रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २५ जुलै – रामनाथ कोविंद…

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

नवी दिल्ली, २५ जुलै – मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच आम्हाला समान…

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

नवी दिल्ली, २५ जुलै – वैश्‍विक किरणांच्या अभ्यासात महत्त्वाची…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:00
अयनांश:
Home » आसमंत, शिरीष देशपांडे » अल्बर्ट आईन्स्टाईन

अल्बर्ट आईन्स्टाईन

•अंतराळाच्या अंतरंगातून : शिरीष देशपांडे

albert-einstein-hd१९१६ मध्ये आईन्स्टाईन म्हणाला होता की, गुरुत्वीय लहरी (ग्रॅव्हिटेशनल वेव्हज्) असतात. शंभर वर्षांनी २०१६ मध्ये, क्षीण का असेना, त्या आढळल्या. त्याचे सिद्धान्त असे केव्हाच-कून सिद्ध होत राहातात! १९०५ साली आईन्स्टाईनचे सापेक्षतावादाचे गणित अनंतावरती (इन्फिनिटीवर) चुकत होते. (केवढा आनंद झाला असेल, जगातल्या गणितज्ञांना; की, ‘पाहा. आईन्स्टाईनचे सुद्धा गणित चुकते!’) वर्षभर तो काहीच बोलला नाही. मग त्याने म्हटले की, ‘माझे गणित जर अनंतावर चुकत असेल तर अनंतच अस्तित्वात नाही !’ नसो. ‘गुरुत्वीय लहरी खूप क्षीण असतात तर गुरुत्वाकर्षण एवढे प्रबळ कसे?’ या माझ्या प्रश्‍नाचे उत्तर अजून मिळालेले नाही. मी वाट पाहातोय् की, तो म्हणेल, ‘ज्याअर्थी लहरी क्षीण आहेत त्याअर्थी गुरुत्वाकर्षणही क्षीणच मानावे!!’
माझ्या घरात मनुष्यांची दोनच चित्रे आहेत. एक २ डायमेंशनल आहे. एक ३ डायमेंशनल आहे. पुतळा शिवाजी महाराजांचा असून फोटो आईन्स्टाईनचा आहे. दोघांत एक समान गुणधर्म आहे; तो म्हणजे पराकोटीची बुद्धिमत्ता!! आईन्स्टाईनच्या फोटोवर लिहिले आहे, ‘प्रतिभा ही प्रज्ञेहून महत्त्वाची मानावी.’
–मात्र; दोन्हीही आपल्या हाती नसतात, असा भ्रम सर्वत्र पसरवण्यात आला आहे. ज्ञान मिळवायला उशीर लागू शकतो. ज्ञानाचा हटके उपयोग करायला, म्हणजे प्रतिभेसाठी, आणखी उशीर लागू शकतो. तथापि, नॉलेज आणि इमॅजिनेशन हे कोणाच्याही आवाक्याबाहेर असू शकत नाही. शिवाजी महाराज आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांजएवढी विलक्षण ‘प्रतिभा’ कोणापाशी मुळात नसेल; पण, त्यांस/तीस कमावता येणे शक्य आहे.
आईन्स्टाईनपासून विज्ञानयुगाचा प्रारंभ झाला म्हणतात. पण तो वैज्ञानिक नव्हता. तो शास्त्रज्ञही नव्हता. ‘बीएस्सी पार्ट वन’ला नापास झाल्यावर त्याने, कॉलेज सोडून देऊन, पेटंट ऑफिसात कारकुनाची नोकरी धरली. किंबहुना, विज्ञानयुगाचा प्रारंभ, बर्लिन युनिव्हर्सिटीत भौतिकशास्त्राचा ‘प्रोफेसर’ व विभागप्रमुख असलेल्या, ‘मॅक्स प्लँक’मुळे (१४ डिसेंबर १९००ला), झाला आहे. विज्ञान हे वस्तुनिष्ठ असते, असा तोवर समज होता. प्लँकने दाखवून दिले की, मनुष्य हा निरीक्षक (ऑब्झर्वर) नसून सहभागी (पार्टिसिपेटर) असतो. पारंपरिक विज्ञानाची इमारत कोसळली. आधुनिक विज्ञानाचा पाया घातला गेला. पुष्कळसे विज्ञानविद अजूनही विज्ञान वस्तुनिष्ठ असते, असेच समजत असतात. मग, अवैज्ञानिकांना तरी आपण दोष का द्यावा?
-आईन्स्टाईनच्या स्तोत्रांत प्लँकची ऋचा भरण्याचे कारण अबलख आहे. या प्लँकने आईन्स्टाईनला म्हटले, ‘‘तू पेटंटच्या ऑफिसात कारकुनी कशास करतोस? माझ्या युनिव्हर्सिटीत ‘प्रोफेसर’ बनून ये !!’’
‘मी?’आईन्स्टाईन खदखदून हासत म्हणाला, ‘डॉक्टरेट तर सोड; मी साधा इंटरसायन्ससुद्धा पास नाही!’
गंभीरपणे प्लँकने आईन्स्टाईनकडे पाहिले.
मग तो म्हणाला, ‘मी तुझी थट्टा करतोय्, असं तुला वाटलं तरी कसं!?’
‘तू समजा मला तिथं नेलं; प्रोफेसर केलं; तरी मी शिकवणार काय? जे शिकवायचं ते मला निदान आलं तरी पाहिजे की नाही? मला साधं ग्रॅज्युएटचं देखील फिजिक्स येत नाही!’
