ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » अविवेकनिष्ठांची मांदियाळी!

अविवेकनिष्ठांची मांदियाळी!

॥भारत भाग्य विधाता : प्रशांत आर्वे |

काश्मीर खोर्‍यातील असंख्य काश्मिरी पंडितांना आपले घरदार सोडून जम्मू आणि दिल्लीच्या परिसरात निर्वासित म्हणून गेली पंचेवीस वर्षे नरकयातना भोगाव्या लागत आहेत. महत्प्रयासानंतर भारताने काश्मीर राखण्यात यश मिळविले असले, तरी काश्मीर प्रश्‍न अजूनपर्यंत सुटू शकलेला नाही, हे वास्तव आहे. ती आपली दुखरी नस झालेली असताना, आमच्याच देशातील विवेकनिष्ठ म्हणविणार्‍या मंडळींचा या प्रश्‍नाबाबत दृष्टिकोन संताप आणणारा असतो. या निर्वासितांना ना सुविधा आहेत, ना स्वाभिमानाने जगण्याची संधी!

I Am Hindusthani I Am Ashmed I Am Raped

I Am Hindusthani I Am Ashmed I Am Raped

स्वतःला पुरोगामी समजणार्‍या, मात्र प्रत्यक्षात जातीच्या पलीकडे न जाणार्‍या एका मित्रासोबत चर्चा सुरू होती. चर्चेच्या ओघात तो बोलून गेला, मुस्लिम तरुणांना या देशात रोजगार आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळणार नसेल, तर त्यांनी हाती शस्त्र का घेऊ नये? मी स्वभावाप्रमाणे इतिहासात गेलो. माझ्यासमोर उभे राहिले मिश्रीवाला, मुथी आणि पुरखू या सरकारी निर्वासित छावण्यांमध्ये राहणारे ते सारे अभागी काश्मिरी हिंदू, जे आपल्याच देशात निर्वासित म्हणून जगत आहेत! म्हणून त्यांनी हाती शस्त्र घेतल्याचे ऐकिवात नाही.
६ नोव्हेंबर १९८९. त्या दिवशी ‘स्टेटमन’चा मथळा होता- काश्मीर भारताच्या हातातून जवळजवळ गेल्यासारखे! ‘टाइम्स ऑफ इंडिया’ची बातमी होती- दुर्दैवी काश्मीर खोर्‍यात दहशतीचं साम्राज्य पसरलंय्. त्याबाबत मिठाची गुळणी धरण्याचा चमत्कारिक कटच शिजला आहे, असं वाटतं. पेट्रियाटचा मथळा होता- श्रीनगरमध्ये रोज बॉम्बस्फोटाचे हादरे. याच वेळी हरिसिंग मार्गावर न्यायमूर्ती गंजू यांचा खून करण्यात आला, प्रसिद्ध पत्रकार पी. एन. भट यांना ठार मारण्यात आलं. गर्दीच्या ठिकाणी असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये भर दिवसा शिरून ठाणेदारास ठार मारण्यात आले… अशा असंख्य घटनांनी काश्मीरमधील प्रशासन पूर्ण कोसळले आहे, याचा प्रत्यय येत होता. जमाते इस्लामीच्या मार्गदर्शनात सुरू झालेले ‘ऑपरेशन टोपॅक’ पूर्ण झाले होते. परिणाम काय झाला? काश्मीर खोर्‍यातील असंख्य काश्मिरी पंडितांना आपले घरदार सोडून जम्मू आणि दिल्लीच्या परिसरात निर्वासित म्हणून गेली पंचेवीस वर्षे नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
महत्प्रयासानंतर भारताने काश्मीर राखण्यात यश मिळविले असले, तरी काश्मीर प्रश्‍न अजूनपर्यंत सुटू शकलेला नाही, हे वास्तव आहे. ती आपली दुखरी नस झालेली असताना, आमच्याच देशातील विवेकनिष्ठ म्हणविणार्‍या मंडळींचा या प्रश्‍नाबाबत दृष्टिकोन संताप आणणारा असतो. या निर्वासितांना ना सुविधा आहेत, ना स्वाभिमानाने जगण्याची संधी! रोहिंग्या मुस्लिमांना देशात जागा द्या म्हणून ओरडणारे, आपल्याच देशातील या अभागी