ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक » इतरांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविणारा कपिल शर्मा

इतरांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविणारा कपिल शर्मा

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

सुवर्णमंदिरामुळं विश्‍वविख्यात असलेल्या अमृतसर येथे २ एप्रिल १९८१ रोजी एका साधारण कुटुंबात कपिल शर्माचा जन्म झाला. कपिलचे वडील पोलिस खात्यात हेडकॉन्स्टेबल होते. त्यामुळं कपिलचं लहानपण पोलिस मुख्यालयातच गेलं. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कपिलनं एफा फोन बूथवर पार्ट टाईम नोकरी केली. महाविद्यालयातील कला अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असला तरी फी भरणं शक्य नसल्यानं कपिलनं अतिरिक्त उत्पन्नासाठी रंगभूमीवर काम सुरू केलं.

Kapil Sharma

Kapil Sharma

इतरांना कोणत्याही प्रकारे दु:ख देणं किंवा रडवणं खूप सोप्पं आहे आणि ते कुणालाही जमू शकतं. परंतु, दु:खी, निराश लोकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवणं तेवढंच कठीण असतं आणि जीवनात पराभूत झाल्याच्या मानसिकतेत असलेल्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवल्यामुळेच कॉमेडी किंग कपिल शर्मा एक मोठा सेलिब्रिटी झाला आहे. इतरांना हसविण्याची अफलातून क्षमता असलेल्या कपिल शर्माचा इथपर्यंतचा प्रवास सहज, सोपा असेल असं वाटत असेल तर थोडं थांबा. कपिलचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर आहे आणि फिनिक्स पक्ष्याप्रमाणं त्यानं राखेतून झेप घेतली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ‘कॉमेडी नाईट वुईथ कपिल’च्या माध्यमातून तो घराघरात पोचला. क्षमतेनं तुम्ही जग जिंकू शकता, यावर विश्‍वास असलेल्यांसाठी कपिल खर्‍या अर्थानं रोल मॉडेल आहे. त्यानं जे यशोशिखर गाठलं आहे त्यामुळेच फोर्ब्ज इंडियाच्या अव्वल १०० सेलिब्रिटिजच्या यादीत त्यानं वरचा क्रमांक पटकावला होता. आज तो थोडा निराशेच्या गर्तेत गेला असला तरी लवकरच त्यातून बाहेर पडेल अशी आशा करू या!
सुवर्णमंदिरामुळं विश्‍वविख्यात असलेल्या अमृतसर येथे २ एप्रिल १९८१ रोजी एका साधारण कुटुंबात कपिल शर्माचा जन्म झाला. कपिलचे वडील पोलिस खात्यात हेडकॉन्स्टेबल होते. त्यामुळं कपिलचं लहानपण पोलिस मुख्यालयातच गेलं. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पॉकेट मनीसाठी कपिलनं एफा फोन बूथवर पार्ट टाईम नोकरी केली. महाविद्यालयातील व्यावसायिक कला अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असला तरी फी भरणं शक्य नसल्यानं कपिलनं अतिरिक्त उत्पन्नासाठी रंगभूमीवर काम सुरू केलं. यादरम्यान अनेक महाविद्यालयांनी कपिलमध्ये असलेली प्रतिभा अचूक हेरली. त्यामुळं विविध युवा महोत्सवांमध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करण्याच्या मोबदल्यात शिष्यवृत्ती देण्याचे प्रस्ताव त्याच्याकडे येऊ लागले.
सुमारे दशकभर रंगभूमीवर संघर्ष केल्यानंतर मनोरंजन उद्योगाकडून कपिलला ऑफर्स येऊ लागल्या. त्यावेळी कपिल कोणतंही मानधन न घेता काम करत असे. याच काळात कपिलच्या वडिलांचं कर्करोगानं निधन झालं आणि कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्याच्यावर आली. असाच संघर्ष करत असताना २००४ मध्ये २४ व्या वर्षी कपिलला एमएच-१ या पंजाबी वाहिनीवरील ‘हसदे हंसादे रहो’, या कार्यक्रमातून पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर २००७ साली ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या तिसर्‍या हंगामासाठी अमृतसर येथेच घेण्यात आलेल्या ऑडिशनमध्ये कपिलला नाकारण्यात आलं. परंतु, यामुळे जराही खचून न जाता कपिल दुसर्‍यांदा ऑडिशनसाठी दिल्लीला गेला आणि त्याला सेकंड टाईम लकी ब्रेक मिळाला. त्याची शो साठी निवड झाली असं नव्हे, तर २६ व्या वर्षी तो चक्क या शोचा विजेता ठरला. २००७ साली या शोचा विजेता ठरलेल्या कपिलनं जिंकलेल्या ९९ रिअ‍ॅलिटी शोपैकी हा एक होता. हा शो जिंकल्याबद्दल त्याला १० लाख रुपयांचा रोख पुरस्कार मिळाला होता आणि त्यावेळी त्याच्यासाठी ही रक्कम खूप मोठी होती.
