ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » अष्टपैलू क्रिकेटपटूची अखेर

अष्टपैलू क्रिकेटपटूची अखेर

॥ आदरांजली : चंदू बोर्डे, ज्येष्ठ क्रिकेटपटू |

इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणारे अजित वाडेकर मित्राच्या सल्ल्यावरून क्रिकेटकडे वळले आणि नंतर त्यांचं अवघं जीवन क्रिकेटमय झालं. उत्तम क्रिकेटपटू, क्रिकेट संघाचे कप्तान, संघाचे मॅनेजर तसेच निवड समितीचं अध्यक्षपद, अशा जबाबदारीच्या विविध पदांवर काम केलेल्या मोजक्या खेळाडूंमध्ये अजित वाडेकर यांचा समावेश होतो. अशा गुणी खेळाडूच्या जाण्यानं क्रिकेटविश्‍वात निर्माण झालेली पोकळी भरून निघणं कठीण आहे.

Ajit Wadekar2

Ajit Wadekar2

इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणारे अजित वाडेकर मित्राच्या सल्ल्यावरून क्रिकेटकडे वळले आणि नंतर त्यांचं अवघं जीवन क्रिकेटमय झालं. उत्तम क्रिकेटपटू, क्रिकेट संघाचे कप्तान, संघाचे मॅनेजर तसेच निवड समितीचं अध्यक्षपद, अशा जबाबदारीच्या विविध पदांवर काम केलेल्या मोजक्या खेळाडूंमध्ये अजित वाडेकर यांचा समावेश होतो. अशा गुणी खेळाडूच्या जाण्यानं क्रिकेटविश्‍वात निर्माण झालेली पोकळी भरून निघणं कठीण आहे.
भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडू अजित वाडेकर यांच्या जाण्यानं क्रिकेटचा सच्चा मार्गदर्शक हरपला आहे. वाडेकर यांची क्रिकेटमधील कारकीर्द उल्लेखनीय राहिली. आठ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत अजित वाडेकर यांना ३७ सामने खेळण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी २११३ धावा काढल्या. त्यामध्ये एक शतक आणि ३४ अर्धशतकांचा समावेश होता. खरंतर वाडेकर यांना इंजिनीअर व्हायचं होतं. एकदा ते सहकारी बाळू गुप्ते यांच्यासह बसमधून कॉलेजला जात होते. बाळू गुप्ते हे कॉलेजच्या क्रिकेट संघात खेळत होते. त्यांनी अजित वाडेकर यांना, ‘‘तू कॉलेजच्या संघातील १२ वा खेळाडू होशील का?’’ असा प्रश्‍न विचारला. मित्राच्या या प्रश्‍नाला होकार दर्शवत वाडेकर कॉलेजच्या क्रिकेट संघात सहभागी झाले. त्यानंतर सुनील गावसकरचे काका माधव मंत्री यांनी अजित वाडेकरमधील प्रतिभा हेरली. पुढे मंत्री यांच्याच सांगण्यावरून वाडेकर यांना भारतीय संघात सहभागी होण्याची संधी मिळाली. १९७१ मध्ये वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजचा दौरा केला. यातल्या पहिल्या सामन्यात भारताने दिलीप सरदेसाईंच्या द्विशतकाच्या साहाय्याने वेस्ट इंडिजवर फॉलोऑन लादला.
अर्थात, हा सामना अनिर्णित राहिला. दुसर्‍या सामन्यात भारतानं सरदेसाईंच्या शतकाच्या साहाय्याने वेस्ट इंडिजचा सात गडी राखून पराभव केला. पुढील तीन सामने अनिर्णित राहिल्यामुळे भारतानं ही मालिका १-० अशी जिंकली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे हा भारतीय क्रिकेट संघाचा परदेश दौर्‍यातील पहिला विजय होता. याच वर्षी भारतीय क्रिकेट संघ अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या दौर्‍यावर गेला होता. या दौर्‍यातही भारतीय क्रिकेट संघानं इंग्लंडचा २-० असा पराभव केला.
भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कप्तानांमध्ये अजित वाडेकरांची गणना होत असे. ते उत्तम फलंदाज तसंच कुशल यष्टिरक्षक होते. त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द आठ वर्षांची राहिली. एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतले भारतीय संघाचे पहिले कप्तान म्हणूनही अजित वाडेकरांचं योगदान महत्त्वाचं राहिलं.१९९०च्या दशकात मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे मॅनेजर म्हणूनही त्यांनी उत्तम जबाबदारी पार पाडली. या काळात अझरुद्दीन तसंच अनिल कुंबळेच्या क्रिकेट कारकीर्दीला संजीवनी देण्याचं काम वाडेकर यांच्याकडून झालं. नंतर वाडेकर यांनी निवड समितीचं अध्यक्षपदही भूषवलं. अजित वाडेकर यांनी १९६६-१९६७ मधील रणजी ट्रॉफी स्पर्धेत म्हैसूर संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक ३२३ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर १९६७ च्या इंग्लंड दौर्‍यात काऊंटी सामन्यांमध्ये ८३५ धावा केल्या होत्या.
सचिन तेंडुलकरवरही अजित वाडेकर यांचा प्रभाव राहिला आहे. किंबहुना, सचिन तेेंडुलकरला आघाडीचा फलंदाज बनवण्यात वाडेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अजित वाडेकर यांच्या कारकीर्दीतील काही बाबी इतक्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत की, त्या बाबतीत विराट कोहली, धोनी, रोहित शर्माच नव्हे, तर कोणताही भारतीय खेळाडू त्यांची बरोबरी करू शकणार नाही. वाडेकर हे पहिल्या एकदिवसीय भारतीय क्रिकेट संघाचे कप्तान होतेच, शिवाय एकदिवसीय सामन्यात अर्धशतक करणारे पहिले भारतीय फलंदाजही होते.
