ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:

आर्य आक्रमणाची थाप!

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

Old India Map

Old India Map

हरयाणातील राखीगढी येथे गेली चार वर्षे पुरातत्त्व उत्खनन सुरू होते. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उत्खनन आणि संशोधनातून एक अत्यंत महत्त्वाची बाब वैद्यानिक पुराव्यासह समोर आली आहे. ही बाब म्हणजे, आर्य नामक कोणतीही जमात भारताबाहेरून आलेली नव्हती. या उत्खननात मिळालेल्या जीवाश्मांचे कोरियन शास्त्रज्ञांच्या मदतीने डीएनए विश्‍लेषण केल्यावर ही बाब समोर आली की, तेथील नमुने हे मध्य पूर्व आशिया वा जगातील अन्यत्र कुठल्याही भागातील नसून भारतीय वंशांचेच आहेत. या संशोधनाने मानववंशशास्त्राच्या क्षेत्रात फार मोलाची भर टाकली असून गेली कित्येक वर्षे हेतुपुरस्सर पद्धतीने आम्हा भारतीयांच्या माथी मारलेला इतिहास धादांत खोटा होता, हे आता सिद्ध झाले आहे.
‘आर्य नावाची कोकेशियस पर्वतावरील एक जमात मध्य आशियाच्या मार्गाने भारतात आली; हे आर्य लोक आले आणि त्यांनी इथल्या प्राचीन संस्कृतीवर आक्रमण केले आणि तिचा नाश केला. पुढे त्यांनी ऋग्वेद नामक ग्रंथाची निर्मिती केली आणि मग अन्य वेदही रचले. कालांतराने हे लोक संपूर्ण भारतात पसरले आणि येथील मूलनिवासींना त्यांनी देशोधडीला लावले. त्यांचे हक्क हिरावून घेतले, शिक्षण नाकारले, त्यांच्यावर आक्रमणे करून स्वतःची संस्कृती त्यांच्यावर लादली. हे होत असताना दक्षिणेकडील द्रविडवंशीय लोकांनी मात्र त्यांना कट्टर प्रतिरोध केला. त्यामुळेच आर्यांचे आक्रमण मर्यादित राहिले आणि त्यांनी आणलेला आर्य सनातन धर्मही सर्वत्र पसरला नाही.’ अशी आर्य आक्रमण सिद्धांतांची मांडणी थोड्याबहुत फरकाने सर्वत्र आढळते. डॉ. शिंदे यांच्या मतानुसार, ब्रिटिशांनी हा सिद्धांत भारतीय समाजात फूट पाडण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक पेरला. प्रत्यक्षात मात्र ही केवळ भूलथाप असून, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, हेच आता राखीगढी येथील उत्खननातून सिद्ध झाले आहे.
संस्कृत भाषेनुसार विचार करता, आर्य व द्रविड या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असून, ‘सभ्य व्यक्ती’ अशा अर्थाने दोन्ही शब्द उपयोगात आणलेले दिसतात. हे दोन्ही शब्द म्हणजे प्रत्यक्षात जमाती वा वंश असून त्यांच्यात काही वैरभाव होते, असे कोणतेही संदर्भ संस्कृत वाङ्मयात आढळत नाहीत. असे असताना ब्रिटिशांनी रुजवलेले हे रोपटे आज इतक्या मोठ्या वृक्षात रूपांतरित कसे झाले? या प्रश्‍नाचे उत्तर शोधायचे झाल्यास, त्यामागे देश तोडणार्‍या विघातक शक्तींचा हात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. भाषाशास्त्रानुसार भारतामध्ये बोलली जाणारी दुसरी दोन प्रमुख भाषा कुटुंबे म्हणजे द्रविड आणि ऑॅस्ट्रिक होत. यांतील द्रविड भाषाकुल हेच भारताचे मूळ भाषाकुल असून, आर्यांनी या भाषा बोलणार्‍या जनसमूहाला संपवून टाकले वा त्यांच्यावर अत्याचार केले, अशी लोणकढी थाप मारत द्रविड अस्मिता जन्माला घातली गेली. केवळ ही अस्मिता स्वतंत्रपणे जन्माला आली असे नसून, त्या अनुषंगाने तथाकथित आर्य असलेले उत्तरेतील लोक, त्यांची भाषा आणि पुढे जाऊन तर हिंदू धर्म यांनाही या फोडाफोडीच्या राजकारणापायी लक्ष्य केले गेले. विशेषकरून तामिळनाडूमधील राजकीय पक्ष आणि त्यांनी सतत लावलेला द्रविड अस्मितेचा धोशा पाहता ही बाब आजही स्पष्टपणे दिसते. दक्षिण भारत वगळता