कर्नल प्रसाद पुरोहित यांना सशर्त जामीन

कर्नल प्रसाद पुरोहित यांना सशर्त जामीन

►मालेगाव बॉम्बस्फोट, नवी दिल्ली, २१ ऑगस्ट – २००८ च्या…

उडीद, मुगाच्या आयातीवर निर्बंध!

उडीद, मुगाच्या आयातीवर निर्बंध!

►मोदी सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा, नवी दिल्ली, २१ ऑगस्ट –…

भाजपाच्या ३५०+ रणनीतीला बळकटी

भाजपाच्या ३५०+ रणनीतीला बळकटी

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट – २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा…

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

ढाका, २० ऑगस्ट – बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम शेख हसिना…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मुंबई, २१ ऑगस्ट – काट्याची टक्कर आणि वर्चस्वाची लढाई…

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

►•खरीप पिकांच्या वाढीस फायदा ►धरणक्षेत्रातही संततधार, पुणे, २० ऑगस्ट…

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

मुंबई, १९ ऑगस्ट – गेल्या काही काळापासून दुर्लक्षित असलेले…

भारत – चीन खडाजंगी

भारत – चीन खडाजंगी

डॉ. प्रमोद पाठक | आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्तरावर…

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

संजय वैद्य | चीन वारंवार भारताला युद्धाच्या धमक्या देत…

स्वातंत्र्याचा अर्थ

स्वातंत्र्याचा अर्थ

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | ही मानसिकताच रोगट…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:46
अयनांश:
Home » आसमंत » आपली गुंतवणूक, ब्रेक्झीट आणि दोन स्पेशल

