ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » आझाद हिंद सरकार

आझाद हिंद सरकार

॥ विशेष : प्राची पालकर |

२१ ऑक्टोबर १९४३ ते २१ ऑक्टोबर २०१८ हा तब्बल ७५ वर्षांचा प्रवास करून नेताजींचा दिल्लीत लाल किल्ल्याच्या महाद्वारातून प्रवेश झाला, हे पाहून संपूर्ण हिंदुस्थानात आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावून नेताजींच्या कार्याला अनोखी सलामी दिली. एका घराण्याकडेच लक्ष दिल्याने नेताजींच्या कार्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. ती खरेतर देशवासीयांच्या मनात कित्येक वर्षे दाटून असलेली खंत आहे. २१ ऑक्टोबर या आझाद हिंद सेनेच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त हा खास लेख.

Azad Hind Sarkar Subhashbabu

Azad Hind Sarkar Subhashbabu

देश ब्रिटिशांच्या गुलामीत असताना आझाद हिंद सेनेने नेताजींच्या नेतृत्वात चलो दिल्लीचा नारा दिला, त्यासाठी रक्ताचे पाणी केले, अथक परिश्रम केले, पण समोर येणार्‍या अडचणी न संपणार्‍या होत्या. अखेर महानायकाचा दिल्लीत प्रवेश झालाच नाही. हिंदुस्थानावर अनेक आक्रमणे झाली, अनेकांनी राज्य केले, पण १५० वर्षांची ब्रिटिशांची गुलामगिरी भारतमातेसाठी अत्यंत वेदनादायी ठरली. ब्रिटिश अत्यंत धूर्त होते व त्यांनी खेळलेल्या अंतर्गत राजकारणाने हिंदुस्थानातील अनेक लोकांनी आपल्याच देशबांधवांचे नुकसान केले. ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीने काम करून इंग्रजांनी भारतविरोधी कारवाया करण्यात स्वार्थी लोकांची मदत घेतली. देशहित सोडून स्वहित साधणारे संधिसाधू ब्रिटिशांच्या भोवती पिंगा घालण्यात व्यग्र असताना अनेक क्रांतिकारी फासावर लटकवले गेले, अनेकांना अत्यंत कठोर- काळ्या पाण्याची- शिक्षा झाली. अशा कठीण प्रसंगी अनेक लोक सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणार्‍या, क्रांतिकारी मंडळींवर अनेक आरोप करून त्यांना देशद्रोही ठरविण्याचा पूर्ण प्रयत्न करीत होते. ब्रिटिशांना हाती घेऊन देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तन-मन-धनाने सहभागी होऊन सर्वस्व अर्पण करणार्‍यांचा वारंवार अपमान करणे, हे सत्र स्वतंत्र भारतातदेखील बराच काळापर्यंत सुरू होते. सत्याला असत्य व असत्याला सत्य करण्याचे प्रयत्न जोरकसपणे होत असताना, अचानक प्रखरपणे स्वातंत्र्यसूर्य तळपायला लागला, असे वाटते आहे. योग्य इतिहासाचे अध्ययन, मनन, चिंतन व अगदी सोप्या शब्दांत सांगायचे, तर अंतर्मनाची हाक ऐकायला येणे खूपच महत्त्वाचे असते, हे लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाचा कार्यक्रम पाहताना प्रकर्षाने जाणवले.
लाल किल्ल्यावर आझाद हिंद सरकारच्या स्थापना दिनाला ध्वज फडकवणार, हे ऐकून अत्यानंद झालाच, पण त्याच वेळी नेताजींच्या पावन स्मृतींनी मन उजळून गेले. अगदी २१ ऑक्टोबर १९४३ ला सिंगापुरातील कॅथे सिनेमाची भव्य इमारत अशीच उजळली होती. सर्वत्र आनंदी वातावरण होते, सिंगापुरातील हिंदी लोकांचे जत्थे त्या इमारतीकडे उत्साहात जात होते. कारणही तसेच खास होते. त्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सरकारच्या निर्मितीची घोषणा करणार होते. पूर्व आशियातील हिंदी स्वातंत्र्य संघांच्या प्रतिनिधींची बैठक झाली, समारंभाची तयारी झाली व दुपारी ४ वाजता नेताजी कार्यक्रमस्थळी पोहोचले. नेताजींनी लष्करी