकुळे यांची ग्वाही, नागपूर, ११ नोव्हेंबर – राज्यात…

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

►हत्तीसारखे डौलाने चाला, टीकेची पर्वा करू नका ►नितीन गडकरी…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:

‘अटल’वाणी…

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

Atalbihari7

Atalbihari7

भारतीय राजकारणातील ‘भीष्मपितामह’ म्हणून ज्यांचं वर्णन करता येईल असे ‘अजातशत्रू’ नेते म्हणजे ‘भारतरत्न’ कै. अटलबिहारी वाजपेयी! स्वभावातला सुसंस्कृतपणा, नम्रता, भाषेचे सखोल ज्ञान आणि कविमन, यांचा अप्रतिम मिलाफ म्हणजे अटलजींची भाषणे! वक्तृत्व असे असावे की, आपले समर्थकच नव्हेत, तर आपले विरोधकसुद्धा हरखून जातील याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटलजी! ते संसदेत बोलायचे तेव्हा भूतपूर्व पंतप्रधान स्व. नेहरूदेखील त्यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकत असत! इतकी विलक्षण वक्तृत्वप्रतिभा कशी निर्माण होते, याचं उत्तर देताना अटलजी एकदा म्हणाले होते, ‘‘हा आमचा परंपरागत गुण आहे. माझे वडील उतम भाषणे करीत असत. मात्र, ते नेते नसल्याने त्यांच्या या गुणाचे कौतुक झाले नाही!
आपली भाषणे तयार होण्याची प्रक्रिया काय, हे सांगताना अटलजी म्हणतात-
‘‘मेरे भाषणों में मेरा लेखक मन बोलता हैं, लेकिन राजनेता भी चूप नही रहता। राजनेता लेखक के समक्ष अपने विचार रखता हैं और लेखक पुनः उन विचारों को पैनी अभिव्यक्ति देने का प्रयास करता हैं। मैं तो मानता हूँ कि, मेरे राजनेता और मेरे लेखक का परस्परसमन्वय ही मेरे भाषण में दिखाई देता हैं। मेरा लेखक राजनेता को मर्यादा का उल्लंघन नही करने देता।’’ लेखक आणि नेता या दोन्ही भूमिकांतील द्वंद्व इतक्या तरल शब्दांत अन्य कोण बरे कथन करू शकेल?
संसदेत बडे-बडे नेते इंग्रजीतून भाषणे देत, तेव्हा अटलजी मात्र हिंदीतूनच त्यांचे विचार मांडत. संसदच कशाला? संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेतदेखील त्यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री या नात्याने भाषण केले तेदेखील हिंदीमधूनच. अशा परिषदेत हिंदीतून भाषण देणारे ते पहिले भारतीय मंत्री! या भाषणात संयुक्त राष्ट्रसंघाला त्यांनी मानवतेच्या दृष्टीने भारत कायमच आघाडीवर असेल, असे सांगितले होते. या भाषणात कोमल मानवतावादी दृष्टिकोन मांडणार्‍या वाजपेयीजींनीच पुढे एका अशाच भाषणात मात्र, आम्ही सर्व जगाला अणुबॉम्ब मुक्त व्हा अशी विनंती करत होतो; मात्र आमच्या या विनंतीकडे कोणीही गांभीर्याने पाहिलं नाही. सारं जग अणुशस्त्रांनी युक्त असताना भारतालादेखील स्वसंरक्षणार्थ अणुचाचणी करणे भाग होते. यात आम्ही काहीही गैर केलेले नाही.’’ अशा शब्दांत कणखरपणे आपल्या देशाची बाजू मांडली.
प्रसन्न स्वभाव असलेल्या अटलजींच्या भाषणांतदेखील ही प्रसन्नता उठून दिसे. क्वचित काहीवेळा मिस्कीलपणे बोलणार्‍या या वक्त्याने, विनोद करताना वा इतरांवर टीका करतानादेखील कधीही आपली पातळी सोडली नाही, हे विशेष! एखादा राजकीय टोमणा मारतानाही त्यांच्या चेहर्‍यावरील हास्य हे निरागस असे. त्यात कधी द्वेष दिसून आला नाही, हे त्यांचे वेगळेपण आणि त्यांच्या मनाचे मोठेपणदेखील! फार क्वचितप्रसंगी त्यांचा संताप भाषणातून व्यक्त होत असे. यातील दोन गाजलेली भाषणे म्हणजे पापस्तानला त्यांनी दिलेले उत्तर आणि संसदेत बहुमत मिळवण्यास केवळ एका सदस्याच्या कमतरतेने अपयश आल्यावर त्यांनी केलेले भाषण. ‘‘आप दोस्त बदल सकते हैं; लेकीन पडोसी नहीं बदल सकते!’’ इतक्या सहज शब्दांत वाजपेयींनी पापस्तानला त्याच्याच भूमीवरून सत्यस्थितीची जाणीव करून दिली होती. अविश्‍वास प्रस्ताव हरल्यावर त्यांनी संसदेत केलेले भाषण तर नैतिकता या गुणाचा परिपाठच होता, असे म्हणायला हरकत नसावी. विरोधी पक्षाचे ससंदर्भ वाभाडे काढत, सात्त्विक संताप व्यक्त करतानाच दुसरीकडे हे भाषण संपवताच, ‘‘मी माझा राजीनामा मा. राष्ट्रपती महोदयांना सुपूर्द करायला चाललो आहे,’’ असे वाजपेयीजींनी ज्या सहजतेने सांगितले तिला पाहता, त्यांच्या विरोधकांनाही क्षणभर धक्का बसला असेल.
संघाचे स्वयंसेवक राहिलेले अटलजी, कोणताही भपकेबाजपणा न करता अतिशय साधेपणाने आणि सहजतेने सभांमधून वावरत, हा त्यांचा मोठेपणा. देशप्रेम ही भावना त्यांच्या दृष्टीने सर्वोपरी होती. ते म्हणतात-
‘‘भारत ज़मीन का टुकङा नही हैं, जीता-जागता राष्ट्रपुरुष हैं। हिमालय इसका मस्तक हैं, गौरीशंकर शिखा हैं। कश्मीर किरिट है, पंजाब और बंगाल दो विशाल कँधे हैं। विन्ध्याचल कटि हैं, नर्मदा करधनी हैं। पूर्वी और पश्‍चिमी घाट दो विशाल जँघाए हैं। कन्याकुमारी उसके चरण हैं, सागर उसके चरण पखारता हैं। पावस के काले-काले मेघ इसके कुंतल केश हैं। चाँद और सूरज इसकी आरती उतारते हैं। यह वंदन की भूमि हैं, यह अर्पण की भूमि हैं, अभिनन्दन की भूमि हैं। यह तर्पण की भूमि हैं। इसका कँकर-कँकर शंकर हैं, इसका बिंदु-बिंदु गंगाजल हैं। हम जियेगें तो इसके लिये और मरेंगे तो इसके लिये।’’
या देशाच्या स्वातंत्र्यसाठी ज्यांनी रक्त सांडले अशा वीरांप्रतीचा आदरदेखील त्यांच्या भाषणांत वेळोवेळी पाहायला मिळतो. स्वा. सावरकरांवर त्यांनी केलेले भाषण, हे या बाबतीतले मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. या भाषणात ते म्हणतात-
‘‘हम कण हैं तो सावरकर पर्बत हैं। हम लोग तो एक बिंदु हैं, सावरकर तो सिन्धु हैं। मगर कण में भी बिंदु में भी वही क्षमता हैं। हम सावरकरजी को समझने का प्रयत्न करें। उनकी विचारधारा का विश्‍लेषण करें। सावरकरजी के चिन्तन के बारे में अनुसन्धान करें और सावरकर के सन्देश को घर-घर तक व्यक्ति-व्यक्ति तक पहुचाने का प्रयास करें।’’
‘वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि’ हे सूत्र अटलजींच्या वक्तृत्वाला तंतोतंत लागू पडते. शांत- संयमित मात्र आवश्यक तेथे वेळप्रसंगी कठोर होणारी वक्तृत्वाची देणगी ही अतिशय दुर्मिळ असते. गेल्या सुमारे एक तपाहूनही अधिक काळ ही अटलवाणी जणू मूकच होती आणि आता तर तिने पूर्णविरामच घेतला आहे. मात्र, मनमोहक पण संयत वक्तृत्वशैली लाभलेल्या राजकीय वक्त्यांच्या जागतिक यादीत कै. अटलबिहारी वाजपेयी हे नाव कायम वरच्या क्रमांकावर असेल!

Posted by : | on : 26 Aug 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (225 of 1134 articles)

India Bangladesh
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | बांगलादेशी पकडून त्यांच्यावर कारवाई होणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्या बरोबरच त्यांच्या समर्थकांनवर कारवाई ...

×