आपली गुंतवणूक, ब्रेक्झीट आणि दोन स्पेशल

रसार्थ : चन्द्रशेखर टिळक

brekxit-2-specialदोन स्पेशल. क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित  हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर गाजत आहे. किमान पाच सहा वेळा तरी पाहावे असेच हे नाटक आहे. हल्ली, पुनःपुन्हा जाऊन पाहण्यासारखी नाटकं मराठी रंगभूमीवर अभावानेच येतात आणि म्हणुनच या नाटकाचे विशेष महत्व आहे.गिरीजा ओक-गोडबोले आणि जितेंद्र जोशी यांचा अप्रतिम अभिनय, ह.मो.मराठे यांची तशी जुनी पण प्रभावी कथा आणि क्षितिज पटवर्धन यांचे तुफान लेखन असा हा संगम आहे. हे नाटक पाहायला मी एक मराठी नाट्यवेडा म्हणूनच गेलो होतो. परत परत ही नक्कीच जाईन. हे नाटक पाहताना मला प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे, आजपासून थोडं आधीच्या काळात घडलेली ब्रेक्झीट सारखी तात्कालिक घटना आणि आपल्या (तुमच्या-माझ्या) गुंतवणुकीसारख्या सार्वकालिक घटनांविषयी या नाटकाचे असलेले साधर्म्य. ब्रेक्झीट ही राजकीय-आर्थिक घटना, दोन स्पेशल आणि आपली गुंतवणूक या तीन गोष्टीत कमालीचं साम्य आहे, कसं ते तपशिलात सांगतो,
दोन स्पेशल हे नाटक नवीन असले तरी ते ज्या कथेवर आधारित आहे ती ह. मो. मराठे यांची कथा तशी जुनीच आहे.अगदी तसंच इंग्लंडने जरी युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याचा निर्णय (म्हणजेच ब्रेक्झीट) घेणे हा निर्णय जरी नवा म्हणजे २३ जून २०१६ च्या सार्वमतातून ठरला असला तरी इंग्लंडने युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याच्या चर्चेची कथा तशी जुनीच आहे. आणि तसंच, आपल्या सगळ्यांच्याच गुंतवणुकीची कथा ( मी रडकथा म्हटलेले नाही) ही तशीच जुनीच असते. आपण तसेच परत-परत तिथेच आणि तसेच नव्याने अडखळतो इतकेच.
या तीन घटकातले दुसरे साम्य म्हणजे हा निर्णय पुरूषी राजवटीत झाला असला तरी त्याला महिला वर्चस्वाची भक्कम पार्श्‍वभूमी आहे. नाटकाची आणि कथेची नायिका जशी वेळेवर भेटत नाही, न सांगता निघून जाते अशा नायकाच्या भावावस्थेतून जसे हे नाटक घडते; अगदी तसेच ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये सहभागी होण्यास सुरुवातीच्या काळात मार्गारेट थॅचर यांच्या पंतप्रधान पदाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत प्रचंड विरोध झाला होता. त्यातूनच ब्रिटन युरोपियन युनियनमध्ये सहभागी झाला तरी त्याचे पौंड – ीींशीश्रळपस हे चलन स्वतंत्र राहील अशी तडजोड झाली. स्वाभिमानी जर्मनी आणि त्यांच्या पोलादी पंतप्रधान अँजेला मार्केल यांना हे मनोमन मान्य असणे कठीणच होते. त्यामुळेच तर सार्वमतानुसार विभक्त होण्याचा निर्णय अंमलात आणण्याचे इंग्लंडने ठरवले तरी त्यासाठी त्यांना दोन वर्षांची मुदत आहे. पण तेवढा वेळ इंग्लंडने घेऊ नये अशीच जर्मनीची भूमिका आहे. असे सार्वमत घेण्याची घोषणा इंग्लंडचे आता भूतपूर्व पंतप्रधान डेविड कॅमरून या पुरूष पंतप्रधानांची. सार्वमत घेतलेही गेले त्यांच्याच कारकिर्दीत. पण त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मात्र आली आहे ब्रिटनच्या नवीन महिला पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर.
आपली गुंतवणूकही कौटुंबिक कारणाने घडत आणि बिघडत असते. घरच्या तिजोरीत धन नवरा – बायको दोघेही आणत असले तरी त्या तिजोरीच्या चाव्या बहुतेक घरात घरातील स्त्रीच्या हातातच असतात. त्या जास्त जबाबदारीने घर चालवतात, चालवू शकतात असा समाजशास्त्रीय सिध्दांत आहे. ( हे वाक्य नीट वाचायचे हं… मी समाजशास्त्रीय असे म्हणले आहे ; समज-शास्त्रीय असं मी लिहिलेलं नाही.) आपल्या महाराष्ट्रात अनेक दशकांपूर्वी रोजगार हमी योजना सुरू झाली (आजची बहुचर्चित मनरेगा योजना यावर आधारित आहे), तेव्हा त्या कामगारांचा पगार घरातील स्त्रीच्या हातात द्यावा अशीच तरतूद होती. कारण स्त्री घर चालवता-चालवताच शिक्षण-आरोग्य यासाठीही हातचं राखते अशी त्यामागची कारणमीमांसा होती. लाल बहादूर शास्त्रींच्या पत्नी ललितादेवी यांनी शास्त्री यांच्या तुटपुंज्या पगारातूनही बाजूला काढून ठेवलेल्या रकमेचा मेसेज व्हॉट्‌सऍपवर किती फिरत असतो. ही परिस्थिती देशभर मध्यमवर्गीय आणि निम्नमध्यमवर्गीय घरांत सार्वकालिक असते.
