ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक » एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते असतात. मोदी सरकारमुळे त्यांना पळता भूई थोडी झाली आहे. त्यामुळे ते पिसाळल्यासारखे वागत आहेत. सामान्य माणसाला ते संभ्रमित करण्याचा, भयभीत करण्याचा, प्रलोभनं दाखवण्याचा प्रयत्न करणारच. भ्रष्टाचारी सहजासहजी हार मानणार नाहीत. आपल्याला त्यांच्या आश्रयदात्यांवरच कठोर प्रहार करावे लागतील. भ्रष्टाचाराच्या आश्रयदात्यांवरच निराश्रीत व्हायची पाळी येईल, तेव्हा ते चवताळून अंगावर येणारच. पण सत्यात आणि सामान्य माणसात प्रचंड शक्ती असते. तिच्या जोरावर आपण ही भ्रष्टाचाराविरुध्दची निर्णायक लढाई जिंकणारच! निर्माण करुया एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

Pm Modi Rashtradhwaj

Pm Modi Rashtradhwaj

भ्रष्टाचाराचे निर्मूलन करा! नवभारताची उभारणी करा! अखंडतेची शपथ घ्या! भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये नीतिमत्तेची उच्च मानके स्थापित करण्यासाठी आपल्या सूचना पाठवा, असे आवाहन केंद्रिय सतर्कता आयोगाकडून सतर्कता जागरुकता सप्ताहाच्या निमित्ताने करण्यात येत आहे. भारतीय नागरिकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो, ते यथावकाश दिसेलच!
नीतिमत्तेची उच्च मानके आम्हाला नव्याने स्थापित करायची गरज नसून आमच्या पूर्वजांनी प्रत्येक क्षेत्रासाठी, प्रत्येक नात्यासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतःच्या त्यागपूर्ण आचरणातून जे आदर्श घालून दिलेले आहेत, ते आत्मसात करण्याची नितांत आवश्यकता आहे. जे आमच्या परसदारी विपूल प्रमाणावर सहज उपलब्ध आहे, त्याचा आम्हाला दुर्दैवाने विसर पडला आहे.
पुरुषोत्तम राम! आदर्श पत्नी माता सीता! त्यागमूर्ती भ्राता भरत-लक्ष्मण! उपभोगशून्य स्वामी श्रीकृष्ण! आचार्य चाणक्य आणि चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य! महात्मा बसवेश्‍वर, छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप! झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर! नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, डॉ. एपीजे अब्दुल कलाम! कामधेनू परसदारी आणि आंबट ताकासाठी जर्सीच्या द्वारी, अशी आमची केविलवाणी अवस्था आम्हीच करुन घेतली आहे!
क्षुधातृप्तीसाठी लिखित ऋषींनी सख्ख्या भावाच्या बागेतील पेरु त्याची परवानगी न घेता तोडले. हातांकडून घडलेल्या प्रमादाची आठवण सदसद्विवेक बुध्दीने करुन दिली. स्वतः राजदरबारी जावून लिखित ऋषींनी या अपराधासाठी शिक्षा मागून घेतली. कर्तव्यकठोर न्यायव्यवस्थेने प्रकांड पंडीत लिखित ऋषींचे दोन्ही हात मनगटापासून तोडण्याचा आदेश दिला! आम्हाला लिखित ऋषींचे स्मरण असते, तर आम्ही भ्रष्टाचार्‍यांचा, देशद्रोह्यांचा जयजयकार केलाच नसता! आम्हाला आचार्य चाणक्य, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचा विसर पडला नसता, तर विदेशी विधर्मी भारताच्या राजसिंहासनापर्यंत आणि तुमच्या आमच्या देव्हार्‍यापर्यंत पोहचू शकले नसते! मोहम्मद घोरीला अनेक वेळा पिटाळून लावणार्‍या पृथ्वीराज चौहानला दगाफटका कुणी केला हे आम्ही विसरलो नसतो, तर जयचंदाचा निर्वंश झाला असता! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गावरुन आम्ही ढळलो नसतो, तर जिहादी, वामपंथी पिलावळ शिल्लक राहिली नसती! दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल, याची आम्ही तर्कसंगत चिकित्सा केली असती, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिलेल्या मानवंदनेचं महत्व समजले असते! सरदार वल्लभभाई पटेल यांची उंची आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यातील त्यांचं आभाळाएवढं योगदान आम्हाला कळलं असतं, तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची आणि त्यासाठी झालेला खर्च याचा हिशोब मांडण्याचा क्षूद्रपणा आम्ही केला नसता! मानसिक भ्रष्टाचारामुळे माणूस खुजा होतो आणि अशा खुज्या माणसांमुळे समाज, देश बदनाम होत असतो. काँग्रेसने लपवून ठेवलेले सत्य जसजसे उघड होत जाईल, तसतसे नेहरु आणखी खुजे होत जातील!
