राष्ट्रपतींचे भाषण पक्षपाती; कॉंग्रेसचा आरोप

राष्ट्रपतींचे भाषण पक्षपाती; कॉंग्रेसचा आरोप

नवी दिल्ली, २६ जुलै – देशाचे १४ वे राष्ट्रपती…

‘त्या’ पाच जवानांची जन्मठेप रद्द

‘त्या’ पाच जवानांची जन्मठेप रद्द

►माछिल चकमक प्रकरण ►सशस्त्र दल लवादाचा निर्णय, नवी दिल्ली,…

सैन्याला पूर्ण मोकळीक द्या

सैन्याला पूर्ण मोकळीक द्या

►वीरमाता तृप्ता थापर यांचे आवाहन, नवी दिल्ली, २६ जुलै…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:01
अयनांश:
Home » आसमंत, वसंत काणे, स्तंभलेखक » असे जिंकले डोनाल्ड ट्रम्प?

असे जिंकले डोनाल्ड ट्रम्प?

पराष्ट्राकरण : वसंत गणेश काणे |

donald-trump-vegas-rallyअमेरिकेतील निवडणूक आटोपली, डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले, पण संपूर्ण देशातील मते (पॉप्युलर व्होट्स) मोजली तर हिलरी क्लिटंन यांना डोनाल्ड ट्रम्पपेक्षा, थोडीशी का होईना, पण जास्तच मते आहेत. पण हा निवडून येण्याबाबतचा निकष नाही. निकाल कुणाला राज्यनिहाय किती इलेक्टोरल व्होट्स मिळाली, यावर अवलंबून असतो. संपूर्ण तपशील अजूनही हाती आलेला नाही, पण एक नक्की आहे की, हिलरी क्लिटंन व डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेल्या इलेक्टोरल व्होट्‌समध्ये बराच मोठा फरक आहे. पॉप्युलर व्होट्स व इलेक्टोरल व्होट्स यात एवढा फरक कसा काय, हा प्रश्‍न कुणाला पडला तर आश्‍चर्य वाटायला नको. शिवाय पाप्युलर व्होट्‌सच्या आधारे निकाल लागणार नसेल, तर हा हिशोब करायचाच कशाला? तर पॉप्युलर व्होट्सच्या आधारे इलेक्टोरल व्होट्स कुणाला किती हे ठरते, असा खुलासा केला तर, वैचारिक गोंधळ आणखीच वाढतो. यावर एक उपाय आहे. तो म्हणजे अमेरिकन निवडणूक प्रक्रियेचा सुरुवातीपासूनच अभ्यास (हो अभ्यास) करणे हा होय. जिज्ञासूंनी तसाच विचार करावा, हे चागले.
अमेरिकेत अध्यक्षाची निवड कशी होते, हे समजायला तसे थोडेसे कठीणच आहे, म्हणून हा द्राविडी प्राणायम करायचा.
मतदार नोंदणी – अमेरिकेत मतदारांचे एक राष्ट्रीय रजिस्टर असून, नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी स्वत:हून (स्वत:हून बरं का) अर्ज करणे अपेक्षित आहे. त्यामुळे अर्ज करतील तेच नागरिक मतदार होतील. पण नागरिकांनी अर्ज करून नोंदणी करावी, यासाठी तिथेही मोहिमा आखल्या जातात, हा भाग वेगळा.
पॉप्युलर व्होट्स- आठ नोव्हेंबर २०१६ ला सर्व अमेरिकन नागरिकांनी मतदान करणे अपेक्षित होते. आजवर साठ टक्क्यांच्या जवळपास लोक मतदान करीत आले आहेत. २०१६ मध्येही थोड्याफार फरकाने असेच काहीसे झाले असणार. सगळे तपशील हाती यायला थोडी वाट पहावी लागणार आहे. देशभरातून होणार्‍या एकूण मतदानाचा विचार केला, तर हिलरी क्लिटंन यांना देशपातळीवर ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळतील, असे मानले जात होते व ते खरे ठरले. हिलरी क्लिटंन यांना डोनाल्ड ट्रम्पपेक्षा, अगदी थोडी का असेनात, पण जास्त मते मिळाली आहेत. याला पॉप्युलर व्होट्स असे म्हणतात. पण पॉप्युलर व्होट्स जास्त आहेत, एवढ्यावरूनच त्या निवडून येतील असे नाही, हे वर आलेच आहे.
