ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » एकदिवस ही वेळ येणारच होती!

एकदिवस ही वेळ येणारच होती!

॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |

Maratha Reservation Protest Got Violent

Maratha Reservation Protest Got Violent

एक दिवस ही वेळ येणारच होती, तशी ती आली आहे. संपत्ती आणि रोजगाराच्या वितरणाची व्यवस्था जर उभी केली नाही, तर श्रीमंत माणसांना आपल्या बंगल्याभोवतीची कुंपणे अधिक उंच करावी लागतील तसेच स्वत:च्या संरक्षणाची जबाबदारी स्वत:च घ्यावी लागेल, असे देशातील टोकाच्या विषमतेविषयी म्हटले जात होते. जणू त्याचीच प्रचिती मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात आली. गेल्या ९ ऑगस्टला जे राज्यव्यापी आंदोलन झाले, त्यात हिंसाचार झाला. मराठा समाजाच्या आतापर्यंतच्या आंदोलनात असा हिंसाचार झाला नव्हता. लाखा लाखाचे मोर्चे शांततेत आणि शिस्तीत पार पडले होते.
९ ऑगस्टला पुण्याजवळील चाकण आणि औरंगाबादजवळील वाळूज औद्योगिक वसाहतीत मोठा हिंसाचार झाला. या आंदोलनाला नेतृत्व नव्हते. हा हिंसाचार कोण करते आहे, हे पोलिसांच्या लक्षात येण्याआधीच आंदोलनकर्त्यांनी काही कंपन्या फोडून त्यांचे अतोनात नुकसान केले होते. आता जी माहिती समोर येते आहे, त्यानुसार कमी वेतन आणि कामावरून अचानक कमी केलेल्या कामगारांनी या आंदोलनाचा फायदा घेऊन मालकांवर सूड उगविला आहे, असे लक्षात येऊ लागले आहे. याचा दुसरा अर्थ असा की, कामगारांच्या मनात चीड निर्माण झाली होती. हे सर्व कामगारच होते, हे अजून अधिकृत जाहीर झालेले नाही, पण ते आंदोलनकर्तेही नव्हते. एका बातमीत असे म्हटले आहे की, कंपनीत काही दुर्घटना घडली तर कामगारांना बाहेर पडता यावे म्हणून कंपनीला दोन मीटरपेक्षा अधिक उंचीचे कुंपण घालता येणार नाही, असा डेव्हलपमेंट कंट्रोलचा एक नियम आहे. पण हा नियम आता बदलला जाणार असून कंपनी आता त्यापेक्षा उंच कुंपण बांधू शकतील. याचा अर्थ असा काही कलह होण्याची वेळ आलीच तर संरक्षण होण्यासाठी कुंपण उंच करण्याची वेळ आली आहे तर..!
मुद्दा केवळ मराठा आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचा नाही. दर चौरस किलोमीटरला सरासरी ४२५ माणसे जेथे राहतात, अशा १३४ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात टोकाची विषमता अशीच वाढत राहिली तर काय होऊ शकते, यासंबंधीचा परिस्थितीने दिलेला हा इशारा आहे. प्रश्‍न आहे, देशात ठिकठिकाणी होणार्‍या भावनिक उद्रेकांचा. व्यवस्था आपल्याला संरक्षण देऊ शकत नाही म्हणून नागरिक पुन्हा जातीधर्मातच संरक्षण शोधत आहेत आणि याचा अर्थ भविष्याची दारे उघडली जात नसल्याने इतिहासात उत्तरे शोधण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरू झाले आहेत. खरे म्हणजे ही परिस्थिती बदलण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे संपत्तीचे आणि रोजगाराचे न्याय्य वाटप केले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. उद्योग व्यवसायांचा विकास व्हायचा असेल तर त्या विशिष्ट भागात शांतता नांदली पाहिजे. ती नसेल आणि उद्योग वाढीसाठीच्या सर्व गोष्टी असतील तरी विकास होऊ शकत नाही, याचा अर्थ संपत्तीच्या निर्मितीइतकेच शांततेला महत्त्व आहे. वाळूज आणि चाकणच्या उद्योजकांनी सरकारकडे शांतता आणि संरक्षणाची मागणी केली आहे. उद्योजक म्हणून ते बरोबरच आहे, पण समाज आणि देशाकडे यापुढे असे तुकड्या तुकड्याने पाहता येणार नाही, हेही देशातील उद्योजक आणि व्यावसायिकांना समजून घ्यावे लागणार आहे.
