ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अजय देशपांडे, आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक » उस्ताद विलायत खाँ उर्फ नाथ पिया

उस्ताद विलायत खाँ उर्फ नाथ पिया

॥ कलारंग : अजय देशपांडे |

मुगलांच्या शासनात शास्त्रीय संगीताची साधना करणार्‍या विशेषतः उत्तरेतील अनेक हिंदू कलाकारांना बळजबरीने इस्लाम कबूल करावा लागला होता. स्पष्ट शब्दांत सांगायचे ठरल्यास यातील अनेक मुगल शासकांना आपले शास्त्रीय संगीत आवडत असे. पण, कलाकार मुस्लिम लागत असत. त्यामुळे या घराण्यांमध्ये संस्कार नेहेमी आपले सनातनच. अशाच एका मुगल राजदरबारात दाखल होतो, इटावा (जे आग्रा-लखनौ रोडवर स्थित आहे) येथील एक क्षत्रिय निपुण कलाकार-सरोजन सिंह! असं म्हणतात की, हे सरोजन सिंह उस्ताद विलायत खान यांच्या घराण्यातील मूळ पुरुष होते.

Ustad Vilayat Khan

Ustad Vilayat Khan

आपल्या दैवी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला हजारो वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. हा वारसा टिकवण्याकरिता अनेक उत्तुंग कलाकारांचे यात प्रचंड योगदान आहे. शास्त्रीय गायनाचे घराणे असत, जे आपापल्या परीने संगीताचा अर्थ लावत असत. त्याचं ‘इंटरप्रिटेशन’ करीत असत आणि पुढच्या पिढीला हे ज्ञान सुपूर्द करीत असत. वाद्यांना देखील आपला स्वतःचा इतिहास आहे. त्यातही अनेक घराणी असत. काळाप्रमाणे मूळ वाद्यांत देखील अनेक बदल घडवण्यात आले. परंतु, हे सर्व करताना संगीतातील शुद्धता किंवा रंजकता किंवा अन्य सर्व बाबी या महान विभूतींनी टिकवल्या. ओरिजिनॅलिटी ‘बरकरार’ ठेवली. आजचा लेख अशाच एका साधकाबद्दल ज्यास, इमदादी-इटावा घराण्याची अनेक वर्षांची समृद्ध सांगितीक परंपरा लाभलेली, ज्याला आपण ओळखतो ‘आफताब-ए-सतार’-उस्ताद विलायत खान या नावाने. त्यांना लाभलेली संगीताची उमज अद्वितीय म्हणावी लागेल. जोड, आलाप, झाला या पारंपरिक सतार वादनात तर ते निपुण होतेच. परंतु, सतारीला गायकी अंगानी वाजवून सतार वादनाच्या या पैलूला अलौकिक स्थान मिळवून दिलं.
मुगलांच्या शासनात शास्त्रीय संगीताची साधना करणार्‍या विशेषतः उत्तरेतील अनेक हिंदू कलाकारांना बळजबरीने इस्लाम कबूल करावा लागला होता. स्पष्ट शब्दांत सांगायचे ठरल्यास यातील अनेक मुगल शासकांना आपले शास्त्रीय संगीत आवडत असे पण कलाकार मुस्लिम लागत असत. त्यामुळे या घराण्यांमध्ये संस्कार नेहेमी आपले सनातनच. अशाच एका मुगल राजदरबारात दाखल होतो, इटावा (जे आग्रा-लखनौ रोडवर स्थित आहे) येथील एक क्षत्रिय निपुण कलाकार-सरोजन सिंह! असं म्हणतात की, हे सरोजन सिंह उस्ताद विलायत खान यांच्या घराण्यातील मूळ पुरुष. त्यांच्या मुलाचे (बद्दू सिंह) धर्मपरिवर्तन होऊन तो तुरब खान झाला. तुरब खानचा मुलगा होता साहेबदाद खान, जो साहेब सिंह या नावाने देखील सुप्रसिद्ध होता. साहेब सिंह गायन, सारंगी, सुरबहार व जलतरंग यात प्रवीण होते. त्यांचे सुपुत्र म्हणजे इमदाद खान, जे इंदोरच्या होळकर संस्थानिकातील राजकलाकार. असे म्हणतात की इमदाद खान सतारीशिवाय पखवाज, रबाब, सूरबहार, सारंगीत देखील निष्णात होते. सतारीत तोडा, तुकडा, झाला, दुहेरी झाला, लाग-दाट, गतकारी इत्यादी त्यांनी सर्वप्रथम रुजवली व लोकप्रिय केली. भारतातून