गणवेशात सभागृहात प्रवेश केला, तोच आझाद हिंद सेना जिंदाबाद, नेताजी की जय, वंदे मातरम् अशा नार्‍यांनी सभागृह दुमदुमले. आझाद हिंद सेनेची धुरा नेताजींवर सोपविणारे रासबिहारी मात्र प्रकृती खराब असल्यामुळे उपस्थित नव्हते. रासबिहारी बोस यांनी सिंगापूरमध्ये आधीच बरेच काम उभे केले होते. ब्रिटिशांनी नेताजींचा धोका आहे हे ओळखून, त्यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध केले, त्यातून ते निसटले. कठीण परिस्थितीत जर्मनी गाठले. त्या काळी हिटलर तसेच अनेक नेत्यांना भेटून हिंदुस्थानातील परिस्थिती सांगितली. स्वातंत्र्याचा आग्रह धरून नेताजींनी अत्यंत कमी वेळात पूर्व आशियाला गवसणी घातली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी मित्रदेशांना मदत मागितली. भारताची बाजू सर्वांसमोर पोटतिडकीने मांडून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बाहेरून व्यापक प्रयत्न केले. आजचा दिवस हा या प्रयत्नांची फलश्रुती होता. १९४३ साली आजच्या दिवशी हंगामी सरकारची स्थापना झाली होती. नेताजींनी मंत्रिमंडळातील सहकार्‍यांची यादी वाचून दाखवली. युद्धमंत्री व परराष्ट्रमंत्रिपद त्यांनी स्वतःकडे ठेवले. कॅ. लक्ष्मी यांच्याकडे महिला खात्याचे, कर्नल चटर्जी यांच्याकडे अर्थमंत्रिपद, कर्नल भगत, गुलझार सिंग, कर्नल भोसले, आनंदमोहन सहाय अशा अधिकार्‍यांना मंत्रिपद देण्यात आले होते. रासबिहारी, यल्लाप्पा असे अनेक दिग्गज सल्लागार समितीत होते. मंत्रिपदाची शपध घेताना नेताजी अत्यंत भावुक झाले होते, असे वर्णन इतिहासात आहे. जन्मभूमी अत्यंत प्रिय तरीही तिला पारतंत्र्यातून सोडविण्यास, तिला सोडून परदेशात राहावे लागणे त्यांच्याकरिता सोपे नव्हते. २१ ऑक्टोबर १९४३ रोजी नेताजींनी घेतलेली शपध अशी होती- ‘‘मी सुभाषचंद्र बोस, परमेश्‍वरास साक्ष ठेवून अशी पवित्र शपध वाहतो की, हिंदुस्थान आणि हिंदुस्थानातील अडतीस कोटी जनतेच्या बंधमुक्तीसाठी माझ्या आयुष्यातील अखेरच्या श्‍वासापर्यंत मी स्वातंत्र्ययुद्धाचा यज्ञकुंड चेतवीतच ठेवेन! सदासर्वदा मातृभूमीचा नम्र सेवक बनून माझ्या अडतीस कोटी बंधू-भगिनींच्या हिताचे संवर्धन करणे, हेच मी माझे प्रथम कर्तव्य समजेन.’’
नेताजींनी त्या दिवशी हिंदी बांधवांना बंडाच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन केले, साम्राज्यवादी ब्रिटिशांच्या विरोधात अखेरचा घनघोर रणसंग्राम होणार आहे त्यासाठी सिद्ध व्हा, असे खंबीरपणे सांगून प्रिय मातृभूमीला गुलामीतून मुक्त करण्यासाठी जीवनसंघर्ष सुरूच राहील, असे सांगून त्यांनी सैनिकांचे मनोबल वाढविले. देशासाठी लढण्याची तयारी असलेला प्रत्येक जण आझाद हिंद सेनेचा सैनिक होता, त्याला नेताजींनी अंतर दिले नाही. राणी झाशी रेजिमेंट ही महिलांची सैन्यतुकडी उभी केली. कॅप्टन लक्ष्मींनी त्याची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील राणीचे बलिदान वाया गेले नाही, इंग्रजांविरुद्ध लढण्यास अनेक लक्ष्मीबाई सज्ज झाल्या. त्या वेळी नेताजींच्या, रेडिओवरून ऐकलेल्या शब्दांनीदेखील हिंदुस्थानातील जनतेचे रक्त सळसळत असे. शब्दांची फेक उत्तम असली व अंतर्मनातील सत्य बोलण्यातून व्यक्त झाले, तर शब्द थेट काळजाचा ठाव घेतात. त्यातच आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला जपानच्या मंत्रिमंडळाने मान्यता देण्याची तार आली आणि आनंद द्विगुणित