तिसरे साम्य म्हणजे आपल्या आजबाजूच्या माणसांचा न आलेला अंदाज. नाटकाच्या नायिकेला आपल्या बहिणीच्या मनोवृत्तीचा, सिनेमात जाण्याच्या झपाटलेपणाचा नेमका अंदाज येत नाही. त्यामुळे स्वतःच्या वडिलांना अंधारात ठेवत ती बहिणीच्या घर सोडून पळून जाण्याच्या निर्णयाला साथ देते. पण नाटकाच्या नायिकेचा हा अंदाज चुकतो आणि बहिणीच्या आयुष्याची वाताहत लागते. ब्रेक्झीटबाबत सार्वमत घेण्याची घोषणा आधी करतांना आणि नंतर ती अंमलात आणताना डेविड कॅमरून यांचाही अंदाज असाच चुकला. सार्वमत सरकारच्या विरुद्ध जाईल असं त्यांनाच काय, कदाचित (‘कदाचित’ इतका दुसरा धोकादायक शब्द कदाचित मराठीत अन्य नसावा) ब्रेक्झीटच्या समर्थकांनाही वाटले नसावे.
आपली गुंतवणूक करताना याहून काही वेगळं होतं का? तेव्हा तर स्वतःचाच स्वतःला किती वेळा यथायोग्य अंदाज असतो हाच तर मूळ प्रश्‍न असतो. आणि हे  कदाचित असं नसतं ना हो ! नेहमीच तर नाहीच नाही.
चौथे साम्य म्हणजे निर्णय घेतला कोणी आणि भोगावे लागले कोणाला? तसेच घटनेनंतर मालकी कोणाकडे गेली? घर सोडून पळून जाण्याचा निर्णय कथा आणि नाटकातील नायिकेच्या बहिणीचा. भोगावे लागले नायिकेला आणि मालकी गेली नायिकेच्या नवर्‍याकडे आणि नोकरी देणार्‍याकडे. यात बिचार्‍या नाटकाच्या नायकाचे काय? ब्रेक्झीटमधेही झाले आहे तसेच. सार्वमताचा निर्णय डेविड कॅमरून यांचा. सार्वमत जिंकले नायजेल फराजने. तो निर्णय अंमलात आणण्याआधीच या दोघांनीही राजीनामे दिले. त्यामुळे आता जबाबदारी नवीन पंतप्रधान थेरेसा मे यांची. भोगायचे सर्वसामान्य जनतेनी, इंग्लंडमधल्याही आणि युरोपमधल्याही.
आपल्या गुंतवणुकीला हा प्रकार अपरिचित थोडाच आहे? काय उद्देशाने आपण गुंतवणूक करतो आणि प्रत्यक्षात पदरी काय पड़ते हे तर सोडाच; पण अनेकदा एखाद्या गुंतवणुकीतून झालेला फायदा त्याच किंवा दुसर्‍या चांगल्या गुंतवणुकीच्या संधीत गुंतवण्याऐवजी आधीच्या एखाद्या गुंतवणुकीत झालेल्या नुकसान-भरपाईतच असा फायदा जातो. दोन्ही गुंतवणुकी आपल्याच असल्या तरी  कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे  हा स्वानुभव असतोच ना ! तसेच अजूनही एक गोष्ट गुंतवणुकीबाबत असतेच. अगदी कितीही काळजीपूर्वक गुंतवणूक केली तरी ! ती गोष्ट म्हणजे आपण गुंतवणुकीच्या साधनाचा किंवा त्या प्रवर्तकाचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ बघून निवड करत असतो ; पण आपल्याला त्यापासून वर्तमानकाळ आणि भविष्यात उत्पन्न हवे असते. अंदाज चुकण्यात हाही घटक असेलच ना !
या तीन गोष्टीतले पाचवे साम्य याच नाटकातील एका संवादात सांगितले आहे. सवयी आणि परिस्थिती या दोन वेगळ्या गोष्टी असतात. ब्रेक्झीटचा निर्णय जेव्हा खरंच अंमलात येईल तेव्हा इंग्लंड आणि इतर युरोपीय जनतेला याचा नक्कीच अनुभव येईल. कारण थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ४३ वर्ष इंग्लंड युरोपियन युनियनचा सभासद आहे. चलनाचे विलिनीकरण झाले नसले तरी व्यक्ति-माल-वस्तू यांची अनिर्बंध देवाण- घेवाण विनासायास सुरू होती. इंग्लिश विद्यापीठात प्रवेश ते नोकरी अशा अनेक बाबतीतील आजपर्यंतच्या सवयी आता परिस्थितीनुसार सगळ्यांनाच बदलाव्या लागतील.
आपण आपली गुंतवणूक परिस्थितीनुरुप की सवयीनुसार करत असतो हा प्रश्‍न माझाच मला विचारण्याचे धाडसच कधीही होत नाही. ‘हे योग्य नाही’ अशी पश्‍चात्‌बुध्दी मात्र असंख्य वेळा होतं असते आणि निदान त्या क्षणाला तरी सवय आणि परिस्थिती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे पटत असत, कळत असत, वळत मात्र काही कधी नाही. कारण होत असं असतं की परिस्थितीनुरुप सवय बदलण्याऐवजी आपण आपल्या सवयीत परिस्थितीला बसवायच्या प्रयत्नात असतो.