आपल्या संसदेची जशी लोकसभा व राज्यसभा अशी दोन सभागृहे आहेत, तशीच अमेरिकन कॉंग्रेसची (संसदेची) हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज् (प्रतिनिधी सभा) व सिनेट अशी दोन सभागृहे आहेत.
१. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज् (प्रतिनिधी सभा)- अमेरिकेत लहान-मोठी एकूण ५० राज्ये (प्रांत) असून, त्यांच्या वाट्याला लोकसंख्येच्या प्रमाणात रिप्रेझेंटेटिव्हज् (प्रतिनिधी) असतात. जसे कॅलिफोर्निया या सर्वात मोठ्या राज्याला ५३ प्रतिनिधी मिळाले आहेत. पण राज्य कितीही लहान असले, तरी त्याचा निदान एक तरी प्रतिनिधी असतोच. अशी १९ राज्ये आहेत. सर्व प्रतिनिधींची एकूण संख्या ४३५ आहे.
२. सिनेट – सिनेटमध्ये लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व नाही. प्रत्येक राज्याला दोन सिनेट सदस्य असतात. कॅलिफोर्नियासारख्या भल्या मोठ्या राज्याला व अगदी छोट्या एकोणीस राज्यांनाही प्रत्येकी दोनच सदस्य सिनेटवर असतात. अशा प्रकारे सिनेटवर पन्नासच्या दुप्पट म्हणजे एकूण १०० सदस्य असतात.
३. इलेक्टोरल कॉलेज – हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्‌चे (प्रतिनिधी सभा) ४३५ व सिनेटचे १०० सदस्य मिळून ५३५ ही संख्या येते. काही राज्यांची विशेष परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना एकूण तीन जास्तीचे सदस्य दिले आहेत. अशी ५३८ ही इलेक्टोरल कॉलेज व्होटर्सची एकूण सदस्य संख्या आहे. यापैकी ज्या उमेदवाराचे २७० इलेक्टर्स निवडून येतील, तो सहाजिकच अध्यक्ष म्हणून निवडून येतो.
४. इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य (इलेक्टर्स) – हिलरी क्लिटंन व डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्येक राज्यातून आपले इलेक्टर्स कोण असतील, त्यांची नावे राज्य निहाय निवडणूक आयोगाला दिलेली असतील. कॅलिफोर्निया सारख्या मोठ्या राज्यात ही नावे ५३+२=५५ असतील (हाऊसमधील सदस्य-५३ व सिनेटमधील सदस्स २= ५५) तर एकोणीस छोट्या राज्यात ही प्रत्येकी ३ असतील  (हाऊसमधील सदस्य प्रत्येकी १ व सिनेटमधील सदस्स २=३) यांची एकूण बेरीज ५३८ होते, हे आपण पाहिलेच आहे. मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासोबत ही इलेक्टर्सची नावे त्या त्या उमेदवाराच्या नावासोबत काही राज्यांत छापतात, तर काही राज्यांत छापतही नाहीत.
५. इलेक्टर्स कसे निवडून येतात?- आपण कॅलिफोर्नियाचेच उदाहरण घेऊ. ८ नोव्हेंबरला या राज्यातील मतदारांनी मतदान केले आहे. हिलरी क्लिटंन/डोनाल्ड ट्रम्प यांच्यापैकी ज्याला ५० ते १०० टक्के यांच्या दरम्यान कितीही मते (पॉप्युलर व्होट्स) मिळाली, तरी हिलरी क्लिटंन/डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वच्यासर्व म्हणजे ५५ इलेक्टर्स निवडून आले असे मानले गेले. या नियमाला विनर टेक्स ऑल, असे म्हणतात. जो परिणाम १०० टक्के मते मिळाल्याने होईल तोच परिणाम ५० टक्क्यांपेक्षा एकही मत जास्त मिळाले तरी होतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. सर्व ५० राज्यांत याच नियमानुसार इलेक्टर्स निवडून आले आहेत. मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात  इलेक्टर्सची वाटणी होत नाही. ज्याला पॅाप्युलर व्होट्स जास्त त्याचे सर्व इलेक्टर्स निवडून आले आहेत.