संपत्ती वितरणाचा सर्वात खात्रीचा मार्ग आहे, तो देशाचे सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्याला श्रीमंतांच्या दबावातून बाहेर काढणे. ते तसे स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागले की बहुजनांच्या हिताचा विचार करू शकते. ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याला त्याचा हक्काचा आणि पुरेसा महसूल मिळाला पाहिजे. असा महसूल जेथे मिळतो, अशा युरोपीय देशात करांचे जीडीपीतील वाट्याचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत आहे. स्वीडन, बेल्जियम, नॉर्वे, स्वित्झर्लंड ही त्याची काही चांगली उदाहरणे. भारतात हे प्रमाण आहे कसेबसे १५ टक्के. याचा अर्थ आपल्या देशाच्या करव्यवस्थेत आमूलाग्र बदल करावा लागेल. अलीकडे जीएसटी आणि नोटबंदीमुळे सरकारचा महसूल वाढला, हे खरे असले तरी तो अजूनही पुरेसा नाही. शिवाय ही करवसुली भीती दाखवून केली जाते आहे, तशी ती अपेक्षित नसून ती सोपी आणि सुटसुटीत असली पाहिजे. (अर्थक्रांतीने सुचविलेला बँक व्यवहार कर ही अशी करपद्धती आहे.) संपत्ती वितरणाचा दुसरा मार्ग म्हणजे प्रत्येकाला बँकिंगचे फायदे मिळाले पाहिजेत. स्वातंत्र्याचा ७० वर्षांत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत बँकिंग का पोचले नाही, याचा विचार झाला पाहिजे. गेली चार वर्षे प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून ३२ कोटी नागरिकांपर्यंत बँकिंग पोचले आहे, ही अतिशय चांगली गोष्ट असून त्यातून आर्थिक सामिलीकरण वेगाने होऊ शकते. जे विकसित देश मानले जातात, त्या सर्व देशांत जवळपास १०० टक्के बँकिंग आहे. त्यामुळे तेथे पैसा सतत फिरत राहतो. तो सर्वांना अतिशय कमी व्याजदरात म्हणजे अगदी २ ते ३ टक्के दराने वापरण्यास मिळतो. तसे आपल्या देशात बँकिंगच्या मार्गानेच होऊ शकते. बँकिंग वाढले पाहिजे, यासाठी अलीकडे सरकार करत असलेले प्रयत्न यासाठी महत्त्वाचे आहेत.
संपत्तीच्या वितरणाइतकाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे तो रोजगारांच्या वितरणाचा. जास्तीतजास्त नागरिकांच्या हातांना काम मिळालेच पाहिजे. ते मिळाल्याशिवाय ते स्वाभिमानी जीवन जगू शकत नाहीत. आता तर इतके यांत्रिकीकरण होते आहे की ते लाखो हातांना बेरोजगार करू लागले आहे. सरकारला पुरेसा महसूल मिळत नसल्याने सरकारी नोकर्‍या कमी होत आहेत. त्यात भर पडली आहे ती ऑटोमेशनची. त्यात तर माणसांची गरजच राहणार नाही. ऑटोमेशनची ही लाट सर्वच क्षेत्रात येते आहे, त्यामुळे खासगी क्षेत्रातील रोजगार संधीही कमी होणार आहेत. रोजगार कमी होत असताना सर्वच क्षेत्रात उत्पादन मात्र वाढते आहे. ही विसंगती दूर करण्याचा काही मार्ग आहे का? तो मार्ग अर्थक्रांतीचा पुरवणी प्रस्ताव सांगतो. तो म्हणजे आठ तासांऐवजी आता सहा तासांचीच शिफ्ट असली पाहिजे आणि सर्व देश दोन शिफ्टमध्ये चालला पाहिजे. या बदलामुळे रोजगाराच्या संधी एकदम दुप्पट होतील. त्याही संघटीत क्षेत्रात. त्यातून उत्पादन आणि सेवा वाढतील, ज्याद्वारे देशाचा जीडीपीही वाढेल. बाजारात नवे ग्राहक तयार होतील आणि अर्थव्यवस्था गतिमान होईल. भारताला ही मोठी संधी यासाठी आहे की आपल्याकडे प्रचंड मनुष्यबळ आहे, ते आपण चांगल्या पद्धतीने वापरले पाहिजे. लोकसंख्याच नाही म्हणून सर्वत्र यंत्र वापरण्याचा मार्ग युरोपने अंगिकारला, तो आपला मार्ग कधीच होऊ शकत नाही. ज्यांच्या हाताला काम नाही, ज्यांच्या हातातील काम हिसकावून घेतले जाते, त्यांच्या हातात दगड येण्यास वेळ लागत नाही, हे मराठा आंदोलनात पाहायला मिळालेच आहे. त्यामुळे भांडवलासाठी जशी आर्थिक तरतूद करावी लागते, तशी ती मनुष्यबळासाठीही करावी लागेल, हे सरकार आणि खासगी उद्योजकांना लक्षात ठेवावेच लागेल. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे, त्यावर सरकार काय मार्ग काढणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण जेथे सरकारी नोकर्‍या कमी होत आहेत, तेथे आणखी एका समूहाला आरक्षण देणे, ही निव्वळ मलमपट्टी ठरेल, असे आकडेवारी सांगते. त्यामुळे संघटीत क्षेत्रात अधिक रोजगार देऊन मनुष्यबळावरील खर्च वाढविणे अपरिहार्य, सर्वांच्या हिताचे आहे. हा बदल समाजातील सर्व धुरिणांना समजून घ्यावा लागेल आणि ज्यांना तो पटत नाही, त्यांना या गंभीर प्रश्‍नावरील उत्तराची मांडणीही करावी लागेल. कारण कुंपणे कितीही उंच केली, तरी अस्तित्वाचे प्रश्‍न निर्माण झाल्यावर ती कुंपणे तोडली जाण्यास वेळ लागत नाही. •••

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (303 of 823 articles)

Atal Bihari Vajpayee File
प्रासंगिक : शशिकुमार भगत | मंगळवार दि. ३ जून २००३! जर्मनी, रशिया व स्वित्झर्लंड या तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान ...

×