झाला. त्या वेळी असलेले सम्राट हिरोहितो व पंतप्रधान जनरल तोजो यांनी आझाद हिंद सरकारचे पंतप्रधान चंद्रा बोस यांचे अभिनंदन केले. त्यानंतर नेताजी टोकियोला गेले. तेथे त्यांचे पंतप्रधान म्हणून जंगी स्वागत झाले. जपानसह जर्मनी, इटली व नऊ राष्ट्रांनी आझाद हिंद सरकारला मान्यता दिली. नेताजींचे लक्ष मात्र जपानच्या मदतीने इंफाळ मोहीम यशस्वी करायची, याकडे लागले होते. इकडे सूडाने बेभान झालेले चर्चिल व माउंटबॅटन कुठल्याही थराला जातील, अशी तोजो यांच्याकडे बातमी होती, निर्णय होत नव्हता. नेताजींचा आपल्या सेनेवर प्रचंड विश्‍वास होता, त्यांची श्रद्धा, चिकाटी व आत्मविश्‍वास पाहून जपान प्रभावित झाले होते. त्याच वेळी हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार ‘किंग विदाउट किंगडम’ अशी नेताजींची खिल्ली उडवीत होते. ही गोष्ट मोठ्या चातुर्याने तोजोंसमोर मांडून नेताजींनी अंदमान व निकोबार बेटे आम्हाला द्यावी, अशी आग्रही मागणी केली. नेताजींची तयारी जोरात होती, प्रशासन राबविण्यास चलन हवे- त्यांनी नोटांचे नमुने तोजोंना दाखविले. त्यांची सरकार चालविण्याची तयारी पाहून तोजो अवाक् झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आशिया परिषदेचे काम सुरू झाले, त्यांच्या मुद्देसूद व अभ्यासपूर्ण बोलण्याने त्यांनी परिषदेत असणार्‍या सर्वांची मने जिंकली. सुभाषचंद्रांची धडाडी पाहून सगळे मित्रदेश प्रभावित झाले. या परिषदेत जपानने अंदमान व निकोबार बेटे भारताला परत केली अशी घोषणा केली, त्या वेळी कितीतरी वेळ सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होता.
रात्रीच्या पार्टीत तोजो सहज म्हणाले, एकदा हिंदुस्थान स्वतंत्र झाला तर चंद्रा बोस तेथील सर्वेसर्वा होतील. त्यावर नेताजी म्हणाले, माझ्या देशात कर्तृत्वाचे अनेक मेरुमणी आहेत, शिवाय स्वातंत्र्य मिळाल्यावर कोणाला निवडायचे, हा हिंदी जनतेचा अधिकार असेल. मी आजन्म देशाचा सेवक म्हणून कार्य करेल. आपल्या वागण्याने नेताजींनी जपानमध्ये हिंदुस्थानचा आदर उच्चकोटीला नेवून ठेवला होता. सम्राट हिरोहितो यांनी नेताजींची भेट घेतली व त्यांना सांगितले की, स्वातंत्र्ययुद्धातील सन्माननीय युद्धकैदी अंदमानच्या कारागृहात होते, त्यामुळे अंदमान तुमच्यासाठी पवित्र स्थळ आहे म्हणून जपानने त्यावरील हक्क आनंदाने सोडला. त्या वेळी नेताजींनी जपानचे मनापासून आभार मानले. जपानमधील हाबिया पार्क येथे नेताजींचा मोठा नागरी सत्कार करण्यात आला, त्या वेळी मैदान लोकांनी तुडुंब भरले होते. ज्या वेळी नेताजी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी इंफाळ हल्ल्याची तयारी करीत होते, त्या वेळी देशांतर्गत राजकारणात ब्रिटिश त्यांना बदनाम करण्याचे काम करीत होते. नेताजींच्या उद्देशावर ब्रिटिशांनी संशय घेतला, तो सर्वत्र पेरला, पण काही लोक वगळता भारतीय जनतेच्या मनात तो उगवला नाही. आता काही खरे नाही, हे ओळखून ब्रिटिशांनी भारतीय जनता नेताजींच्या संपर्कात येऊ नये यासाठी दडपशाही सुरू केली, माउंटबॅटन याने काही नेत्यांच्या मनात नेताजींच्या हेतूविषयी संशय पेरला आणि खेदाची बाब की, तो भरघोस उगवला. त्या वेळी नेहरू म्हणाले, सुभाष माझा सहकारी असला, तरी आता त्याचा व माझा मार्ग वेगळा झाला आहे, त्याने गैरमार्ग अवलंबिला आहे त्यामुळे जसे हिटलर, मुसोलिनी यांना माफ करता येणार नाही तसेच सुभाषबाबूंनी जपानच्या मदतीने हिंदुस्थानावर हल्ला केला तर माफ करणे कठीण आहे. सरळ हिटलर व मुसोलिनी यांच्या पंक्तीत नेताजींना बसवून काही लोक स्वार्थ साधण्यास सज्ज झाले. इकडे नेताजींना नेहरूंचे वक्तव्य ऐकून वाईट वाटले, पण त्यांनी वेळ दवडला नाही, आझाद हिंद सेना शहानवाझ खान यांच्यासह लवकरात लवकर इंफाळकडे निघेल, याची तयारी सुरू झाली.