‘शिकवू नकोस. नुसतं संशोधन कर!’
अल्बर्ट आईन्स्टाईन बर्लिन युनिव्हर्सिटीत फिजिक्सचा थेट प्रोफेसर झाला!!
जगात देव असला पाहिजे. कारण, आईन्स्टाईनच्या आधी मॅक्स प्लँक याला नोबेल पारितोषिक मिळाले. पण, देव नसावाही. सत्येंद्रनाथ बोसांना कुठे मिळाले नोबेल? प्लँकचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून, आईन्स्टाईनने सत्येन्द्रनाथ बोस यांच्या गणिताचा सिद्धांत उचलून धरला. बोसांना तो म्हणाला, ‘सगळे तुमचेच आहे. छान आहे. मग माझे नाव कशाला हवे?’
तर बोस म्हणाले, ‘मला ओळखतो कोण? माझे संशोधन तसेच पडून राहील. उलटपक्षी, तुमचे नाव जोडले गेले तर सर्व या संशोधनाकडे गंभीरपणे पाहातील.’
झाले तसेच. पण, मग आईन्स्टाईनने सर्व जगाला सांगितले की, ‘हा बोस- आईन्स्टाईन नावाने ओळखला जाणारा सर्वच्या सर्व सिद्धांत सत्येंद्रनाथ बोस यांचाच आहे.’ मग त्या सिद्धांतावरून शोधलेल्या विश्‍वोत्पत्तीच्या आदिम परमाण्विक कणाला पॉल डिरेकने ‘बोसॉन’ असे नाव दिले.
प्रकाश सरळ रेषेत जातो, असे आपण शाळेत शिकलो. चूक नाही. पण, प्रकाशाच्या ‘वाकडेपणाचा’ (तरंग) सिद्धांतही आपण मानला. पुढे दोन्हींचे एकत्रीकरण झाले. आपण समाधानी झालो. तरीही हे आपल्याला शाळेत शिकवलेच नाही की, ‘प्रकाशाचा कण असतो!’ म्हणजे जिला आपण ऊर्जा समजत होतो ती पदार्थ ठरविली आईन्स्टाईनने! ‘पदार्थ म्हणजे बांधून ठेवलेली ऊर्जाच असते’,  म्हणाला तो! किती? तर पदार्थाच्या वस्तुमानाला प्रकाशाच्या वेगाने दोन वेळा गुणायचे! ( ई=एम्.सी’वर्ग)
प्रकाशाच्या कणाचे वजन ‘नहीं के बराबर’ असते. म्हणून आपल्याला उजेडाचा फार त्रास होत नाही. पण, कोणी विशिष्ट युरेनियमचे विशिष्ट वस्तुमान नष्ट केले तर? ओपिनहायमर याने आईन्स्टाईन हयात असताना हा प्रयोग केला. सहस्रावधी सूर्यांचा उदय झाल्याप्रमाणे ऊर्जा निष्पन्न झाली. ‘दिवि सूर्य सहस्रस्य’ असा भगवद्गीतेतला श्‍लोकच त्याच्या मुखी आली. आईन्स्टाईनला हे माहीत सुद्धा नसेल की, नंतर, आपला सिद्धांत हिरोशिमा-नागासाकीत सिद्ध केला जाणार आहे!! जगात केवळ ऊर्जाच असते. ती मुक्त असेल तेव्हा आपण तिला शक्ती म्हणतो. बांधून असेल तेव्हा तिला पदार्थ म्हणतो. पण, या सिद्धांताबद्दल आईन्स्टाईनला नोबेल पारितोषिक मिळाले नाही. ना सापेक्षतावादासाठी मिळाले.
त्याने दाखवले की विश्‍व अमर्याद असले तरी ते सान्तच आहे! जसे फुटबॉलवर मुंगी फिरतच राहील. कारण, फुटबॉलला सरहद्द असत नाही. तसेच विश्‍वाचे आहे. इथून बाहेर पडताच येणार नाही. पण, त्याचे मोजमाप करता येते. दोन डायमेन्शनचे पृष्ठ तिसर्‍यात वळवून फुटबॉल होतो; तसेच आपले ३ डायमेन्शनचे विश्‍व ४ थ्यात वळवून वाकवलेले आहे. (४ थ्या डायमेन्शनवर मात करून जेव्हा कोणी ५ व्या डायमेंशनमध्ये जाईल तेव्हा काय होईल?)
संपूर्ण सापेक्षतावाद सिद्ध होत नव्हता. गुरुत्वाकर्षणामुळे सगळे ठोकताळेच बदलून जात होते. ते गणित त्याने उलगडून दाखवले तेव्हा सापेक्षतावाद खरा सिद्ध झाला. तरीही अजून, चारही प्रक्रियांना एकसूत्रात बांधू शकणारी, ‘युनिफाईड थिअरी’ निर्माण करणे कुणालाच साधलेले नाही. ज्याला ते साधता येईल, अशा दुसर्‍या आईन्स्टाईनची जग वाट पाहात आहे. •••

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under आसमंत, शिरीष देशपांडे. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, शिरीष देशपांडे (582 of 601 articles)


योगानंद काळे जगण्यासाठी शेतीवर अवलंबून असणार्‍या भारतीय मनुष्यबळाच्या जडणघडणीतील गेल्या दोन दशकांत झालेेले बदल अभ्यासातील आहेत. शेतमजुरांच्या संदर्भातील आकडेवारी अत्यंत ...