अजित वाडेकर एकदिवसीय क्रिकेट संघाचे पहिले कप्तान होते, तर सचिन तेंडुलकर भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचे तेरावे कप्तान राहिले. याबाबत धोनीचा १९ वा क्रमांक आहे, तर विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट संघाचा बाविसावा कप्तान राहिला आहे. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने लागोपाठ तीन मालिका जिंकल्या होत्या. यातली एक मालिका वेस्ट इंडिजमध्ये, दुसरी इंग्लडंमध्ये तर तिसरी इंग्लंडविरुद्ध भारतात खेळली गेली होती. आणखी एक विशेष म्हणजे वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजमध्ये जिंकलेल्या सामन्याद्वारे सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सुनील गावसकर, गुंडाप्पा विश्‍वनाथ, फारुख इंजिनीअर, बिशनसिंग बेदी, प्रसन्न, चंद्रशेखर आणि श्रीनिवास वेंकटराघवन अशा एकाहून एक सरस खेळाडूंचा समावेश असलेल्या क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्याची संधी वाडेकर यांना लाभली.
क्रिकेटपटू, क्रिकेट संघाचे कप्तान, संघाचे मॅनेजर तसेच निवड समितीचं अध्यक्षपद, अशा जबाबदारीच्या विविध पदांवर काम केलेल्या मोजक्या खेळाडूंमध्ये अजित वाडेकर यांचा समावेश होतो. त्यांचं अवघं जीवन जणू क्रिकेटमय झालं होतं. क्रिकेट हेच त्यांचं मुख्य ध्येय आणि विश्‍व होतं. असं असलं तरी १९७४ मध्ये वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडच्या दौर्‍यात पराभव पत्करावा लागला. या पराभवाला ‘समर ऑफ ४२’ असं म्हटलं जातं. याचं कारण या दौर्‍यात भारतीय संघानं लॉर्डस्वरील सामन्यात सर्वात कमी धावा केल्या होत्या. या पराभवामुळे अजित वाडेकर यांना टीकेचा तसंच विरोधाचा सामना करावा लागला. त्यानंतर वाडेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाचं कप्तानपद सोडण्याची तसंच प्रथम श्रेणी क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी मॅनेजर म्हणून दुसर्‍यांदा योगदान दिलं. यावरून त्यांचं क्रिकेटवरील प्रेम तसंच निष्ठा दिसून आली. मुख्यत्वे अजित वाडेकर यांनी भारतीय क्रिकेटला जगभरात वेगळी ओळख मिळवून दिली, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
भारतीय क्रिकेटमधील बहुमूल्य योगदानाबद्दल अजित वाडेकर यांना १९६७ मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर १९७२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शिवाय बीसीसीआयद्वारे त्यांना सी. के. नायडू लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आलं होतं. अशा या भारतीय क्रिकेटमध्ये अद्वितीय योगदान देणार्‍या गुणी खेळाडूची उणीव जाणवत राहणार आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली!
निष्णात क्रिकेटपटू
अजित वाडेकर आणि मी एकत्र खेळलो होतो. व्यक्तिश: आमची चांगली मैत्रीदेखील होती. सण-समारंभाच्या, वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आवर्जून एकमेकांना शुभेच्छा देत असू. याशिवाय आमच्यामध्ये विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण होत असे. अजित वाडेकरचा स्वभाव विनोदी होता. तसंच तो सर्वांमध्ये मिळून-मिसळून वावरत असे. मुंबई क्रिकेट संघाच्याच नव्हे, तर भारतीय क्रिकेट संघाच्या वाटचालीत त्याचं मौल्यवान असं योगदान राहिलं.
वाडेकरच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज तसंच इंग्लंड संघाविरुद्ध विजय मिळवला होता. तो क्रिकेटमध्ये कार्यरत असताना या खेळाचा प्रकाश होता, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मुंबईतील शिवाजी पार्क जिमखान्यानं भारतीय क्रिकेटला संदीप पाटील, विजय मांजरेकर यासारखे कुशल खेळाडू दिले. या जिमखान्याच्या प्रमुखपदाची धुरा अजित वाडेकरने सांभाळली होती. या काळातही खेळाडूंसाठी त्याचं मार्गदर्शन उपयुक्त ठरलं. वाडेकरने सामाजिक कार्यासाठी दिलेलं योगदानही महत्त्वाचं राहिलं.
तो एक कॅलक्युलेटेड प्लेअर होता. त्याचा भारतीय क्रिकेट संघाला निश्‍चित फायदा झाला. विशेषत: सामन्यात भारताच्या दृष्टीने परिस्थिती बिकट असायची तेव्हा तो मैदानावर टिच्चून राहण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यात त्याला यशही यायचं. त्याची फलंदाजी उत्तम होती. अजित उत्तम कप्तानही होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकली तेव्हा या संघाचं भारतात झालेलं स्वागत अभूतपूर्व आणि अविस्मरणीय ठरलं. संघातल्या सर्व खेळाडूंची मुंबई विमानतळापासून सजवलेल्या उघड्या बसवरून मिरवणूक काढण्यात आली होती. मार्गात लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या विजयाने अवघ्या देशातल्या क्रिकेटला चैतन्य मिळालं होतं. अशा या निष्णात क्रिकेटपटूच्या जाण्यानं झालेली क्रिकेटक्षेत्राची हानी भरून येण्यासारखी नाही.

Posted by : | on : 26 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (366 of 875 articles)

Navjot Singh Sidhu Hug Bajwa Mani Tharoor
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | त्याचे भान सिद्धूला अजिबात नाही. म्हणूनच टाळणे शक्य असूनही त्याने पाकिस्तानला जाण्याची मुळातच चुक ...

×