निर्वासितांबद्दल चकार शब्द काढत नाहीत. जुलै २०१७ मध्ये ‘रूटस् ऑफ कश्मीर’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेने सुप्रीम कोर्टात, १९८९ च्या काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची चौकशी करण्यासाठी पी. आय. एल. दाखल केली. मात्र कोर्टाने, इतके जुने प्रकरण दाखल करता येणार नाही आणि पुरावेदेखील उपलब्ध होणार नाहीत, अशी सबब सांगत याचिका नाकारली. गंमत म्हणजे त्याच वेळी १९८४ च्या शीखविरोधी दंगलीसंदर्भातील याचिका मात्र कोर्टाने स्वीकारली. देशातील अनेक मंडळींना नेहमीच स्वतःला पुरोगामी सिद्ध करण्यासाठी अल्पसंख्य (?) समाजाची तळी उचलून धरावी लागतेच लागते, अन्यथा पुरोगामित्वाचा शिक्का कसा बसेल? ते करताना बहुसंख्य समाजाची गळचेपी, मानभंग झाला तरी चालेल. यात सुप्रीम कोर्टापासून तर समाजात अत्यंत प्रतिष्ठित समजले जाणारे लेखक, कवी, विचारवंत, प्रसारमाध्यमे सारे आले. अर्थात दुर्गाबाई भागवत यांच्यासारखे काही अपवाद अलहिदा.
प्रसारमाध्यमे आम्हाला ज्या गोष्टी दाखवितात, त्या तशा असण्याचा संभव फार कमी असतो. याउलट काय दाखवायचे आणि काय झाकायचे, हे कसब एव्हाना प्रसारमाध्यमांनी हस्तगत केले आहे. कुठल्या बातमीचा बळी द्यायचा आणि कुठल्या बातमीवर रणकंदन माजवायचे, याचा अजेंडाच ठरलेला असतो. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात माध्यमांच्या विश्‍वासार्हतेबद्दल प्रश्‍न निर्माण होत असतील, तर फार आश्‍चर्य वाटायला नको. प्रश्‍न केवळ माध्यमांचा नाही, तो आहे या देशातील बुद्धिजीवी म्हणविल्या जाणार्‍या वर्गाचा. त्यांच्या व्यक्त होण्याच्या वेळा आणि प्रसंग ठरलेले असतात. कुठे गप्प बसायचे आणि कुठे बेंबीच्या देठापासून ओरडायचे, हेदेखील निश्‍चित असते. यातून जन्मास येतो दुटप्पीपणा, ज्यामुळे अलीकडे हे बुद्धिजीवी हास्यास्पद ठरत चालले आहेत. हा प्रकार खरेतर राजरोसपणे वर्षानुवर्षे सुरू होता. पण, समूहमाध्यमे सर्वसामान्य माणसाच्या हाती आली आणि यांचा हा आपमतलबीपणा उघडा पडू लागला. पोरेटोरेदेखील यांच्या वक्तव्याची आणि वर्तनाची चिरफाड करू लागले.
सनातनच्या कार्यकर्त्यांना अटक झाल्यावर, खरेतर कुणाही सुज्ञ माणसाला वाईट वाटण्याचे कारण नव्हते. सामान्य माणसाला त्याचा आनंदच झाला. महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी मंडळींना त्याचा अधिक आनंद झाला. तो होणं स्वाभाविक होतं. पुन्हा हिंदू दहशतवादावर चर्चा सुरू झाल्या. मात्र, लगेचच सरकारने शहरी नक्षलसमर्थकांच्या मुसक्या आवळल्याबरोबर सर्व तथाकथित बुद्धिजीवी कांगावा करू लागले. त्यांना ही कारवाई आकसातून झाल्याचा साक्षात्कार झाला! रोमिला थापर यांनी सुप्रीम कोर्टात तत्काळ याचिका दाखल केली. आश्‍चर्य म्हणजे दोन तासांच्या आत सुप्रीम कोर्टाने त्यावर सुनावणी घेऊन गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण परेरा आणि वर्णन गोन्साल्वीस यांची अटक रद्द करून नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. याच सुप्रीम कोर्टाला