मागच्या महिन्यात याच सदरात मी पंधरा लाखाची गोष्ट सांगितली होती. त्या उपहासात्मक लेखात मी भारतीयांसाठी युरोप, चीनमधील तीन अनुकरणीय उदाहरणं दिली होती. त्या उदाहरणांच्या पार्श्‍वभूमीवर ज्यांना कुणाला पंधरा लाख हवे असतील त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत, अशी एक पुडीही सोडून दिली होती. पहिला अर्ज आला बारामतीकर काकांच्या मराठवाडी पुतण्याकडून! कुणाकुणाच्या खात्यात पंधरा लाख जमा झाले आहेत याची खातरजमा करुन घेण्यासाठी पासबुक भरुन घेव आंदोलन करण्यात आले. फुकटच्या, हरामाच्या पंधरा लाखासाठी केवढी ही तत्परता! हिरमुसलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांची पासबुकं वृत्तवाहिनीच्या कॅमेर्‍यासमोर उघडी करुन दाखविली, परंतु नेत्यांची पासबुकं घरीच विसरली होती म्हणे! नेत्यांची पासबुकं कार्यकर्ते सांभाळतात, पण ती उघडून बघतच नाहीत! मोदीजींकडून पंधरा लाख काही मिळणार नाहीत, निदान आपापला सातबारा तरी सांभाळा!
भ्रष्टाचार हा भारतीय जीवनशैलीचा एक भाग आहे. भ्रष्टाचाराविषयी भारतीयांना काहीच वाटत नाही. भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी भ्रष्टाचार्‍यांना धडा शिकविण्याऐवजी भारतीय त्यांना सहन करतात. स्वार्थापलिकडे त्यांना काही दिसत नाही. म्हणूनच भ्रष्टशिरोमणीही पुन्हा पुन्हा निवडून येतात. प्रत्येक व्यक्ती नैतिकतेने वागली, तर सर्वांचीच प्रगती होऊ शकते, यावर भारतीय विश्‍वास ठेवत नाहीत. कारण प्रत्येक व्यक्ती मला काय मिळेल याचाच विचार करते! एक भारतीय दुसर्‍या भारतीयावर विश्‍वास ठेवत नाही, पण परक्यावर मात्र लगेच पाघळतो. एका भारतीयाला दुसर्‍या भारतीयाची प्रगती बघवत नाही. मूळात भारतात आज भारतीय कुणीच नाही, आहेत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन वगैरे. दीड दोन हजार वर्षापूर्वीच्या सनातन एक भारत, श्रेष्ठ भारत या आदर्श राष्ट्राची परचक्रांमुळे झालेली अधोगती अनेक तटस्थ पाश्‍चात्य विचारवंतांनी फार मार्मिकपणे चितारली आहे. एखाद्या भारतीयाला भारतात कुठेही विकत घेणे जेवढे सोपे आहे, त्यापेक्षा नासातल्या भारतीयाला विकत घेणे अधिक अवघड आहे! किती बोलकी प्रतिक्रिया आहे ही! परदेशी गेलेला भारतीय तिथले नियम, कायदेकानून, समाजबंधनं काटेकोरपणे पाळतो! तिथली शासन यंत्रणा, समाज व्यवस्था याचा धाक तर वाटतोच, पण आपण भारतीय आहोत याचेही स्मरण असते, ज्याचा भारतात असल्यावर विसर पडतो! दोष भारतीय माणसात, त्याच्या समाजसंस्कृतीत नाही, तर सभोवतालच्या परिस्थितीत आहे. आम्ही भारतीय एक आहोत, नेक आहोत, श्रेष्ठ आहोत याचाच आम्हाला विसर पडला आहे. मोदीजी आम्हाला त्याचीच जाणीव करुन देत आहेत!
