ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:

असेही ‘मॉब लिंचिंग’

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

Mob Lynching

Mob Lynching

‘मॉब लिंचिंग’ हा शब्द काही आताशा नवीन वा अपरिचित राहिलेला नाही. आपल्यादेशातील विचारवंत म्हणवणार्‍या एका वर्गाला जमेल त्या गोष्टीचे मार्केटिंग करण्याची सवय लागली आहे. ’मॉब लिंचिंग’ किंवा सामुहिक मारहाण आणि हत्या हादेखील असाच मार्केटिंग झालेला शब्द. २०१५ साली दादरी येथे गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मुहम्मद अखलाख याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आणि हा शब्द पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. अशा प्रकारची हिंसा ही कोणत्याही देशासाठी शरमेची बाब असेल यात कोणाचेही दुमत नसावे. मात्र या दुर्दैवी घटनेच्या बाजारीकरणाचा किळसवाणा पुरोगामी खेळ अधिक लज्जास्पद होता. पुढील काळात तर कित्येकदा या ’मॉब लिंचिंग’च्या नावाखाली खोट्या घटना पसरवण्याचे प्रकारही घडले. या खोट्या घटना पसरवून गोरक्षक हे कसे हिंसक आहेत आणि हिंदू कट्टरतावाद फोफावतो आहे हे चित्र जाणीवपूर्वक रंगवले गेले. खरेतर कोणीही कायदा हातात घेणे गैरच. मात्र जितक्या अंशी गोरक्षकांवर आगपाखड करण्यात आली तितकेच अवैध गोतस्करी करणार्‍यांना मात्र आवर्जून पाठीशी घातले गेले हे विशेष!
उदाहरणादाखल; ऑगस्ट २०१८ मध्ये अवैध गोतस्करी विरुद्ध पोलीस तक्रार केल्याच्या रागातून उत्तरप्रदेशातील भयानकनाथ मंदिरात चार हिंदू साधूंची आधी छळ करून मग हत्या करण्यात आली. पैकी एकाची तर जीभ छाटण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी सलमान, नदीम, शहजाद, मंजू आणि जब्बार या संशयितांना अटक केली आहे. हा’मॉब लिंचिंग’चाच प्रकार नव्हता का? मात्र एरव्ही याबाबत ट्विटची टीवटीव करणारे विचारवंत आणि बातम्या देणार्‍या वाहिन्या मुग गिळून गप्प होत्या. ही अशा प्रकारची एकमेव घटना होती असेही नाही. २०१४ सालपासूनच्या आकडेवारीवर नजर टाकूया.
७ फेब्रुवारी २०१४ : गो-तस्करांनी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये २ गावकर्‍यांना मारले.
१ मे २०१४ : गुरगाव, बलीयावास येथेगो-तस्करांनी गावकरी आणि पोलिसांवर गोळीबार केला.
२४ जून २०१४ : शहाजहानपूर, उत्तर प्रदेश येथे गाय चोरताना पकडल्या गेलेल्या तस्कराने गायीच्या मालकावर गोळीबार केला.
२० फेब्रुवारी २०१५ : अझीजपूरजवळ गायींना घेऊन जाणारा ट्रक पकडल्यावर तस्करांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यात २ पोलीस मृत्युमुखी पावले. यातील एक हेड कॉन्स्टेबल होते.
१० सप्टेंबर २०१५ : फरीदापूर येथे गायीची तस्करी करणार्‍यांनी एका सबइन्स्पेक्टरची गोळी झाडून हत्या केली गेली.
१० ऑक्टोबर २०१५ : प्रशांत पुजारी या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने गोहत्या आणि तस्करी थांबवायचा प्रयत्न केला, पण मंगलोरमध्ये तस्करांनी त्याला ठार केले. पोलिसांनी नंतर संशयित मोहम्मद इम्तियाझ याला अटक केली.
९ जानेवारी २०१६ : गो-तस्करांनी पश्‍चिम बंगाल मध्ये बीएसएफच्या जवानाची हत्या केली.
१ जून २०१६ : आग्रा, जिल्हा इटा येथे गो-तस्करांनी १६ वर्षीय मुलीची गोळी घालून हत्या केली.
६ जून २०१६ : आझमगड, लखनौ येथे दोघा जणांनी दाता राम रखवालदाराची पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून हत्या केली. आरोपींची नावे जाकीब, इतिकार अशी होती.