कश्मीरसंदर्भातील कलम ३५ ए बाबत सुनावणी घ्यायला वेळ नाही. ही तत्परता कुठून येते? या नक्षलसमर्थकांपैकी एक असलेला गौतम नवलखा याचे, काश्मिरी तरुणांना हाती शस्त्र घेण्यासाठी भडकविणारे व्हिडीओ समाजमाध्यमावर फिरत आहेत. हाच नवलखा, सोनिया सरकारच्या काळात जे राष्ट्रीय सल्लागार मंडळ होते त्याचा सदस्य होता. या अटकसत्रानंतर बुद्धिवादी वर्गाचे शिरोमणी डॉ. गिरीश कर्नाड यांनी ’चश ीेें र्ीीलरप छरज्ञीरश्र’ अशी पाटी छातीवर लावून फोटोसेशन केले. या लोकांना नवलखासारख्या लोकांची देशविरोधी मानसिकता दिसत नसेल? अरुंधती रॉय, काश्मीर भारताचा भाग कधीच नव्हता, असे सय्यद गिलानीच्या मंचावरून खुलेआमपणे सांगते, यासीन मलिक हा तिच्या गळ्यातील ताईत असतो आणि इथला स्वतःला विवेकनिष्ठ वगैरे म्हणवणारा वर्ग हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून गप्प बसतो. इतकेच नव्हे, तर देशात छोट्या शहरापर्यंत या बाईंची व्याख्याने आयोजित केली जाणे कशाचे लक्षण आहे? ज्या अभिव्यक्तीच्या गप्पा ही मंडळी मारतात; त्यांना कधीपासून लोकशाही मान्य झाली आहे? याउलट, सर्व साम्यवादी राजवटी त्यांच्याविरुद्ध उठणार्‍या आवाजाची मुस्कटदाबी करण्यासाठी कुख्यात आहे.
आणखी एक प्रकरण बघू या… ‘‘ती नन धंदेवाली वेश्या आहे, याबाबत कसलीही शंका नाही. तिला १२ वेळेस मजा वाटली आणि तेराव्या वेळी तो बलात्कार कसा वाटला? तिने पहिल्यांदाच तक्रार का नाही केली?’’ हे विधान पारावर बसून गप्पा हाकणार्‍या कुणा गुलछबू तरुणाचे नाही, तर कोट्टायम, केरळ येथून सहा वेळा कम्युनिस्ट पार्टीचे आमदार असलेले पी. सी. जॉर्ज यांचे आहे! आता फक्त कल्पना करा, हेच विधान कुणा उजव्या मानल्या गेलेल्या एखाद्या पक्षाच्या नेत्याने केले असते, तर प्रसारमाध्यमामध्ये काय गहजब झाला असता? जालंधर येथील फ्रांको मुलक्कल या बिशपवर एका ननने, तिच्यावर गेले दोन वर्षे फ्रांको बलात्कार करीत होता, असा आरोप केला आणि खळबळ माजली. गंमत म्हणजे या बातमीची सुरुवातीला साधी दखल घ्यावीशीदेखील अनेकांना वाटली नाही, की त्याच्यावर प्राईम टाईम झाले नाही.
प्रकरण तापू लागले तशा बातम्या सुरू झाल्या खर्‍या, परंतु एकंदर बातम्यांचा रोख ती बातमी दाबण्याकडे जास्त राहिला. त्या महिलेने तक्रार केल्यावरदेखील मुलक्कल महाशय निर्धास्त होते. कारण त्यांना साधे चौकशीसाठीदेखील बोलाविण्यात आले नव्हते. मला प्रकर्षाने आठवते ती करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर. कठुआ प्रकरणानंतर ख रा कळपर्वीीींरप, ख रा रीहराशव, ख रा ीरशिव. म्हणून फलक झळकावणार्‍या या ललना, नन बलात्कार प्रकरणात कुठे दिसल्या नाहीत. अवघ्या स्त्रीवादी संघटनासुद्धा यावर मूग गिळून बसलेल्या दिसताय्. यात पीडित ननने आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडावी म्हणून व्हॅटीकन सिटीच्या जीयाम बाटीस्ता दीक्वात्रोला पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे- ‘‘कॅथॉलिक चर्च फक्त बिशप आणि पादरी लोकांची काळजी घेण्यासाठी आहे काय?
