ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक » एम. आय. ६ ची विजयध्वजा आणि कर्नल गोर्दियेव्हस्की

एम. आय. ६ ची विजयध्वजा आणि कर्नल गोर्दियेव्हस्की

॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले |

१९८८ सालचं ते यश इतकं मोठं आणि इतकं दूरगामी परिणाम करणारं होतं की, ते साजरं करण्यासाठी एक मेजवानी देणं आवश्यक होतंच. त्यासाठी ठिकाण मुद्दामच मुख्यालयापासून खूप दूर उत्तर लंडनमधलं एक हॉटेल निवडण्यात आलं. एम. आय. ६ चे अनेक उच्चपदस्थ अधिकारी तिथे जमले. सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता-एक उंच, धिप्पाड, कपाळावरून केस मागे फिरलेला, चस्मिस, टिपिकल रशियन चेहर्‍याचा वयस्कर माणूस. त्याचं नाव कर्नल ओलेग गोर्दियेव्हस्की!

Macintyre Kgb Agent Tease F3hpl3

Macintyre Kgb Agent Tease F3hpl3

सन १९८८ च्या जून महिन्यातली ती एक छानशी संध्याकाळ होती. लंडनच्या वॅक्झॉल क्रॉस परिसरातील एम. आय. ६ च्या मुख्यालयात म्हणजेच ब्रिटिश गुप्तहेर खात्याच्या कार्यालयात नेहमीप्रमाणेच कामं चालू होती. खरं पाहता आज तिथे प्रचंड जल्लोष असायला हवा होता. विजयदिन साजरा केला जात असायला हवा हाताध. हाच विजय जर उघड-उघड राजकीय किंवा लष्करी क्षेत्रातला असता, तर कदाचित प्रचंड मोठी जाहीर सभा, नेत्यांची भाषणं, लष्करी मानवंदना, संचलनं, सैनिकी पथकांच्या थरारक कसरती वगैरे नेत्रदीपक कार्यक्रम झाले असते. पण वॅक्झॉल क्रॉस मुख्यालयात यापैकी कसलाही हासभास सुद्धा नव्हता. कारण तो गुप्तहेर खात्याच्या एका मोठ्या कामगिरीचा विजय होता. तो गुप्तपणेच साजरा करणं आवश्यक होतं. ब्रिटिश हेरखात्याचा एक निवृत्त हेरप्रमुख म्हणतो, ‘आमच्या अपयशाचे जाहीर वाभाडे काढले जातात. आमच्या यशाचा मात्र कुणालाही पत्ताच नसतो. हे अगदी खरं आहे. पण त्याला इलाजच नसतो. कारण त्यांचं यश जाहीर झालं तर शत्रू सावध होणार आणि ज्या मार्गाने ते यश मिळालं, तो मार्ग बंद होणार.
परंतु १९८८ सालचं ते यश इतकं मोठं आणि इतकं दूरगामी परिणाम करणारं होतं की, ते साजरं करण्यासाठी एक मेजवानी देणं आवश्यक होतंच. त्यासाठी ठिकाण मुद्दामच मुख्यालयापासून खूप दूर उत्तर लंडनमधलं एक हॉटेल निवडण्यात आलं. एम. आय. ६ चे अनेक उच्चपदस्थ अधिकारी तिथे जमले. सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता, एक उंच, धिप्पाड, कपाळावरून केस मागे फिरलेला, चस्मिस, टिपिकल रशियन चेहर्‍याचा वयस्कर माणूस. त्याचं नाव कर्नल ओलेग गोर्दियेव्हस्की. सोवियत रशियाच्या के. जी. बी. या कुख्यात गुप्तहेर खात्याच्या लंडन कार्यालयाचा प्रमुख.
मेजवानीला अपेक्षित असलेले सर्व लोक जमल्यावर, पाश्‍चिमात्य पद्धतीनुसार दारूचे ग्लास घेऊन सगळे जण गोर्दियेव्हस्कीभोवती जमले. एकजण म्हणाला, ‘अफगाणिस्तानातून रशियन सैन्याच्या सुरू झालेल्या केविलवाण्या माघारीकरिता.’ सगळ्यांनी ‘चीअर्स’ म्हणत ग्लास उंचावून गोर्दियेवहस्कीला अभिवादन केलं. या प्रकाराला ‘टोस्ट’ असं म्हटलं जातं.
हे सगळं इतक्या सहजतेने, सफाईने झालं की, हॉटेलमधल्या इतर बघ्यांना तो माणूस काय बोलला आणि हे सगहे कोण आहेत, याचा कसलाही थांगपत्ता लागला नाही. एम. आय. ६ चे ते सगळे अधिकारी मात्र त्या दिवशी कमालीचे खुषीत होते. त्यांना कळून चुकलं होतं की, ही रशियन सैन्याची नुसतीच माघार नाही; तर एका ‘सैतानी साम्राज्याच्या’, एका ‘एव्हिल एम्पायरच्या’ पतनाची सुरुवात आहे. आणिखरोखरच आणखी जेमतेम अडीच-तीन वर्षांत ते साम्राज्य कोसळलं. १९८८ ते १९९१ ब्रिटिशांचा आणि लोकशाहिवादी जगाचा एक जबरदस्त शत्रू खलास झाला. खरोखरच हा फार मोठा विजय होता.