१९ जून २०१६ : फिरोजाबाद येथे आग्रा गो-तस्करांपासून आपल्या गायीचं संरक्षण करत असलेल्या दलित बांधवाची गोतस्करांनी हत्या केली.
५ ऑगस्ट २०१६ : जौनपूर, उत्तर प्रदेश येथे गो-तस्करांनी आपल्या गाडीखाली चिरडून एका पोलीस अधिकार्‍याची हत्या केली.
२२ ऑक्टोबर २०१६ : पानिपत येथील शेतकर्‍याने गो-तस्करांना मुद्दे मालासकट पकडल्यानंतर, गो-तस्करांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली.
२ नोव्हेंबर २०१६ : उत्तर प्रदेश, इटा येथे आपल्या म्हशीचं गो-तस्करांपासून संरक्षण करणार्‍या महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
२५ जून २०१७ : शाहजहानपूर येथे एहसान नामक आरोपी गो-तस्करांने पोलिसांवर ट्रक घालायचा प्रयत्न केला.
२ जुलै २०१७ : कोत्रेकापूर, आग्रा येथे आपल्या म्हशीचं गो-तस्करांपासून संरक्षण करणार्‍या शेतकरी चरणसिंगची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
वरील आकडेवारी ही संकलित असून मूळ स्रोतांतून खात्री करून मगच वाचकांसमोर ठेवत आहे. यादीत किमान पंधरा प्रसंग नमूद केले आहेत. प्रत्यक्षात त्याहून कित्येक घटना घडल्या असतील ज्या आमच्यासमोर आणल्या गेल्याच नाहीत. यातील कुठल्याही घटनेचा निषेध करताना तथाकथित पुरोगामी विचारवंत आढळले का? तसे करण्यापासून त्यांना कोणत्या बाबीने रोखले असावे बरे? गोरक्षकांनी केलेल्या हल्याच्या घटनेवरून देशाला थेट ’लिंचिस्तान’ असे नाव देणार्‍या विचारवंतांना या बातम्या का बरे दिसल्या नसाव्या? की इथे पीडित हे हिंदू आणि पीडनकर्ते हे अन्यपंथीय असल्याचे तथ्य गैरसोयीचे असल्याने मौन धारण केले गेले? असे प्रश्‍न विचारले जाणार नाहीत तोवर एकांगी बातम्याच आपल्यासमोर ठेवून दिशाभूल केली जात राहील.
रोखठोक आकडेवारी व संदर्भ समोर ठेवल्यावर मूळ विषयालाच बगल देणे हा पुरोगामी मंडळींचा आवडता खेळ. ’गोहत्या बंदी करणं हा अन्याय आहे. कोणी काय खावं यावर सरकार बंदी आणू शकत नाही. कोणत्याही प्रगत लोकशाही राष्ट्रात अशी जबरदस्ती होत नाही.’ असा त्यांचा आवडता युक्तिवाद असतो. या निमित्ताने आवर्जून एक माहिती देऊ इच्छितो; कुत्रे आणि मांजरी यांची हत्या करून त्याचा खाद्य म्हणून वापर करण्यास आता सरकारने एकमताने बंदी घातली आहे. मात्र ही बंदी भारत सरकारने घातली नसून पुरोगाम्यांच्या लाडक्या अमेरिकेच्या सभागृहात एकमताने प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे! याशिवाय दक्षिण कोरिया, चीन, भारत इत्यादि देशांनीही ही पद्धत लागू करावी अशीही मागणी अमेरिकेने केली आहे. ’कुत्रे आणि मांजरी या माणसाला सहजीवनासाठी उपयुक्त असल्याने त्यांना मारणे नैतिकदृष्ट्या चूक आहे.’ असे मतही यानिमित्ताने मांडले गेले आहे. गोहत्याबंदी झाल्यावर उर बडवणारे पुरोगामी टोळके या निर्णयाचे मात्र आवर्जून स्वागत करेल. जणू गाय ही मरण्याकरताच जन्माला येते आणि कुत्रे-मांजरी मात्र आपले मित्र असतात. जणू गोरक्षकच हिंसा करतात; गो-तस्कर मात्र सत्याग्रही असतात. हा पुरोगामी दांभिकपणा संपत नाही तोवर देशात शांतता नांदणे अवघड आहे!

Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (478 of 1287 articles)

India Police
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | पोलिसांना गुन्हेगारांचा प्रभावीपणे सामना करता यावा आणि त्याचबरोबर स्वत:च्या व नागरिकांच्या जीविताचेही संरक्षण करता ...

×