सतार वादनाची पहिली रेकॉर्ड त्यांच्या नावे होती, जी १९०४ साली प्रकाशित झाली. तीन मिनिटांचा राग सोहोनी छेडला होता, त्यात इमदाद खान यांनी. इमदाद खान यांच्या नावावर त्यांच्या घराण्याचं नाव पडलं, एवढा प्रतिभावान हा कलाकार. संगीताप्रति संपूर्ण समर्पण. अशा इमदाद खान यांचे नातू म्हणजे विलायत खान. विलायत खान यांचे वडील इनायत खान, जे नाथ सिंह नावाने देखील ओळखले जात असत. अध्यात्मिक उंची प्राप्त झालेला विद्वान गायक. धृपद गायकीचा अंगीकार केला व महादेवाच्या भक्तीत लिन होत संगीताची आराधना करीत असत. अशा घराण्यात विलायत खान यांचा जन्म गौरीपूर, पूर्व बंगाल येथे २८ ऑगस्ट १९२२ ला झाल्याचे सांगितले जाते. आईकडून देखील संगीताची अशीच दांडगी पार्शवभूमी त्यांना लाभलेली. श्रेष्ठ संगीत उपासक बंदे हुसेन खान यांची ती कन्या. विलायत खान यांच्या १४-१५ व्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाला. त्याकाळी सतार, सूरबहार, रुद्र वीणा इत्यादी वाद्यांसोबत विलायत खान गायनाचे देखील धडे घेत असत. वडिलांच्या अकाली मृत्यूपरांत मात्र आईच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या काकांकडून केवळ सतारीवरच लक्ष केंद्रित केलं, गायन सोडलं.
१९४०-४१ साली म्हणजे त्यांच्या वयाच्या १८-१९ व्या वर्षी त्यांची सतार अक्षरशः ‘गायला’ लागली. पुढील ५०-६० वर्षे ते रसिकांवर अगदी निर्विवाद राज्य करणार होते. ज्याला आपण इंट्रिकेट म्हणतो अशा गुंतागुंतीच्या देखील ताना घ्यायला लागली होती. गायनातील त्यांचे आदर्श फैयाज खान, करीम खान, वाहिद खान, आमिर खान यांच्या गायकीचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव असल्याने सर्वप्रथम या स्वर-योग्यांच्या गायकीतले सूक्ष्म, रंगतदार पैलू त्यांनी आत्मसात केले व ते त्यांच्या सतार वादनातून हुबेहुब उतरवत असत. प्रचंड स्वरसाधना असे त्यांची. उजव्या व डाव्या हातांतील त्यांचा समन्वय वाखाणण्याजोगा होता. समतोल भासत असे, त्यामुळे साहजिकच त्यांच्या वादनात एक कन्टीन्युइटी किंवा सातत्य निर्माण होत असे. सतारीच्या तंतूंवरचं त्यांचं प्रभुत्व अभूतपूर्व होतं, त्यामुळे त्यांची सतार नेहमीच कमालीच्या ताना घेत राहिली. त्यांची बैठक म्हणजे एखाद्या क्षत्रिय वीर पुरुषासारखी असे. एकाग्रता कमालीची. सतार हातात घेतली की रसिकांना ठणकावून सांगत असत की शांतता हवी मला. त्याचे कारण ते देत असत की, माझी सतार खालच्या पट्टीतही गाते, आवाज झाल्यास तुम्हीच मुकाल या पैलूचा आनंद घेण्यास. माझे ज्येष्ठ मित्र व पद्मभूषण ज्ञान प्रकाश घोष यांचे शिष्य श्री इंद्रजित बॅनर्जी सांगतात, खांसाहेब आपला जीव ओतून सतार वाजवीत असत. वेळेची मर्यादा त्यांना मंजूर नव्हती. सतारीतील त्यांच्या अनोख्या मुरक्या म्हणजे रसिकांकरिता मेजवानी असे. रसिकांची उत्स्फूर्त दाद निघणारच आणि त्यांच्या एखाद्या लाजवाब हरकतीवर रसिकांची दाद मिळाली की ते स्मित हास्य देत असत आणि त्यांची सतार अजून खुलत असे. द्रुत लयीतील त्यांचा झाला हा एक असाच दैवी अनुभव जो त्यांनी रसिकांना अनेक वर्ष सातत्याने दिला. सुरांची ‘वर्षा’ कशाला म्हणावी, हे अनुभवायास असल्यास रसिकांनी विलायत खान यांना आवर्जून ऐकावं आणि ते देखील परत-परत.
