ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, रत्नाकर पिळणकर, स्तंभलेखक » उत्सवी गाणी घरातली, दारातली

उत्सवी गाणी घरातली, दारातली

॥ चित्रपटल : रत्नाकर पिळणकर |

Ganesh Dj

Ganesh Dj

हिंदी सिनेमा मनोरंजक आणि अगदी सर्वसामान्य, तळागाळातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं कारण त्यांच्या जीवनातील, त्यांना अतिप्रिय असणार्‍या सणांचं प्रतिबिंब, नाट्यमय पद्धतीने आपल्या सिनेमातून दिसत असतं. सिनेमातील पडद्यावर चित्रित केलं जाणार्‍या कथानकातून बर्‍याचदा जनतेची सुख-दु:ख आपण पाहतो. या कल्पनेतील पात्रांची नाती आणि त्यांचं आपसातील प्रेम स्पष्ट व्हावं म्हणून खास गाण्यांचं आयोजन केलं असतं. सामाजिक चित्रपटात तर अशा गाण्यांना सणांची, धार्मिक उत्सवाची जोड दिली जाते. आपला हिंदू धर्म देशातील सर्व राज्यांमध्ये विखुरलेला आहे. भाषा आणि वेशभूषा ही प्रत्येक धर्माची वेगवेगळी ओळख आहे. ती प्रादेशिक चित्रपटातून दिसून येतेच. परंतु, जगातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचं दुसरं काम हिंदी सिनेमा अनेक वर्षांपासून करीत आला आहे. आपल्या हिंदू संस्कृतीच खरी ओळख आहे आपले सण. आपल्या सणांना पुराणकथांचा आधार आहे. त्या युगातील देव-देवतांची पूजाअर्चा याच संस्कारांचा भाग आहे आणि अनेक चित्रपटांतून अधूनमधून या देवदेवतांची स्तुतीगीतं तसेच त्यानिमित्ताने दाखल होणार्‍या सणांची मनोरंजक गाणी प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्याचं फार मोठं काम करीत असतात. हीच गाणी नंतर घरोघरी गायली जातात. गल्लोगल्ली वाजवली जातात, ज्यातून फार मोठा व्यवसाय होतोच. परंतु, आपल्या धर्माचा ‘बरा-वाईट’ प्रसारही होत असतो. या गाण्यांचा दर्जा खरंच आपल्या संस्कृतीला, प्रथेला, परंपरेला साजेसा आहे का? असतो का? या गाण्यातील शब्द, आशयांचा विचार कधी आपण केला आहे का?
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आता गणपतीचं महात्म्य वर्णन करणारी पारंपरिक गाणी उत्सवाच्या मंडपातून तर वाजतीलच. परंतु, भल्यामोठ्या स्पीकर्समधून ‘डीजे’ नावाचा आधुनिक आवाज या गीतांना अशाप्रकारे रस्त्यावर आणेल की ‘सण नको पण डीजे आवर’ अशी आपली अवस्था होईल. नुकत्याच होऊन गेलेल्या जन्माष्टमीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण तो अनुभव घेतलाच आहे. कृष्णाच्या गोकुळात दहीकाला उत्सव हा अशाप्रकारेच चालत होता का? वाहिन्यांनी आपल्याला जे जे दाखवलं, ते अत्यंत किळसवाणं, ओंगळ आणि अत्यंत हिडीस असं दृश्य होतं. धर्मही आता राजकीय पक्षाच्या ताब्यात गेला आहे ही आपल्या धर्माची, संस्कृतीची शक्ती नव्हे तर राजकीय संधीसाधूंनी केलेला धर्माचा अपमान आहे त्यामुळे सिनेमावालेही आता खास त्याच उद्देशाने आपलं संगीत निर्माण करू लागले आहेत, जे रस्त्यावर मिरवणुकीतून वाजलं गेलं पाहिजे, गायलं गेलं पाहिजे, या दुष्टचक्राचे बळी आपले सण ठरू लागले आहेत.
‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’, ‘मेरे भैय्या मेरे चंदा मेेरे अनमोल रतन’, ‘फुलोंका तारोंका सबका कहना है’, ‘ये राखी बंधन है ऐसा’, ‘राखी धागों का त्योहार,’ अश बहीण-भावांची गायलेली गाणी सिनेमातून सार्वजनिक जीवनात लोकप्रिय होऊ लागली. या गाण्यातील शब्दांचं पावित्र्य जर खरंच कुणाच्या लक्षात आलं असतं तर आज स्त्रिया, मुली, बालिकांवर होणारे अत्याचार, बलात्कार थांबले असते. परंतु, केवळ सणाची शोभा वाढविण्यापुरती ही गाणी वाजवली जातात. परंतु, त्याचा अर्थ कुणी लक्षात घेत नाहीत.
‘गोविंदा’च्या टोळ्या याही वर्षी तशाच जल्लोषात निघाल्या. नियम कायद्यांचं उल्लंघन करून हा सण साजरा झाला. त्यात ‘ब्लफ मास्टर’ मधील शम्मी कपूरचं पारंपरिक गाणं वाजलं तसच, ‘ओ माय गॉड’मधील प्रभुदेवा, सोनाक्षी सिन्हाच्या ‘गो गो गोविंदा’ या गाण्यावरील तालावर नाचून काही जणांनी हंड्या फोडल्या. ‘शोर मच गया शोर देखो आया माखन चोर’ ‘भगवान’ चित्रपटातील हे गाणं नेहमीप्रमाणेच आघाडीवर होतं. ‘मच गया शोर सारी नगरी मे’ वाजताना त्यावर नाचणारे बच्चनसाहेबांसारखेच ‘तर्र’ होते. सिनेनिर्मात्यांचा उद्देश या उत्सवाच्या निमित्ताने नक्कीच सफल झाला आहे. अशा शेकडो गाण्यांचा उल्लेख आज करता येईल. या अशा गाण्यांसाठी मुद्दामहून चित्रपटात प्रसंग निर्माण केले जातात कारण या प्रसंगामुळे नाट्य आणि थराराचा मिलाफ साधता येतो.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आता पुन्हा एकदा, सिनेमातील गणेशोत्सव गीतांनी घातलेला धुमाकूळ आपल्याला पाहता येईल. ना धड भक्तिगीत, ना भावगीत अशा ‘रागात’ अडकलेल्या या हिंदी गणेशोत्सव गीतांचा अभ्यास करता असं लक्षात येतं की ही गाणी समूह नृत्याला अनुसरूनच निर्माण केली जात आहेत. ज्या ज्या सिनेमात या प्रकारच्या गाण्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्या प्रसंगात दुश्मनी, दोन टोळ्यांमधील वैर, एकमेकांवर मात करण्यासाठी रचलेल्या खेळी आणि यातील गाण्यावर नाचणारे ‘भक्त’ हे बहुधा ‘सूडनृत्य’ करण्यासाठीच नाचत असावेत की काय असे वाटते. फार पूर्वी ‘अंकुश’ चित्रपटातील गणेशोत्सवाच्या दोन मिरवणुका समोरासमोर उभ्या ठाकतात आणि त्यांच्यामध्ये पहला मान पुढे जाण्याचा कुणाचा यावरून तंटा निर्माण होतो. त्या सिनेमातील हा प्रसंग वास्तवातही घडू लागला. मिरवणुकीच्या जमावात तलवारी घेऊन घुसलेले गुंड नंतर पोलिसांचा पाठलाग असे दृश्य बर्‍याच चित्रपटांतून दिसत होते. ‘वास्तव’ चित्रपटात ‘संजय दत्त’ आरती करत असताना अंतरा म्युझिकमध्ये पोलिस अंडरवर्ल्डच्या गुंडांची