ही सगळी काय भानगड आहे, हे नीट समजून घेण्यासाठी आपण इतिहासावर एक वेगवान दृष्टिक्षेप टाकूया. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या बळावर युरोपातल्या देशांमध्ये जग जिंकण्याची स्पर्धा लागली. ती मुख्यत: इंग्लंडने, पण अधिकृत भाषेत इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड आणि वेल्स हे चार प्रांत मिळून बनलेल्या ब्रिटनने जिंकली. नेपोलियन बोनापार्टने ब्रिटनसमोर जबरदस्त आव्हान उभं केलं होतं, पण ब्रिटनने त्यालाही यशस्वीपणे संपवलं. तेवढ्यात ब्रिटनला जाणीव झाली रशियाच्या वाढत्या बळाची. रशियन सम्राट म्हणजे झार पीटर द ग्रेट (जन्म – १६७२, राज्यारोहण – १६८२, मृत्यू -१७२५) याने अतिशय योजनाबद्ध रीतीने रशियाला अत्याधुनिक बनवलं. त्याला संपूर्ण पूर्व युरोप आणि स्कँडिनेव्हियन देश (नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क) तर हवेच होते; पण रशियाच्या दक्षिणेकडचे कझाकस्तान, उझबेक्रिस्तान ते अफगाणिस्तानपर्यंतचे सर्व देश जिंकून थेट भारतापर्यंत पोचायची म्हणजे भारत जिंकण्याची त्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी ब्रिटिशांनी अफगाणिस्तान जिंकून तिकडची सरहद सुरक्षित करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. ते जमेना. मग त्यांनी मुत्सद्देगिरी चालवून अफगाणांच्या शहाला कायमचा मित्र बनवलं.
रशियात १९१७ साली साम्यवादी क्रांती झाली. झारशाही संपली. पण साम्यवादी नेते लेनिन आणि त्याच्याहीपेक्षा स्टालिन हे झार राजे फिके पडावेत इतके सत्तापिपासू होते. झारशाही प्रमाणेच साम्यवादी राजवट आणि ब्रिटन याचं जुनं हाडवैर चालूच राहिलं, किंबहुना त्याला अधिकच धार चढली.
तेवढ्यात, जग जिंकू पहाणारा एक नवाच महाखलनायक जगाच्या रंगभूमीवर अवतरला. अ‍ॅडॉल्फ हिटलर. त्याने निर्माण केलेल्या महाभयानक उत्पाताने त्याच्या स्वत:च्या देशासकट सगळेच युरोपीय देश खिळखिळे झाले. पण स्टालिन अधिकच प्रबळ झाला. पहाता-पहाता त्याने संपूर्ण पूर्व युरोप आणि अफगाणिस्तानपर्यंतचे देश आपल्या पंजाखाली आणले. साम्यवादी तत्त्वज्ञान नावाच्या मायावी आवरणाखाली त्याने जगभरच्या विचारवंत, बुद्धिमंतांना भुलवून आपल्या कच्छपी लावलं. स्टालिननेच निर्माण केलेल्या के.जी.बी. या रशियन गुप्तहेर खात्याने स्वदेशासकट जगभर विश्‍वासघात, फंदफितुरी आणि घातपात यांचा नुसता कहर उसळून दिला. साम्यवादाच्या मायावी तत्त्वज्ञानाने भ्रमित झालेले जगभरचे विचारवंत, बुद्धिमंत, साहित्यिक, कलावंत आपापल्या देशाशी बेधडक बेईमानी करायला उद्युक्त झाले. पुढे स्टालिनच्याच काही चेल्याचपाट्यांना त्याची दादागिरी असह्य होऊ लागली. तयांनी बंड केलं. तेव्हा सोवियत रणगाडे दणाणत आले नि त्यांनी ते बंड अक्षरश: चिरडून टाकलं. उदा., १९५६ साली हंगेरीचा साम्यवादी नेता इम्रे नागी आणि १९६८ साली झेकोस्लोवहांकियाचा अलेक्झांडर ड्युबचेक यांनी बंड केलं. त्याची प्रचंड लष्करी बळावर साफ वासलात लावण्यात आली. ब्रिटन-अमेरिका दातओठ चावत फक्त बघत राहिले आणि उरलेलं जग भयचकित होऊन पहात राहिलं.