महिलांच्या न्यायासाठी धर्माच्या कायद्यात काही कलम आहेत की नाही, हे मला समजून घ्यायचे आहे. या प्रकरणावर चर्चने राखलेली शांतता मला अस्वस्थ करीत आहे. मी एवढी वर्षे धर्माची सेवा केली त्याबदल्यात मला हे फळ मिळाले आहे. मी जे काही गमावलं आहे ते तुम्ही परत देऊ शकता का?’’ याहीपुढे या ननने, अन्य महिलादेखील फ्रांको मुलक्कलच्या वासनेच्या शिकार झाल्याचे नमूद केले आहे. एक महिला म्हणून तरी तिची कैफियत ऐकून घेणे गरजेचे होते, पण तेदेखील झाले नाही. या प्रकरणाने अनेक पुरोगामींचे बुरखे फाडण्याचे काम केले आहे. आता म्हणे केरळ पोलिसांनी मुलक्कलला भेटण्यासाठी बोलाविले आहे. आहे ना गंमत! ‘असंतांचे संत’ या अग्रलेखावरून आघाडीच्या वर्तमानपत्राला आपला अग्रलेख मागे घ्यावा लागणे, यातच सगळे आले.
डोंबिवली येथील मराठी उद्योजक आणि इन मराठी पोर्टलचा संचालक ओमकार दाभाडकर याने या प्रकरणाला वाचा फोडली. तो याहीपुढे जाऊन घडणार्‍या सर्व घटनांतील परस्परसबंध शोधण्याचा प्रयत्न त्याच्या लेखातून करीत असतो. सामान्य माणसाला जे न्यायालय वर्षानुवर्षे खेटे घ्यायला लावते, ते न्यायालय काही विशिष्ट लोकांसाठी अर्ध्या रात्री कसे काय उघडले जाऊ शकते? या प्रश्‍नांची उत्तरे वरकरणी पाहता सापडणारी नाहीत आणि सामान्य माणसाला तर नाहीच नाही. देशापेक्षा स्वतःला मोठे समजणारे एक छुपे नेक्सस या देशात कार्यरत आहे. ज्यांना देश असला काय अन् नसला काय, त्यांचा स्वार्थ साधला जाणे महत्त्वाचे. यांनी देशाविरुद्ध छुपे युद्ध पुकारले आहे. ज्यात सर्व देशविरोधी शक्ती २०१९ पूर्वी एकत्र आलेल्या आपल्याला दिसतील.
कारण हा सामना त्या तथाकथित विवेकवादी विरुद्ध सामान्य माणूस असा असणार आहे. सुरुवातीला डावे आणि उजवे असा केवळ वैचारिक वाद होता. मधु दंडवते, श्रीपाद डांगे ही समाजवादी मंडळी परिपक्व आणि देशाच्या प्रश्‍नाबाबतीत तडजोड न करणारी होती. त्यांचा विरोध हा वैचारिक पातळीवर होता. पुढे त्याचे वैचारिक युद्धात रूपांतर झाले. (खपींशश्रश्रशर्लीींरश्र ुरी) आताशा या बौद्धिक युद्धाचे रूपांतर कटकारस्थाने, षडयंत्र यात झाले आहे. या युद्धाची जबाबदारी अर्थात समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या आणि मुखवटे लावून फिरणार्‍या वर्गावर आली आहे. त्यातून सामान्य माणूस जे प्रश्‍न विचारू पाहतोय् ते वर्षानुवर्षे बुद्धिजीवी म्हणून मिरविणार्‍या लोकांना सहन होईनासे झाले आहे. एकंदर काय, तर सर्व अविवेकनिष्ठ एकत्र येऊन एल्गार करण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून ती अविवेकनिष्ठांची मांदियाळी ठरते! अविवेकाला यापुढे विवेकाने उत्त्तर देता येईल काय, हाच भविष्यातील प्रश्‍न असेल! (लेखक हे इतिहासाचे अभ्यासक आहे)

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (255 of 835 articles)

Bolshevik Revolution
विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | सीआयएच्या आचरट घातपाती कारवायांपेक्षा अमेरिका आणि युरोपीय देशांनी मिळून ‘रेडिओ-फ्री युरोप’ नावाचं जे आकाशवाणी ...

×