यातले सहावे साम्यही याच नाटकातील अजून एका वाक्याने सांगता येईल. नाटकात नायिका तिच्या ऑफीसचे एक काम करून घेण्यासाठी नायकाच्या ऑफीसमधे येते. तिथे अचानक अनेक वर्षानंतर नायक – नायिका एकमेकांच्या आमनेसामने येतात. तत्वनिष्ठ नायक असले काम करणार नाही, याचा नायिकेला पूर्ण अंदाज येतो. पण परिस्थितीमुळे तिचाही नाईलाज असतो. तेव्हा ती नायकाला सांगते की तुलाही कॉम्प्रोमाईज करायला लागू नये आणि मलाही मॅनेज करायला लागू नये असं काहीतरी व्हायला हवे. जागतिक अर्थकारण आणि राजकारण प्रत्यक्षात ज्याप्रमाणे घडते आणि ज्या तर्‍हेने सर्वसामान्यांना सांगितले जाते, त्याचं यापेक्षा जास्त समर्पक शब्दांत वर्णन करताच येणार नाही. आहे फक्त इतकेच की नाटकात तशी घटना घडते. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र सहसा नाही ना होत तसं !
गुंतवणुकीबाबत तर असं होण्याची सुतरामही शक्यता नाही. नसतेच बिलकूल. कारण या क्षेत्रात,‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ असे काहीही नव्हते, नाही आणि नसेल. या क्षेत्राचा ‘हरी’ असला ‘भारी’ आहे की तो तर असलेले खाटलेही काढून घेईल. (अलिकडच्या काळातील ‘‘खाट पे चर्चा…’’ )
या तीन गोष्टीतले सातवे साम्यही याच नाटकातील अजून एका वेगळ्या विधानाने मांडता येईल. या नाटकाची नायिका स्वतःचा भूतकाळ आणि वर्तमान स्पष्ट करतांना नायकाला सांगते, ज्याला भूतकाळात सोडून आले, त्याच्या हाती आपला भविष्यकाळ ठरवण्याचे आधिकार द्यायला लागावे असा कोणाचाही वर्तमानकाळ असू नाही. ब्रेक्झीटलाही हे तंतोतंत लागू पडत नाही का?
पण गुंतवणुकीत हेच होतं असते. खरं म्हणजे, हेच करायचे असते. भूत – वर्तमान – भविष्य या आयुष्याच्या तीनपायी शर्यतीत अडथळा-शर्यत खेळावयाचा प्रसंग मुळातच कोणावरही ओढवला जाऊ नाही; आणि ओढवलाच तर निदान होता होईल तितका सुसह्य व्हावा म्हणून तर गुंतवणूक करायची असते. नाटकात असणारे हे वाक्य अजूनही एका अर्थाने आपल्या गुंतवणुकीला, आपल्या गुंतवणूक विषयक सवयींना लागू पडत असते. या ना त्या कारणाने आपण तरुणपणतच नियमीत गुंतवणूक करत नाही. काहीवेळा इच्छा होत नाही; तर कधी इच्छा होऊनही सवड मिळत नाही. अशा अर्थाने गुंतवणूक करण्याच्या संधीला आपण भूतकाळात सोडून आलेलो असतो. पण जसजसे आपण वयाने वाढत जातो, तसतसे त्याबाबत आपण केलेली गफलत अस्वस्थ करत राहते. हा आपला वर्तमानकाळ असतो. आणि आपल्या भविष्याची चिंता आपल्या वर्तमनाला कुरतडत राहाते. आणि त्याच्याच हातात ते असते.
आपली गुंतवणूक, दोन स्पेशल हे मराठी नाटक आणि ब्रेक्झीटही जागतिक राजकारण व अर्थकारण यातली एक महत्वाची घटना यात असणारे आठवे साम्य म्हणजे या नाटकात वर्तमानपत्र ऑफीसचे नेपथ्य उभे करतांना मधोमध एक बांबूचा आधार दाखवला आहे . लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे काहीही म्हटले, त्याचा इतिहास कितीही गौरवास्पद असला तरी आजची या क्षेत्राची सर्वांगीण नाजूक परिस्थिती या बांबूतून समोर येत राहाते. ब्रिटनचा इतिहासही कितीही गौरवास्पद असला तरी आजचे त्यांचे स्थान जागतिक अर्थकारण व राजकारणात असेच तकलादू आहे का हा प्रश्‍नही आहेच ना !
आपल्या उतरत्या काळात, अडचणीच्या काळात आपली हीच गुंतवणूक बांबू म्हणून नाही तर आधार म्हणून उपयोगी पडेल. हे जमवले नाही, तर मात्र दुसर्‍याच्या आधाराचा बांबू स्वीकारावा लागल्याची शक्यता बळावत जाते.
सरतेशेवटी, दोन स्पेशल या नाटकाला जशी एका वर्षात १६ पारितोषिके मिळाली तशीच आपली गुंतवणूक यशस्वी असणार का?
अर्थात, ते पूर्णपणे आपल्याच हातात आहे असं नाही हे जरी मान्य केले तरी ती यशस्वी होण्यासाठी आपण किती प्रयत्न करत राहतो हेही महत्वाचे असतेच असते.  यश हे प्रयत्नांती असते; निव्वळ वाच्यान्ती नव्हे हे लोकमान्य टिळक यांचे सूत्र याबाबत आवर्जून आचरणात आणण्यावाचून दुसरा काहीही, कोणताही पर्यायच नाही .
ब्रेक्झीटबाबत काय बोलावे?

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under आसमंत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत (660 of 670 articles)


राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन पाकिस्तानने चिथावल्याने चिनी ड्रॅगनने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. चीनने तिबेटमध्ये ‘ब्रह्मपुत्रा’ नदीची उपनदी ...