धरपकड करीत असतात. गणेशोत्सवाचे हे असे रूप अनेक चित्रपटांतून आपल्या पाहण्यात आले असेल. ‘अग्निपथ’चा रिमेक असलेला ऋतिक रोशनच्या ‘अग्निपथ’मधील देवा श्रीगणेशा’ या गाण्याच्या वेळेही याच प्रकारे हिंसाचार घडतो. ‘डॅडी’ सिनेमातील ‘आला रे आला गणेशा, कोई देवा कहे कोई चिंतामणी’, या गणेशोत्सवातील गीतालाही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे. ‘देवा हो देवा गणपती देवा, हमसे बढकर कौन’ हाही गुन्हेगारीपट त्यातही तोच प्रकार. ‘डॉन’चा रिमेक असलेल्या शाहरुख खानच्या ‘डॉन’मध्ये शाहरुख खान गणपतीसमोर आधी पाण्याच्या गुळण्या करून घसा स्वच्छ करतो आणि गळ्यात बेंजो लटकवूनच तो वाजवत गाणं म्हणतो ‘तुझको जलवा दिखाना होगा, लौटके तुझको आना होगा’, आता हे तो कुणाला उद्देशून म्हणतो? हे सिनेमा पाहतानाच तुम्हाला कळेल. ‘टक्कर ’ सिनेमात जितेंद्र संजीवकुमार गणपतीसमोर नाचतात तेव्हा त्यांच्या गाण्यांचे शब्द असतात, ‘मूर्ती गणेशकी अंदर दौलत देशकी’ याचाच अर्थ हा कुणाला तरी इशारा असावा. ‘जुडवा’ सिनेमाचा रिमेक असलेल्या ‘जुडवा-२’ मध्ये गणपतीसमोर नाचून गाणं म्हणताना ‘वरुण धवन’ म्हणतो ‘सुनो गणपती बाप्पा मोरया, परेशान करे मुझे छोरीया’ याला भक्तिगीत म्हणायचं का? ‘हॅलो ब्रदर’मधील सलमान खान, राणी मुखर्जीचं एक गाणं या उत्सवासाठी चित्रित केलं आहे त्याचे शब्द आहेत ‘चांदी की डाल पर सोने का मोर….’ दही हंडी उत्सवातील हे गीत खास ‘टपोरी’ पोरांसाठी. ही आमची हिंदी सिनेमातील सणांची गाणी.
दिपावली, दसरा, नवरात्रौत्सवातील गरबा लवकरच येऊ घातला आहे. त्यातही सिनेमातील गाणी ‘रिमिक्स’ करून वाजवली जातील. गरब्यासाठी पैसा ज्या प्रकारे उधळला जाईल ते पाहून आज महागाईविरुद्ध आकांत तांडव करणार्‍या पक्षांना एक प्रश्‍न विचारता येईल की, ‘दाखवा गरिबी कुठे आहे?’ सर्वसामान्य माणूस सिनेमाचे दर वाढले तरीही सिनेमाला गर्दी गरतोच आहे. स्वत:ला आनंदी राखण्यासाठी तो सिनेगीतातील धडधडत्या तालावर बेफाम नाचतो आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून मिरवणुका निघत आहेत, डीजे दणाणतो आहेत, मंडप उभारले जात आहेत. मूठभर लोकांच्या विरोधाला कोण जुमानणार? तेच संगीताचं आहे, मंडपातील आरती भ्रष्ट होऊ नये, घरातील गणपतीचं पावित्र्य नष्ट होऊ नये, रस्त्यावरचं संगीत घरात येऊ नये इतकेच!

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, रत्नाकर पिळणकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, रत्नाकर पिळणकर, स्तंभलेखक (499 of 1288 articles)

Kapil Sharma
अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | सुवर्णमंदिरामुळं विश्‍वविख्यात असलेल्या अमृतसर येथे २ एप्रिल १९८१ रोजी एका साधारण कुटुंबात कपिल शर्माचा जन्म ...

×