यामुळं कपिलला खूप प्रसिद्धी मिळाली आणि २००८ साली कपिलनं ‘छोटे मियाँ’, ‘झलक दिखला जा सिझन-६’, ‘उस्तादो के उस्ताद’, यामध्ये हजेरी लावण्यासह ‘कॉमेडी सर्कस’, हा शो जिंकून आपल्यातील प्रतिभेची चुणूक दाखवली. गोड गळ्याचा धनी असलेल्या कपिलनं २००१ साली झी टीव्हीवरील ‘स्टार या रॉकस्टार’, या शोमध्ये वाईल्ड कार्डनं प्रवेश करून आपली गायन कलाही सादर केली. गायक होण्याचंच स्वप्न कपिलनं लहानपणापासून उराशी बाळगलं होतं. परंतु, नशिबाला ते मंजूर नव्हतं आणि आपल्यासाठी यापेक्षाही काहीतरी मोठं वाढून ठेवलं आहे, याची त्याला जराही कल्पना नव्हती.
२०१३ साली वयाच्या ३२ व्या वर्षी कपिलनं के-९ हे स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस लॉन्च केलं आणि ‘कॉमेडी नाईट्स वुईथ कपिल’, हा शो त्यानं सादर केला. त्याच्या या शोनं छोट्या पडद्यावरील सर्व विक्रम मोडले आणि त्याला दहा हजारांपेक्षा जास्त टीव्हीटीज मिळाल्या. २०१३ सालीच कपिल शर्मानं एका वर्षात साडेचार हजार कोटींची कमाई केली. परंतु, खडतर प्रवास करून यश संपादन केल्यानंतर २५ सप्टेंबर २०१३ हा कपिल शर्माच्या बहारदार कारकीर्दीतील एक काळा दिवस ठरला. मुंबईच्या गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये कपिलनं उभारलेला कोट्यवधींचा सेट जळाला आणि त्याची राखरांगोळी झाली. त्या उजाड सेटकडे बघताना कपिल भावनाविवश झाला होता. मात्र, या परिस्थितीतही खचून न जाता कपिलनं तात्पुरत्या सेटवर शोचं शूटिंग केलं आणि दुसर्‍या बाजूला मित्र व शुभचिंतकांच्या मदतीनं नवा सेट उभारला.
कपिल शर्माच्या कार्यक्रमात नियमितपणे हजेरी लावणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण व कपिलला २०१३ साली मनोरंजन उद्योग क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सीएनएन-आयबीएन इंडियन ऑफ द इयर पुरस्कारानं गौरविण्यात आलं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं त्याला दिल्लीचा बॅ्रण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं. यशराज फिल्म्सच्या चित्रपटातून तो मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार होता. परंतु, त्यानं तो चित्रपट सोडून दिला. फोर्ब्ज इंडियानं २०१३ साली निवडलेल्या शंभर सेलिब्रिटिजच्या यादीत कपिल ९३ व्या स्थानावर होता. परंतु, २०१४ मध्ये त्यानं थेट ३३ व्या स्थानावर झेप घेतली. इकॉनॉमिक टाईन्सनं २०१५ मध्ये कपिलला भारतातील सर्वात प्रसिद्ध व विख्यात व्यक्तिमत्त्वांच्या यादीत स्थान दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी कपिल शर्माचं नामांकन केलं. त्यानं ते स्वीकारून उल्लेखनीय काम केलं. त्यामुळंच तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याला राष्ट्रपती भवनात निमंत्रित केलं.
कपिल मनोरंजन क्षेत्रात गेल्या आठ-दहा वर्षांपासून ब्रेक न घेता काम करत होता. सध्या त्याचं काम थांबलं असलं तरी एवढ्या कमी कालावधीत कपिलनं यशाचं शिखर गाठलं असल्यानं असंख्य लोकांचा तो प्रेरणास्रोत आहे. कपिलची जिद्द आणि कठोर परिश्रमामुळेच त्यानं कोणतीही पृष्ठभूमी नसताना किंवा गॉड फादर नसताना बॉलीवूडच्या चकाकत्या दुनियेत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. स्टॅण्ड अप कॉमेडियन ते छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व इथपर्यंतचा प्रवास करताना कपिलनं अनेकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळंच कपिलचा आत्मविश्‍वास, प्रतिभा आणि संयमाला सॅल्युट करण्याची इच्छा होते. कपिलपासून अनेक लोक प्रेरणा घेऊन यशस्वी जीवन जगतील, अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. •••

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (500 of 1288 articles)

Modi Notebandi
अर्थपूर्ण : यमाजी मालकर | नोटबंदीचे भारताला जे अनेक फायदे दीर्घकाळ होणार आहेत, त्यात सर्वात विलक्षण फायदा असेल तो सर्वसामान्य ...

×