अन्यत्र कित्येक ठिकाणी आर्य म्हणजे तथाकथित सवर्ण म्हणजेच ब्राह्मण, असा गैरसमज रुजवून त्या अनुषंगाने ब्राह्मण समाज हा उपरा असल्याचे सांगत, या समाजाला विविध प्रकारे नामोहरम करण्याचे प्रयत्न कित्येक व्यक्ती वा संघटना यांच्यामार्फत पद्धतशीरपणे होऊ लागले. आज या विध्वंसाची फळे सातत्याने समोर येत आहेतच. हे सारे द्वेषाचे आणि सूडाचे राजकारण ज्या आर्य आक्रमण आणि आर्यांचे परदेशी असण्याच्या गृहीतकावर उभे होते, ते गृहीतक किती कच्चे आहे, हे सिद्ध करण्यास २०१८ साल उजाडावे लागावे, यासारखे दुर्दैव नव्हे! खरेतर या सार्‍या आक्रमणाच्या सिद्धांतातला फोलपणा कोणी योग्य वेळेत ओळखला असेल तर ते होते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! ’थहे ुशीश ींहश र्डीवीरी?’ (शूद्र कोण होते?) या लेखनातून आर्यांच्या आक्रमणाचे गृहीतक खोटे असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. (महाराष्ट्र शासन प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन-भाषणांचे संग्रहित ग्रंथ, खंड सातवा) कौटिलीय अर्थशास्त्र, महाभारत शांतिपर्व असे प्राचीन ग्रंथांतील दाखले देत डॉ. आंबेडकरांनी या सिद्धांताचा फोलपणा दाखवून दिला आहे. याच लेखमालेत डॉ. आंबेडकर लिहितात, ‘आर्य भारतात बाहेरून आले आणि त्यांनी भारतावर आक्रमण केले, या सिद्धान्ताला काहीही पुरावा नाही.’ ते पुढे असेही मत नोंदवतात की, ‘आर्य आक्रमणाचा सिद्धान्त एक काल्पनिक सिद्धान्त आहे. त्याच्यासाठी पाश्‍चिमात्य विद्वानांचा एक पूर्वग्रह कारणीभूत आहे. तो पूर्वग्रह असा की, एक आर्य नामक वंश आहे आणि त्या आर्य वंशाचे सर्वात ‘शुद्ध’ प्रतिनिधी हे जर्मन लोक आहेत. स्वाभाविकपणे त्यांचे मूळ उगमस्थान युरोपजवळ कुठेतरी असावे. मग यावरून एक प्रश्‍न उद्भवतो की, या आर्यांची भाषा भारतात कशी आढळते? याचे उत्तर म्हणजे हे आर्य भारतात बाहेरून आले असले पाहिजेत. त्यामुळे हा आर्य आक्रमणाचा सिद्धान्त रचण्याची आवश्यकता भासली.’
आमच्याकडील दूषित हेतूच्या काही विद्वानांनी मात्र या सार्‍या अभ्यासपूर्ण विवेचनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आणि आर्य-आर्येतर असा खोटा वाद निर्माण केला. लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे, एकीकडे जेमतेम सत्तर वर्षांपूर्वीपर्यंत ज्यांचे अत्याचारी राज्य या देशावर होते ते ब्रिटिश वा तत्पूर्वी अन्याय्य राज्य करणारे मुघल किंवा वांशिकदृष्ट्या त्यांच्याशी साधर्म्य राखणार्‍या वंशसमूहाबद्दल काहीही विपरीत मत न मांडता उलट त्यांचे सातत्याने कौतुक करणार्‍या या दुष्प्रवृत्ती आर्य आक्रमणाचा खोटा इतिहास रेटत तथाकथित सवर्ण वा टीचभर लोकसंख्या असलेल्या समूहाला मात्र मारा-कापाची भाषा करत असतात. या प्रवृत्तींना भारतीय समाजाने भारतीय म्हणून एकत्र उभे रहायला नको असल्यानेच त्यांचे समाजात फूट पाडण्याचे असे अविरत प्रयत्न सुरू असतात. मात्र, राखीगढी उत्खननातून आर्य नामक कोणतीही जमात बाहेरून आली नव्हती, हे सत्य पुराव्यांसह आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनांती समोर आल्याने या भारत तोडो टोळीच्या उद्देशांना सुरुंग लागला आहे, हे निश्‍चित!

Posted by : | on : 19 Aug 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (419 of 1136 articles)

Sharad Pawar Sonia
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | साठ सत्तर वर्षे देशाची सत्ता उपभोगणारे पक्ष व राजकीय नेतेच अशा समाजघटकांच्या मागासलेपणाला जबाबदार ...

×