आपल्याकडे दुसर्‍याच्या भ्रष्टाचाराची चर्चा आपण करत असतो, पण आत्मपरिक्षण मात्र करीत नाही! मानसिक पातळीवर घडत असलेल्या भ्रष्टाचाराचे दृश्य स्वरुप म्हणजे शारिरीक भ्रष्टाचार! आर्थिक, लैंगिक वगैरे भ्रष्टाचार आधी आपल्या मनात घर करतात, त्यांची तीव्रता वाढली की मती भ्रष्ट करतात आणि मग शरीराकडून आपली इच्छापूर्ती करुन घेतात. भ्रष्टाचारी व्यक्तीला शिक्षा करायची तरतूद फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. शिक्षा ही शरीराला केली जाते. त्याचा परिणाम मनावर झाला तर भ्रष्टाचारी सुधारतो. मन कोडगेपणा करत असेल तर त्याला वठणीवर आणावे लागते!
आपल्या देशात आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. आमची मनं कोडगी झाली आहेत. जो जितका अधिक भ्रष्टाचारी, तितका तो अधिक प्रतिष्ठित! एक काळ होता, विद्वान सर्वत्र पुज्यते! आज भ्रष्टाचारी सर्वत्र पुज्यते! लोकांना भ्रष्टाचाराची चीड असती तर असे घडले नसते. धनवंत भ्रष्टाचार्‍याऐवजी गुणवंत सदाचारी निवडून आले असते! निवडणूक प्रक्रिया सुरु झाली की कुठे उमेदवारीचा लिलाव झाला, कुठे दोन राजकीय गटात पैसे वाटपावरुन तुंबळ हाणामारी झाली याच्या बातम्या येत असतात आणि आम्ही त्या चवीने वाचतो! राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार म्हणतात, मतदारांना पैसे वाटल्याशिवाय मतंच मिळत नाहीत हो! निवडून येणे तर लांबच राहिले! उमेदवारी मिळवण्यासाठी पैसा लागतो! मतदार म्हणतात, हा किंवा ही निवडून गेल्यानंतर कोट्याधीश होणार! मग आम्ही यांना फुकट का निवडून द्यावे बरे? अहो, प्रत्येक ठिकाणी लाच दिल्याशिवाय आमचे एकही काम होत नाही. शाळा प्रवेशापासून नोकरी मिळवण्यापर्यंत पैसाच पैसा लागतो, तो आम्ही कुठून आणायचा? कुठल्याही कार्यालयातील लाच मागणारा चपराशी म्हणतो, साहेबाला पैसे द्यावे लागतात, मी काय करु? साहेब म्हणतो, त्याला त्याच्या वरच्या साहेबाला पैसे द्यावे लागतात! ही साखळी वर कुठपर्यंत जाते माहीत नाही, कारण आपणही त्याच साखळीची कडी असतो! कुणाचाही वशिला नसलेला आणि लाच द्यायला नकार देणारा थकून जातो, पण त्याचे काम काही होत नाही. पहिल्या पायरीवरच संबंधीताचा खिसा गरम केला की कामं कशी पटापट होतात, याचा अनुभव सर्रास येतो. अशी कामं करुन देणारी समांतर यंत्रणा अनेक ठिकाणी कार्यरत आहे. भ्रष्टाचार स्थीरस्थावर करण्यात आपल्या सर्वांचाच हातभार आहे.