श्री इंद्रजित बॅनर्जी पुढे सांगतात, की उस्ताद विलायत खान दर वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी कलकत्त्यातील पार्क सर्कस येथील त्यांच्या नातेवाईकांकडे मुक्कामास येत असत आणि कधी-कधी तर अगदी १०-१५ दर्दी रसिकांच्या उपस्थितीत अनौपचारिक बैठकी देखील ते करत असत. अशा अनेक बैठकी बॅनर्जीच्या नशिबी आल्या. खांसाहेबांची आणखी एक खासियत असे, ती म्हणजे ते स्वतः मेहफिलीत गात देखील असत. आकाशवाणीशी त्यांचं फार सुरुवातीलाच बिनसल्याने आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर त्यांचे अनेक वर्षे रेकॉर्डिंग होऊ शकले नाही. साधारणतः १९८५-८६ नंतर त्यांनी आकाशवाणी व दूरदर्शनसाठी परत सतार वादन सुरू केले. सुदैवाने त्यांनी एचएमव्हीसाठी मात्र अनेक रेकॉर्डिंग्स केले. एचएमव्हीनी त्यांच्या अनेक रेकॉर्डस् प्रकाशित केल्या. त्यांच्या यमन व दरबारी कानडाच्या २ एलपी रेकॉर्डस्नी सर्व विक्रम मोडून काढले. त्यांनी सत्यजित रे यांच्या ‘जलसाघर’ नावाच्या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलंय. शबाना आझमी अभिनीत ‘कादंबरी-१९७५’ नावाच्या चित्रपटातील आशाबाईंचं ‘अंबर की एक पाक सुराही’ हे अमृता प्रीतम लिखित गीत खूप लोकप्रिय झालं, पण खरं ऐकावं त्या चित्रपटातील लाजवाब बॅकग्राऊंड म्युसिक. एचएमव्हीला देखील राहवलं गेलं नाही आणि त्यांनी केवळ विलायत खान यांच्या बॅकग्राऊंड संगीतावर एक एलपी प्रकाशित केली, जी देखील लोकांनी हातोहात झेलली. फिल्मी ग्रामोफोन रेकॉर्ड्सच्या इतिहासात हे असे अनोखे उदाहरण असावे, ज्यात केवळ बॅकग्राऊंड संगीतच आहे, विलायत खान यांच्यातल्या संगीतकाराला एचएमव्हीने दिलेला हा मानाचा मुजरा.
समकालीन म्हंटलं की, तुलना होणारच व त्यातून व्यावसायिक स्पर्धा ही निर्माण होतंच असते. तसाच काहीसा प्रकार विलायत खान व रविशंकर यांच्यातही होत गेला. दोघांची ही प्रतिभा अफाट. दोघांच्या सतार वादनाच्या शैली देखील भिन्न असत. सतारीचे ‘ट्यूनिंग’ देखील ते निराळ्या पद्धतीने करत असत. विलायत खान यांची ट्यूनिंग गंधार पंचम पद्धतीची होती तर रविशंकर यांची षड्ज पंचम पद्धतिची. कलाकार म्हणून अनेक रसिक विलायत खान यांना उजवे ठरवत असत, हे ही सत्य आहे. विलायत खान यांनी भारतात सतार लोकप्रिय केली तर रविशंकर यांनी जागतिक पातळीवर असे थोडक्यात म्हणता येईल. रविशंकर फार पूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. १९८० च्या दशकात विलायत खान देखील अमेरिकेतच स्थायिक झाले आणि आपल्या शैलीचा प्रचार प्रसार पाश्‍चिमात्य देशात देखिल केला. विलायत खान नियमितपणे भारतात येत असत आणि रसिकांना रिझवत असत. सुप्रसिद्ध तबला वादक किशन महाराज यांच्या उल्लेखाशिवाय विलायत खान यांचा लेख अपूर्ण राहणार. कित्येक मेहफिली या दोघा दिग्गजांनी ‘यादगार’ केल्या आहेत आणि तेही अनेक वर्षे मुंबई, पुणे, कलकत्ता, पाटणा, दिल्ली, इंदोर, हैदराबाद या शहरांमध्ये त्यांचे नियमित कार्यक्रम होत असत. आपल्या विदर्भात देखील त्यांचे अनेक कार्यक्रम होत असत, याचा उल्लेख मी जुन्या पिढीतील अनेक रसिकांच्या तोंडून ऐकला आहे. लंडन मध्ये त्यांचे अनेक चाहते असत, जे त्यांना नेहमीच कार्यक्रमांसाठी बोलवत असत. समता प्रसाद, अल्ला रखा यांनी देखील अनेकदा त्यांची तबल्यावर संगत केली