आझाद हिंद सेना अत्यंत कठीण परिस्थितीत इंफाळच्या युद्धभूमीत पोहोचली, घनघोर युद्ध झाले, अनेक ठिकाणी ब्रिटिशांचा पराभव करून हिंदुस्थानाकडे कूच करत असलेल्या आझाद हिंद सेनेवर, सूडाने पेटलेल्या ब्रिटिश व अमेरिकन सैन्याने अत्याधुनिक शस्त्रांनी प्रचंड हल्ला केला. निसर्गाची साथ लाभत नव्हती, रसद कमी पडल्यामुळे सैन्याची उपासमार होत होती, साथीचे रोग पसरले, यामुळे सैन्याचे हाल होत होते, तरीही सगळ्यांचे लक्ष दिल्लीकडे लागले होते. त्या वेळी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण माघार घ्यावी लागली. अत्यंत वाईट वाटले. पण, जोपर्यंत भारतमाता मुक्त होत नाही तोपर्यंत हार मानायची नव्हती, पुन्हा नव्या दमाने तयारी सुरू झाली. अत्यंत वेदना सहन करून नेताजी अविरत परिश्रम करीत होते. त्यातच १८ ऑगस्ट १९४५ ला फार्मोसा द्वीपावर बॉम्बर विमान पडून नेताजींचा अपघात झाला, घात झाला, मायभूसाठी दिवसरात्र एक करणार्‍या महानायकाचा अंत विमानअपघातात झाला, अशी बातमी सर्वत्र पसरली. अपघात की घातपात, हे गूढ कायम असले तरी एक मात्र खरे की, यानंतर हिंदुस्थानचे लचके तोडण्यास सर्व सज्ज झाले. नेताजींचे वाढते वर्चस्व मान्य नसणारे अनेक स्वकीय आपल्याच देशात होते, त्या वेळी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हिंदुस्थानाला मुठीत कसे ठेवता येईल, यासाठी षडयंत्रं रचली जात होती. ब्रिटिशांच्या राज्यात ज्या माउंटबॅटनने क्रूरतेने अनेक वर्षे हिंदुस्थानचे लचके तोडले, तोच स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर झाला. यावरून जाणत्या माणसाने तर्क करावा की, त्या वेळी देशातील परिस्थिती काय असेल! ब्रिटिशांच्या अत्याचाराने ग्रस्त हिंदू जनता ज्या वेळी स्वातंत्र्याच्या जवळ पोहोचली त्या वेळी ब्रिटिशांनी तिचे तुकडे केले, हे सर्व अचानक घडून आले नव्हते. माउंटबॅटन याने आधीच म्हटले होते की, हिंदुस्थानला स्वातंत्र्य द्यावेच लागले, तर या हिंदुस्थानवर आडव्याउभ्या रेषा मारायच्या. त्याने शिताफीने काम सुरू केले, अनेक मोठे नेते त्या वेळी घडणारी फाळणी थांबवू शकले असते, परंतु हिंदुस्थानातील जनतेवर फाळणी लादून अत्यंत क्रूरतेने मजा पाहणार्‍या ब्रिटिशांचे मनसुबे यशस्वी झाले. ब्रिटिशांचे मनसुबे यशस्वी का झाले? याचे उत्तर आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, आता ते मान्य करायलाच हवे. शत्रूचे इच्छित पूर्ण होण्यास काही घटना, काही निर्णय, काहींचे वर्चस्व कारणीभूत असले, आज आपण ते मान्यही केले, तरी देशाचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे. हिंदुस्थानच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणार्‍या राष्ट्रपुरुषांना त्यांचा योग्य सन्मान देणे व पूर्वी झालेल्या चुका भविष्यात न करणे, इतकेच आपल्या हातात आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्लीचा अखंड ध्यास घेतला होता. तो सत्ताप्राप्तीकरिता नव्हता, तर जन्मभूमीला बंधनमुक्त करण्याकरिता होता. इतिहासाचे अध्ययन केले तर मनात विचारांचे जे काहूर माजले आहे ते निश्‍चितच सहजपणे क्षमते.