प्रचंड भ्रष्टाचारी आणि धोरण लकवा झालेले संपुआ सरकार गेले आणि रालोआ सरकार सत्तेवर आले. २०१४ साली भारतीय मतदारांनी क्रांती केली असे म्हटले गेले. खरंच हा संपुआ सरकारच्या भ्रष्टाचाराविरुध्दचा आक्रोश होता का? माझ्या मते केवळ तेच एक कारण नव्हते. संपुआ सरकार आम्हाला जे फुकट देत होते त्यापेक्षा अधिक मोदी सरकार देईल, या अपेक्षेने आम्ही त्यांना बहुमताने निवडून दिले आहे. लोकलुभावन निर्णय घेणार्‍या, आम्ही खातो आणि त्यातलं थोडं तुम्हालाही देतो अशा प्रकारचा राज्यकारभार करणार्‍या सरकारला मतदारांकडून फारसा धोका नसतो. परंतु मोदी सरकारची तर्‍हाच न्यारी! न खाऊंगा, न खाने दुंगा! भीक मागण्यासाठी काँग्रेसने आमच्या हातात परडी देऊन लाचार बनवले. ती परडी टाकून द्यायला आम्ही तयार नाही, पण त्या परडीत मोदींनी भीक वाढली नाही म्हणून आम्ही मोदींनाच फेकून द्यायला निघालो आहोत? अरे, तुमच्या हातातली परडी काढून घेऊन त्या हातांना कार्यप्रवण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत मोदीजी! भीक मागणारा हा भीक वाढणार्‍याला त्याच्या भ्रष्टाचाराविषयी जाब विचारुच शकत नाही, कारण त्याच्याकडे तेवढी नैतिकताच शिल्लक राहिलेली नसते. तुम्हाला भिकेचे डोहाळे लागले असतील, तर मोदीविरोधक टपूनच बसलेले आहेत. ते तुम्हाला भीकही वाढतील आणि नवी परडीही देतील हातात! पुन्हा भीक मागायला! माझ्या डॉगीला आज पेडीग्री मिळाले नाही म्हणून मोदींच्या नावाने बोंबाबोंब करणारे आहेत तसे कुठलीही कुरकुर न करता भविष्य पाठीवर आणि वर्तमान डोक्यावर घेऊन आनंदाने जगणारे आमच्यासारखे मोदीभक्तही आहेत! बोंबाबोंब करणारी मंडळी फक्त स्वतःसाठीच जगत असतात. त्यांना भ्रष्टाचाराशी सोयरसुतक नसते. समाजासाठी, देशासाठी त्याग करणे तर यांच्या शब्दकोशातच नसते. मोदींचे काय हो, फकीर माणूस! मोदीजी सत्तेत असोत वा नसोत, त्यांचे भक्त परडी कधीच हातात धरणार नाहीत आणि कुणाकडे भीकही मागणार नाहीत! मोदी सरकार भ्रष्टाचाराला पायबंध घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. नोटाबंदी, जीएसटी सारख्या धाडसी निर्णयामुळे अंतिमतः देशहितच साधले जाणार असले तरी असंख्य लोकांचे आर्थिक हितसंबंध दुखावले जातील, सामान्य नागरिकांना त्रास होईल, कदाचित आपले सरकारही पणाला लागेल याची कल्पना मोदीजींना असणारच! असे धाडसी, वरकरणी अप्रिय वाटणारे प्रचंड जोखमीचे निर्णय घ्यायला प्रचंड इच्छाशक्ती, निस्वार्थ बुध्दी आणि मतदारांवर प्रचंड विश्‍वास असावा लागतो. मोदीजींकडे हे सारे असल्यामुळेच ते भ्रष्टाचारावर घाव घालणारे देशहितकारी धाडसी निर्णय घेत आहेत. धुरळा तर उडणारच! आर्थिक हितसंबंधाला झळा बसू लागल्या की स्वार्थी माणूस सारासार बुध्दीने सहसा विचार करत नाही. खरं तर भ्रष्टाचाररुपी राक्षसाचा कायमचा बंदोबस्त करण्याची हीच योग्य संधी आहे. त्यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणारे खंबीर नेतृत्व आपल्याला दुर्गोपासक मोदींच्या रुपात लाभलेले आहे. काळ्या पैशाच्या समांतर अर्थव्यवस्थेने देशाच्या आंतरिक आणि बाह्य सुरक्षेसमोर गंभीर समस्या निर्माण केली आहे. आता कच खाल्ली तर भ्रष्टाचाराचा महिषासूर अधिकाधिक विक्राळ होत जाईल आणि त्यात सर्वकाही स्वाहा होईल याची चाहूल लागल्यामुळेच मोदीजींना कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. मोदींसाठी देशहित सर्वोपरी आहे. परंतु सेनापती एकटा युध्द जिंकू शकत नाही. इथे तर लढाई सर्वशक्तीमान भ्रष्टाचाराशी आहे. सेनापती मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रभक्तीने पेटून उठलेले सव्वाशे कोटी भारतीय नागरिकांचे सैन्य भ्रष्टाचाराविरुध्दची ही लढाई जिंकतीलच! आमच्या भावी पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी आम्हाला ती जिंकावीच लागेल! त्यासाठी भ्रष्टाचाराच्या उगमस्थानीच घाव घालावे लागतील. प्रत्येक आर्थिक व्यवहाराची सांगड आधारकार्डशी-पॅनकार्डशी घालण्याचा आटापिटा मोदीजी त्यासाठीच तर करत आहेत! त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. असंख्य बोगस शिधापत्रिका, गॅसजोडणी, बेनामी बँकखाती, हवाला कारोबार करणार्‍या कागदी कंपन्या, एनजीओ’ज, … यांचे पितळ उघडे पडू लागले आहे. तुमच्या आमच्या कष्टाच्या पैशाची, सरकारी तिजोरीची लूट थांबली आहे. भ्रष्टाचार्‍यांची संपत्ती जप्त करुन ती सरकारजमा केली जात आहे. हेच तर आहेत अच्छे दिन! आपण घराघरात, मनामनात घुसखोरी केलेल्या भ्रष्टाचाराला तिथून पिटाळून लावले पाहिजे. मोदींविषयी असभ्य शब्दप्रयोग करणारांकडे बघून लोक म्हणतात, तो बघा नोटाबंदीचा धूर! बेनामी की सुनामी तो अभी आनी है!