१९७९ साली अफगाणिस्तानात यादवी सुरू झाली. तेव्हा तिथल्या साम्यवादी पक्षाची पाठराखण करायला पुन्हा एकदा सोवियत रणगाडे काबूलमध्ये उतरले. पण आता हे १९५६ किंवा १९६८ साल नसून १९७९ साल होतं. रणगाड्यांना घाबरायला पठाण म्हणजे हंगेरियन किंवा झेकोस्लोव्हाक पांढरपेशे नागरिक नव्हते. एक जबरदस्त गनिमी युद्ध सुरू झालं, जे पुढची नऊ वर्षे सतत सुरू राहिलं.
ओलेग गोर्दियेव्हस्की १९६८ सालीच के. जी. बी. हस्तक म्हणून डेन्मार्क देशाची राजधानी कोपनहेगनमध्ये कामाला लागला. उत्कृष्ट काम केल्याबद्दल १९७३ साली त्याची बढती आणि बदली लंडन केंद्राचा प्रमुख म्हणून करण्यात आली. डॅनिश गुप्तहेर खात्यामधील सूत्रांमार्फत गोर्दियेव्हस्की, ब्रिटिश गुप्तहेर खात्यातील म्हणजे एम. आय. ६ मधील योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचला आणि त्याने ब्रिटनला गुप्त माहिती देण्याचं काम सुरू केलं. केवढं आश्‍चर्य! के. जी. बी. चा लंडन केंद्रप्रमुख स्वत: होऊन ब्रिटिश हस्तक बनला. १९५० आणि ६० च्या दशकात हेरॉल्ड अ‍ॅड्रियन रसेल उर्फ किम फिल्बी हा उच्चपदस्थ ब्रिटिश हेर स्वत: होऊन के. जी. बी. चा हस्तक बनला होता आणि त्याने फार महत्त्वाची माहिती रशियाला पुरवली होती. हे त्याने केलं, यात त्याला देशद्रोह वाटला नाही. कारण तो साम्यवादी होता. आपण हे केलंच पाहिजे, असं त्याला वाटत होतं. गोर्दियेव्हस्कीची भूमिका नेमकी त्याच्या उलट होती. साम्यवादी तत्त्वज्ञान आणि त्याहीपेक्षा म्हणजे के. जी. बी. च्या कारवाया ही चक्क गुन्हेगारी, गुंडगिरी आहे आणि ती संपवलीच पाहिजे, असं त्याचं मत बनलं होतं.
१९७३ ते १९८५ पर्यंत गोर्दियेव्हस्कीने एम. आय. ६ ला फार मौल्यवान माहिती पुरवली. त्यातला मुख्य भाग हा की, सोवियत रशियन नेते कायम जी दादागिरी करतात त्यामागे सामर्थ्याचा अहंकार हा भाग नसून; युरोप – अमेरिकेच्या विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ते मनातून घाबरलेले आहेत, ही गोष्ट मार्गारेट थॅचर आणि रोनाल्ड रीगन यांना पटकन देणे. १९८३ साली रीगन यांनी उघडपणे सोवियत राजवटीला ‘एव्हिल एम्पायर’ म्हटल्यावर तर रशियन नेतृत्वाची पाटलोण सुटायची वेळ आली होती, हे गोर्दियेव्हस्की कडून एम. आय. ६ ला समजलं.
१९८५ नंतर सगळंच वेगाने बदललं. सत्तेवर आलेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी मे १९८८ पासून, अफगाणिस्तानातील पठाणांकडून हग्या मार खाणारी सोवियत सेना काढून घ्यायला सरुवात केली. १९८९ साली त्यांनी पूर्व युरोपातल्या आपल्या मांडलिक चमच्यांना वार्‍यावर सोडलं. त्यासरशी पूर्व जर्मनी ते ताजिकीस्तानपर्यंतचं सोवियत साम्राज्य धडाधडा कोसळलं आणि १९९१ साली तर यू. एस. एस. आर. नावाच्या सैतानी राजवटीची संपूर्ण इतिश्री होऊन रशियन फेडरेशन हा नवा देश अस्तित्त्वात आला.
बेन मॅकिंटायर हा एक नवा ब्रिटिश इतिहासकार – लेखक आहे. ‘द स्पाय अ‍ॅण्ड द ट्रेटर’ या नावाने त्याने कर्नल ओलेग गोर्दियेव्हस्कीचं चरित्र आणि एकंदर त्या काळाचा लिहिलेला वृत्तांत नुकताच प्रकाशित झाला आहे.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक (373 of 1288 articles)

Ambedkar Jayanti
भाग्य विधाता : प्रशांत आर्वे | वर्तमानात मात्र त्यांच्या कालातीत असलेल्या विचारांचे विसर्जन करून; हिंदू आणि दलित असा द्वेषाधारित सामना ...

×