आहे. बिस्मिल्ला खान व अली अकबर खान (सरोद) यांच्या बरोबरही त्यांचे अनेकदा जुगलबंदीचे कार्यक्रम होत असत. विलायत खान यांनी मात्र कोणताही सरकारी मान-सन्मान स्वीकारला नाही. १९६४ साली पद्मश्री, १९६८ साली पद्मभूषण आणि २००० साली त्यांना पद्मविभूषण सम्मान जाहीर झाला पण त्यांनी हे सर्व पुरस्कार नाकारले. कुठेतरी, कसलीतरी सल होती त्यांच्या मनात. त्यांनी अनेक शिष्य घडवले. त्यातील प्रमुख नावं आहेत पद्मभूषण अरविंद पारेख, हृषीकेश मुखर्जी यांचे बंधू – काशिनाथ मुखर्जी, बिमल मुखर्जी, कल्याणी रॉय इत्यादी. पारेख १९४४ पासून खांसाहेबांचे शागिर्द झाले जे अगदी खांसाहेबांच्या मृत्यू (२००४) पर्यंत राहिले. श्रीमती कल्याणी रॉय या भारतातील पहिल्या स्त्री सतार वादक. आजचे सुप्रसिद्ध सतार वादक शुजात खान त्यांचे चिरंजीव तर रईस खान पुतणे. रईस खानला त्यांनी सतार शिकवली, स्वतंत्र ओळख मिळवून दिली. विख्यात संगीतकार मदन मोहन उस्ताद विलायत खान यांचे अत्यंत जवळचे मित्र. विलायत खान यांच्या शिफारशीवरून मदन मोहन यांच्या ऑर्केस्ट्रात रईस खान साधारणतः १९६४ कडे रुजू झाला. दुर्दैव असं की हाच रईस खान जेव्हा १९८५-८६ साली कराचीला कायमस्वरूपी स्थलांतरित झाला. कराचीत दाखल झाल्याबरोबर तो विलायत खान यांनी मला कधीच सतार शिकवली नाही असे म्हणत सुटला तसेच मदन मोहन सारख्या गुणी, प्रतिभावान संगीतकारा बद्दलही उलटसुलट बरळत सुटला. संस्कार बदलले होते त्यानी आता. या गोष्टीचं शल्य मात्र विलायत खान यांना नेहमीच राहिलं. मात्र पैशाची चणचण भासली की हा ‘उस्ताद’ भारतीय रसिकांच्या पैशावर ‘रईस’ होण्याकरिता पाकिस्तानातून इथे नेहमी येत राहिला. इंदोर घराण्याचे अर्धव्यू उस्ताद आमीर खान विलायत खान यांच्या बहिणीचे यजमान.
विविध मेहफिलीतील विलायत खान यांच्या अनेक रेकॉर्डिंग्स त्यांच्या चाहत्यांनी सुरक्षित ठेवल्या आहेत. यमनला ते रागांचा राजा म्हणत असत, त्यामुळे ते अनेकदा यमन प्रस्तुत करत असत किंबहुना रसिक देखील फरमाइश करीत असत. दरबारी, मालकौंस, हमीर, बागेश्री, मुलतानी, बहार, हंसध्वनी, सोहोनी, तिलक कामोद, मारवा, मिया की मल्हार इत्यादी अशा अनेक रागांच्या बेमिसाल रेकॉर्डिंग्स आहेत ज्या बर्‍यापैकी उपलब्ध देखील आहेत. काही राग देखील त्यांनी रचले. आपल्या जीवनातील साडे सात दशक त्यांनी संगीताला समर्पित केले. भगवंताने मला संगीत-सेवेकरिताच जन्म दिला, यानंतर मला मोक्ष किंवा मुक्ती मिळणार, असे ते हमखास म्हणत असत. याच भावनांना प्रतिबिंबीत करणारी एक सुरेख बंदिश त्यांनी रचली (लिहिली) होती, या बंदिशीनेच या लेखाचा शेवट करतोय्. त्यांच्या आध्यात्मिक उंचीचा परिचय यातून वाचकांना सहज व्हावा.
‘एक ओर मोहे पिया बुलाए दूजे पिहर
युंही आमन-गामन मे बिती उमरिया……़ ’

Posted by : | on : 19 Aug 2018
Filed under : अजय देशपांडे, आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अजय देशपांडे, आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक (574 of 1287 articles)

College Students Dance In Flash Mob
अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | तरुणाईवर नुसते आरोप करूनही चालायचे नाही. त्यांना एका सूत्रात बांधून दिशा देण्याची जबाबदारी समाजातील सर्व ...

×