भ्रष्टाचाराची वरवरची कारणं काहीही असली तरी, मूलतः प्रत्येक व्यक्तीचा अनैतिक व्यवहारच भ्रष्टाचाराचे उगमस्थान असते. आजच्या आपल्या दुर्गतीला चंगळवादी भोगविलासिता आणि ती ज्यातून येते ते नैतिक मूल्यांचे अधःपतन कारणीभूत आहे. स्वच्छंद, बेशिस्त, नैतिकमूल्यरहित समाजात असत्यप्रिय पापी पिढी तयार होत असते. अशी पिढी स्वतःपलिकडे कशाचाच विचार करत नसते. या परिस्थितीला आमची स्वार्थी वृत्ती तर जबाबदार आहेच, त्यापेक्षा कितीतरी अधिक शासनकर्ते आणि शासकीय यंत्रणा जबाबदार आहे. सुसंस्कारीत, जाज्वल्य राष्ट्रभक्तीने प्रेरीत नागरिक घडवण्यात समाज, सरकार, शासनव्यवस्था, शिक्षणप्रणाली कुठेतरी कमी पडत आहेत. म्हणूनच सदगुणांचा, सदाचारांचा, राष्ट्रप्रेमाचा आणि निकोप कार्यसंस्कृतीचा अभाव जाणवतो आहे. भ्रष्टाचाराविरुध्दच्या संघर्षात सदृढ सामाजिक वातावरणाचे महत्व असतेच, त्याहीपेक्षा सत्ताधार्‍यांची इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते. सुदैवाने मोदी सरकारकडे ती भरपूर आहे. सरकारच्या धाडशी निर्णयांमधून ती जाणवतही आहे. गरज आहे ती सामान्य माणसांच्या सकारात्मक प्रतिसादाची! स्वार्थापलिकडे जाऊन राष्ट्रहिताचा, भावी पिढ्यांचा विचार करण्याची!
भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते असतात. मोदी सरकारमुळे त्यांना पळता भूई थोडी झाली आहे. त्यामुळे ते पिसाळल्यासारखे वागत आहेत. सामान्य माणसाला ते संभ्रमित करण्याचा, भयभीत करण्याचा, प्रलोभनं दाखवण्याचा प्रयत्न करणारच. भ्रष्टाचारी सहजासहजी हार मानणार नाहीत. आपल्याला त्यांच्या आश्रयदात्यांवरच कठोर प्रहार करावे लागतील. भ्रष्टाचाराच्या आश्रयदात्यांवरच निराश्रीत व्हायची पाळी येईल, तेव्हा ते चवताळून अंगावर येणारच. पण सत्यात आणि सामान्य माणसात प्रचंड शक्ती असते. तिच्या जोरावर आपण ही भ्रष्टाचाराविरुध्दची निर्णायक लढाई जिंकणारच! निर्माण करुया एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (342 of 1299 articles)

Rbi Reserve Bank Of India
सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित जगातही जे जे चुकीचे घडेल त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जबाबदार धरण्याची सवय ...

×