अडतीस कोटी जनतेच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जगात नेताजींनी मारलेली गरुडभरारी सर्वत्र चर्चिली जाते. अनेक देशांनी नेताजींच्या प्रेरणेने आपल्या देशात कार्य केले, त्यांचा गौरव केला. भारतात मात्र आझाद हिंद सेनेच्या सैनिकांवर लाल किल्ल्यात खटला चालला. त्या वेळी जनतेच्या भीतीने ब्रिटिशांनी माघार घेतली. कारण देशातील जनतेला सुभाषबाबूंच्या कार्याची महती कळली होती. शहानवाझ खान यांनी खटल्यादरम्यान सांगितलेले सत्य अजूनही देश विसरला नाही. अखिल जगाने नेताजींच्या कार्याचे महत्त्व जाणले, पण देशासाठी आयुष्य वेचणार्‍या नेताजींचा स्वतंत्र हिंदुस्थानात मात्र उचित सन्मान झालाच नाही.
२१ ऑक्टोबर या दिनाचे महत्त्व जाणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला व आझाद हिंद सरकारला मानवंदना दिली. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही घटना समस्त भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण भारतीय जनतेने त्या वेळीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर अतोनात प्रेम केले व आजही जनतेच्या मनात नेताजींचे अढळपद कायम आहे. त्या वेळी नेताजींचे सगळे प्रयत्न यशस्वी झाले असते, तर स्वतंत्र हिंदुस्थानचे चित्र काही वेगळे असते, हे मात्र निश्‍चित! स्वातंत्र्यासाठी सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले, सगळ्यांच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी उद्देश एकच होता, त्यातील अनेकांना योग्य सन्मान १९४७ पासून मिळत आला व काहींना सन्मान मिळण्यास वेळ लागला. नेताजींनी अनेकांना भारतीय म्हणून मायभूकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रदान केला. राष्ट्रहितासाठी जेव्हा एकत्र यायचे असते तेव्हा धर्म, जात याचे तसूभरही महत्त्व नसते, ही शिकवण त्यांनी आजन्म दिली. सशस्त्र क्रांती घडल्याशिवाय ब्रिटिश घाबरणार नाहीत, हे नेताजींनी जाणले व देशाच्या सीमा ओलांडून मोठे साम्राज्य निर्माण केले. त्यावेळच्या परिस्थितीत हे असामान्य काम होते. भारत पारतंत्र्याच्या विळख्यात असताना, परदेशात सशस्त्र सेना उभी करणे, हंगामी सरकार स्थापन करून त्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यास अनेक बलाढ्य देशांना तयार करणे, स्वतः तसूभरही विश्रांती न घेता सतत मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा ध्यास घेणे सोपे कार्य नव्हते. नेताजींच्या कार्याचा योग्य सन्मान भारताच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक बाब होती. कारण यातूनच युवा पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. सामान्य भारतीय नागरिक म्हणून आज एकच वाटते की, या महानायकाची दिल्लीतील लाल किल्ल्यावर झेंडा फडकविण्याची इच्छा ७५ वर्षांनी पूर्ण झाली. या शुभदिनी नेताजी सुभाषचंद्र बोस या महानायकाला सव्वाशे कोटी भारतीयांतर्फे कोटी कोटी नमन!

Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (32 of 794 articles)

Raf
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | गेल्या काही वर्षांपासून काही खासगी कंपन्याही यात यशस्वी झाल्या आहेत. ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ या ...

×