कलाटणी देऊ शकणारी राज्ये (स्विंग स्टेट्स)- अमेरिकेत दोन्ही पक्षांचे परंपरागत बालेकिल्ले म्हणावेत, अशी राज्ये आहेत. पण, काही राज्ये (१३/१४) अशी आहेत की, ज्या राज्यांत दोन्ही पक्षांचे बलाबल जवळपास समसमान असते. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेद्वारे जो पक्ष ही राज्ये आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होतो, म्हणजे या राज्यात सर्वात जास्त मते मिळवतो, त्याचे सर्व इलेक्टर्स त्या राज्यातून निवडून आले असे मानावे, असे विनर टेक्स ऑल या नियमानुसार ठरते. म्हणून या राज्यांना कलाटणी देऊ शकणारी राज्ये (स्विंग स्टेट्स) असे म्हणतात.
निवडणुकीपूर्वी झालेल्या जनमत चाचणीनुसार डेमोक्रॅट पक्षाच्या हुकमी इलेक्टोरल मतांची संख्या २१७ इतकी तर रिपब्लिकन पक्षाच्या हुकमी इलेक्टोरल मतांची संख्या १९१ होती. म्हणजे दोन्ही पक्षांची एकूण हुकमी इलेक्टोरल मते २१७+ १९१ = ३०८ इतकी होतात. याचा अर्थ असा की, १३० इलेक्टर्स चाचणी झाली, तेव्हातरी कुंपणावर आहेत. ते कुणाकडे जाणार, ते आज सांगता येत नव्हते. या १३० पैकी डेमोक्रॅट पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी ५३ इतकी तर रिपब्लिकन पक्षाला ७९ इतकी इलेक्टोरल मते हवी होती. ही १३० इलेक्टोरल मते कलाटणी देऊ शकणार्‍या राज्यातील (स्विंग स्टेट्स) मते होती. अशी जवळपास १३/१४ राज्ये असून, त्यात प्रामुख्याने फ्लोरिडा (२९ मते), पेन्सिलव्हॅनिया (२० मते), ओहायो (१८ मते), नॉर्थ करोलिना (१५ मते), व्हर्जिनिया (१३ मते), व्हिस्कॉन्सिन (१० मते) आणि ४ छोटी राज्ये (उरलेली मते) आहेत. या राज्यात सर्वसामान्य मतदारांची ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते (पॉप्युलर व्होट्स) आपल्याला मिळावीत, यासाठीच शेवटच्या टप्प्यातील प्रचार युद्ध सुरू होते. कारण, ज्या पक्षाला राज्यात पन्नास टक्क्यांच्या वर सर्वसामान्य मते (पॉप्युलर व्होट्स) मिळतील, त्या राज्याच्या वाट्याचे सर्व इलेक्टर्स निवडून आले, असे ठरणार होते. असे २७० इलेक्टर्स ज्या उमेदवाराचे निवडून येतील, तो अमेरिकेचा अध्यक्ष होईल मग त्याला पॉप्युलर व्होट्स कितीही असोत. या नियमानुसार डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. त्यांना २७६ पेक्षा जास्त (बहुदा २९०) इलेक्टोरल व्होट्स मिळाली आहेत, असे दिसेल.
कोणत्या राज्याचा स्विंग कोणाकडे राहिला-  यात २९ इलेक्टोरल व्होट्स असलेले  प्रमुख राज्य आहे फ्लोरिडा. या राज्यात ४९ व ४८ टक्के अनुक्रमे डोनाल्ड ट्रम्प व हिलरी क्लिटंन अशी काट्याची टक्कर झाली. २०१२ सालच्या निवडणुकीत हे राज्य डेमोक्रॅट पक्षाकडे होते. ते डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याकडे खेचून आणले. दुसरे राज्य मिशीगन (१६ मते) यातील डोनाल्ड ट्रम्प यांची आघाडी तर फक्त ०.३ टक्क्यांचीच आहे. मिनेसोटा (१० मते इलेक्टोरल व्होट्स ) राज्यात फक्त १.४ टक्क्यांचा फरक आहे. नेवाडा (६ मते) २.४ टक्के फरक; न्यू हॅपशायर (४ मते) ०२ टक्के फरक; पेनसिलव्हॅनिया (२० मते) १.१ टक्के फरक; व्हिस्कॉन्सीन (१० मते) १.० टक्के फरक आहे. ही राज्ये २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाने जिंकली होती. ओहायो (१८ मते) हे राज्य तर ९ टक्के मताधिक्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी खेचून आणले आहे. या उलट हिलरी क्लिटंन यांना २०१२ साली रिपब्लिकन पक्षाने जिंकलेले एकही राज्य आपल्याकडे खेचता आलेले दिसले नाही. जी राज्ये हिलरी क्लिटंन यांनी राखली, त्या राज्यातही मतांची टक्केवारी २०१२ च्या तुलनेत कमीच होती. कॅलिफोर्निया हे भारतीयांची बरीच संख्या असलेले व ५५ इलेक्टोरल व्होट्स असलेले राज्य हिलरी क्लिटंन यांनी आपल्याकडे राखले. इलुनाय (२० मते); मेरीलँड (१० मते); मॅसॅच्युसे्‌स (११ मते); न्यू जर्सी (१४ मते); न्यूयॉर्क (२९ मते); हे बालेकिल्ले हिलरी क्लिटंन यांनी राखले खरे, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यांची एकूण इलेक्टोरल व्होट्स २१८ पाशीच रेंगाळली आहेत.
निष्कर्ष – हा तपशील व असे अनेक तपशील समोर असतील, तरच काही निष्कर्ष काढता येतील.
१. जनतेला बदल हवा होता.
२. डोनाल्ड ट्रम्प यांची सुप्त लाट होती. ती शेवटी शेवटी लक्षात आली व ओबामाही हिरिरीनेे रिंगणात उतरले पण आता उशीर झाला होता.
३. आफ्रिकन अमेरिकन (कृष्णवर्णी) व मेक्सिकन या डेमोक्रॅट पक्षाच्या हुकमी मतदारांच्या पचनी सुद्धा, राष्ट्राध्यक्षपदी महिला उमेदवार असावी, हे पडत नव्हते. या मतदारांपैकी २०/२५ टक्के मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मते दिलेली दिसतात.
४. महिलांनी हिलरी क्लिटंन यांना हिरिरीने मते दिली खरी, पण त्यांची टक्केवारी ५० ते ६० टक्के इतकीच होती. सनातनी विचारांच्या महिलांनी (७५ टक्के अमेरिकन सनातनी
विचारांचे आहेत, सर्व अमेरिकन म्हणजे आधुनिक विचारांचे ही समजूत चुकीची आहे.)
५. जनतेतील तृणमूल स्तरावरचे घटक (ग्रास रूट लेव्हल) हे आपल्या मायवतींच्या मतदारांसारखे आहेत. ते बोलघेवडे नाहीत. त्यांच्यावर प्रचाराचा फारसा परिणाम होत नाही.
६. अतिरेक्यांना धर्म नसतो, हे सर्वसाधारण अमेरिकनांना पटलेले दिसत नाही. ते ट्विन टॉवर्सचा विध्वंस विसरले नाहीत.
७. अगोदर देशांची आर्थिक स्थिती सुधारा, जागतिक राजकारण त्या त्या देशांनी पहावे, ही भूमिका त्यांना पटली.
८. स्थलांतरीत व नोकर्‍या पटकावणार्‍यांना प्रवेश नको.
असे काही निष्कर्ष काढता येतील, पण त्यासाठी सर्व डेटा तपशीलवार पाहायला हवा आहे.

शेअर करा

Posted by on Nov 20 2016. Filed under आसमंत, वसंत काणे, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, वसंत काणे, स्तंभलेखक (760 of 851 articles)


•बिंब-प्रतिबिंब : धनश्री बेडेकर | उद्योगासाठी लागणार्‍या अनेक गुणांपैकी कदाचित काही गुण आपल्यात नसतीलही. पण जे आहेत ते १०० टक्के ...